Konkan Railway: नाताळ-नवीन वर्षानिमित्त खास भेट! कोकण रेल्वेवर धावणार विशेष गाड्या; कुठून–कुठे, जाणून घ्या

Konkan Railway Special Train Natal New Year Holiday: पर्यटनप्रमी प्रवाशांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने विविध राज्यांना जोडणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Konkan Railway Special Train: नाताळची सुटी आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची पाऊले कोकण आणि गोव्याकडे वळू लागली आहेत. सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. पर्यटनप्रमी प्रवाशांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने विविध राज्यांना जोडणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण, गोव्याला जाण्यासाठी विशेष ट्रेन!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि कर्नाटककडे जाणाऱ्या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि कर्नाटककडे जाणाऱ्या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. 

Pune News : 1 मताने केला चमत्कार! वडगाव नगरपंचायतीत चुरशीची लढत, भाजपच्या पूजा ढोरे पराभूत, कोण जिंकलं?

यामध्ये प्रामुख्याने मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर ते कर्नाटकातील ठोकूर आणि छत्तीसगडमधील बिलासपूर ते गोव्यातील मडगाव या मार्गांचा समावेश आहे. ​डॉ. आंबेडकर नगर (मध्य प्रदेश) ते ठोकूर (कर्नाटक) दरम्यान धावणारी विशेष गाडी २८ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता प्रस्थान करेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ३:०० वाजता ठोकूर येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात, ही गाडी २३ आणि ३० डिसेंबर रोजी ठोकूर येथून पहाटे ४:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३:३० वाजता डॉ. आंबेडकर नगरला पोहोचेल. ​या गाडीला कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामध्ये वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांचा समावेश आहे.

Advertisement

याशिवाय, छत्तीसगडमधील बिलासपूर ते मडगाव दरम्यानही विशेष फेरी चालवण्यात येणार असल्याने मध्य भारतातील पर्यटकांना थेट कोकण आणि गोव्याचा प्रवास करणे सुलभ होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

नक्की वाचा >> Election 2025 : राज्यातील 288 नगरपालिकांमध्ये कोण जिंकलं? वाचा सर्व विजयी नगराध्यक्षांची नावे एका क्लिकवर