सुनिल दवंगे
सध्या नवरात्रौत्सव सुरू आहे. सगळीकडे नवरात्राची धूम पाहायला मिळत आहेत. गावोगाव गल्लीगल्लीत गरबे होताना पाहायला मिळत आहे. एक आनंदाचं आणि उत्सहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पण याच उत्सवाला गालबोट लागण्याची घटना घडली आहे. ही घटना अहिल्यानंतर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये घडली आहे. इथं दांडीया दरम्यानच दोन गटात जोरदार राडा झाला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. पोलीस ही या घटनेनंतर सतर्क झाले असून त्यांनी शहरात बंदोबस्तही वाढवला आहे.
दांडीया दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये बुधवारी रात्री दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. त्यात कमी म्हणून की काय यानंतर जोरदार दगडफेक ही झाली आहे. या घटनेमुळे परिसरासह शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक केल्याचे आता समोर आले आहे. त्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा शहरात दाखल झाला आहे. त्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गरबा सुरू असताना तिथून एक वाहन जात होते. त्याचा धक्का गरबा खेळणाऱ्या एका व्यक्तीला लागला. या शुल्लक कारणावरून हा राडा झाला. विशेष म्हणजे हे दोन्ही लोक वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी संबंधीत होते. त्यामुळे धक्का लागल्याच्या किरकोळ गोष्टीचा मोठा बावू करण्यात आला. कार्यकर्ते जमले. तिथेचनंतर जोरदार राडा झाला. हाणामारी झाली. दगडफेकही झाली. त्यात पोलीस ही जखमी झाल्याचं समोर येत आहे. या राड्या प्रकरणी जवळपास 63 जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यापैकी 16 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दगडफेकीत काही नागरिकांसह दोन पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक, मनसेचे शहराध्यक्ष यांच्या तसेच अनेक राजकीय कार्यकर्त्यांची नावे आरोपींमध्ये समोर आली आहेत. घटनेनंतर शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.