Mukhyamantri-Majhi Ladki Bahin Yojana e-KYC : महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक बदल झाले आहेत. अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर आदिती तटकरे यांनी ही प्रक्रिया कडक केली असून प्रत्येक लाभार्थ्याला e-KYC अनिवार्य करण्यात आली आहे.
पुढील दोन महिन्यात म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेने e-KYC करणं आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या लाखो जणांकडून या संकेतस्थळाचा वापर केला जात असल्याने लोक वाढला आहे. परिणामी e-KYC करताना अनेक अडचणी येत आहेत.
लाडकी बहीण योजना E-KYC साठीचा फ्लोचार्ट...
e-KYC कशी कराल, जाणून घ्या प्रत्येक स्टेप - Ladki Babin Yojana E-KYC Process steps
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
e-KYC बॅनरवर क्लिक करा
e-KYC फॉर्म उघडल्यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड किंवा पडताळणी संकेतांक कोड नमूद करा. यानंतर Send OTP बटणावर क्लिक करा
यानंतर तुमचे e-KYC पूर्ण झाले की नाही हे तपासले जाईल.
e-KYC आधीच पूर्ण झाले असेल तर तसा संदेश येईल अन्यथा आधार क्रमांक लाभाथ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासले जाईल
योजनेत अपात्र असाल तर तसा संदेश येईल किंवा लाभार्थ्याच्या मोबाइलवर आलेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून Submit बटण दाबा.
यानंतर e-KYC पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार कार्ड क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक नमूक करा. यानंतर Send OTP बटणावर क्लिक करा
यानंतर पती किंवा वडिलांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी स्क्रिनमध्ये टाकून Submit करा.
लाभार्थ्याने जात प्रवर्गाचा पर्याय निवडावा
यामध्ये दोन प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर होय किंवा नाही मध्ये द्या. दोन्ही प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर चेक बॉक्सवर क्लिक करून Submit करा.
तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, असा तुम्हाला संदेश येईल
वडील किंवा पतीचा कोणाचा आधार क्रमांक द्याल?
तुम्ही विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक द्यावा. याशिवाय कुमारिका असाल तर वडिलांचा आधारक्रमांक द्यावा. पतीचं निधन झालं असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर वडिलांचा आधार क्रमांक द्यावा.
ERROR येत असेल तर काय कराल?
राज्य सरकारकडून आताच केवायसीबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक संकेतस्थळावर जाऊन e-KYC करीत आहे. परिणामी साईटवरील लोड वाढला आहे. त्यामुळे एरर येत आहे. मात्र महिलांनी गोंधळून जाऊ नये. तर सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा e-KYC करण्याचा प्रयत्न करा. केवायसी करण्यापूर्वी तुमचं नेटवर्क तपासून घ्या.
ज्यांना e-KYC वेळी अडचण येत असेल ते अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे मदतीसाठी जाऊ शकता.
तुमच्या भागातील लोकप्रतिनिधींकडे किंवा शिवसेनेच्या शाखेमध्ये जाऊन मदत मागू शकता.