
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पहिले शासकीन निवासस्थान असलेला बंदल्याच सौदा निश्चित झाला आहे. हा बंदला विकला गेला असून ही देशातील रिअर इस्टेटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी ठरल्याचा दावा केला जात आहे. हा बंगला दिल्लीच्या लुटियन्स बंगला झोनमध्ये आहे. हा बंगला दिल्लीतील सर्वात हायफाय भागात असून तो तब्बल 3.7 एकरमध्ये आहेत. तर बंगला जवळपास 24 हजार चौरस फुटाचा आहे. या आधी ही या बंगल्याचा सौदा करण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्यात यश आले नव्हते. आता मात्र या बंगल्याचा सौदा झाला आहे.
हा बंगला सध्याच्या मोतीलाल नेहरू मार्गावर आहे. हा भाग व्हीआयपी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात मंत्री, न्यायाधिश, आणि वरिष्ट सरकारी अधिकाऱ्यांचे बंगले आहेत. या शिवाय 600 खाजगी प्रॉपर्टी ही आहेत. याचे मालक हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पंडीत नेहरूंचा हा बंगला 1912- 1930 दरम्यान अॅडवीन ल्युटीअन यांनी डिझाईन केला होता. हा बंगला या आधीही विक्रीसाठी काढण्यात आला होता. त्यावेळी 1400 कोटी किंमत ठरवण्यात आली होती. पण ती डिल फसली होती. मात्र या वेळी ही डिल फायनल झाल्याचं बोललं जात आहे.
नक्की वाचा - Tadoba News: ताडोबात वाघोबाला बघणे महागले, टायगर सफारीसाठी आता द्यावे लागणार...
हा बंगला आता तब्बल 1100 कोटींना विकला जाणार आहे. बेवरेज इंडस्ट्रीच्या एका मोठ्या बिजनसमनने हा बंदला खरेदी केला आहे. त्याचे नाव मात्र जाहीर करण्यात आले आहे. या जागेची डिल एका मोठ्या लॉफर्मने केली आहे. शिवाय त्यांनी या खरेदी विक्री बाबत कोणाला आक्षेप असेल तर सात दिवसात आक्षेप नोंदवण्यास सांगितला आहे. त्यामुळे ही डील झाल्याचं बोललं जात आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने याचं वृत्त दिलं आहे. मात्र हा बंगल्याची मालकी सध्या कुणाकडे आहे असा ही प्रश्न उपस्थित केला जाता आहे. या बंगल्याचे वारस कोण आहेत असं ही विचारलं जात आहे.
नक्की वाचा - 'मिस्टर इंडिया'तील टीना आता झालीय हॉट, 38 वर्षांनंतरचा फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा
तर या बंगल्याचा मालकी हक्का हा राजकुमारी कक्कड आणि बीना राणी यांच्याकडे आहे. या राजस्थानच्या राजघराण्यातील आहेत. त्याच या हेरिटेज बंगल्याच्या मालकीण आहेत. हा सौदा शेवटच्या टप्प्यात आहे. ही या बंगल्याची डील नाही तर ऐतिहासिक वास्तूची ही डील होत आहे. देशातील रिअल इस्टेटमधली ही सर्वात मोठी डील असल्याचं बोललं जात आहे. तब्बल 1100 कोटींना हा बंगला विकला जात आहे. आतापर्यंत येवढ्या मोठ्या किंमतीला कोणताही बंगला देशात विकला गेला नाही असा ही दावा केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world