2 months ago

Live Update : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे-दिल्ली आयोजित 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. आजपासून या साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. 21,22 आणि 23 फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ लेखिका डॉ.तारा भवाळकर  या भूषवणार आहेत.

देशाच्या राजधानीत तब्बल 71 वर्षानंतर साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे दिल्लीत असणाऱ्या साहित्य प्रेमींसाठी ही पर्वणीच आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. तर उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहाणार आहेत. उद्घाटन सोहळा दिल्लीच्या विज्ञान भवनात पार पडणार आहे.

Feb 21, 2025 22:24 (IST)

अमित शहा, देवेंद्र फडणवीस पुण्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच पुण्यात आगमन झालं आहे.  देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा पुण्यात एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.  उद्या शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत देशातील पश्चिम विभागाच्या गृह खात्याची बैठक होणार आहे.  महाराष्ट्रासह अनेक राज्यातील गृहमंत्री उद्या पुण्यात 

याच बैठकीसाठी उपस्थित राहाणार आहेत. 

Feb 21, 2025 22:09 (IST)

Champions Trophy 2025 : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

चॅम्पियन्स ट्रॉफीतील तिसरा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा 107 रन्सनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटिंग करताना रायन रिकल्टनच्या सेंच्युरीच्या जोरावर 6 आऊट 315 रन्स केले. अफगाणिस्तानला 316 रन्सचं आव्हान पेलवलं नाही. त्यांची पूर्ण टीम 208 रन्सवरच ऑल आऊट झाली. अफगाणिस्तानकडून रहमत शाहनं एकाकी झूंज देत 90 रन्स केले.

आता अफगाणिस्तानचा पुढचा सामना बुधवारी (26 फेब्रुवारी) रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. त्यांना स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. तर दक्षिण आफ्रिकेची पुढची लढत (मंगळवारी) ऑस्ट्रेलियाशी होईल. 

Feb 21, 2025 21:27 (IST)

सुरेश धस महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट घेणार

आमदार सुरेश धस महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. आमदार धस हे आधी मसाजोग येथे सकाळी 8.30 वा. देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते महादेव मुंडे कुटुंबीयांची परळीत दुपारी 12 वाजता भेट घेतील.  हे प्रकरण उचलून धरल्यानंतर सुरेश धस हे महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट घेत आहेत.

सुरेश धस यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतरच महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास नव्याने सुरू झाला आहे. 

Feb 21, 2025 19:36 (IST)

१४ व्या मजल्यावरून पडल्याने २० वर्षीय कामगाराचा मृत्यू

नाशिक शहरातील गोविंद नगर मध्ये एका खाजगी बांधकाम साईटवरील चौदाव्या मजल्यावर सेन्टरिंगच काम करत असताना. लोखंडी प्लेट अंगावर पडून एका २० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साठे आठ वाजेच्या सुमारास घडली. विश्वजित विश्वास आस मृत्यू झालेल्या कामगाराच नाव आहे.या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहे.

Advertisement
Feb 21, 2025 19:32 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला सुरुवात 

बैठकीला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे अनुपस्थित 

भुजबळ एका लग्न समारंभामुळे अनुपस्थित तर मुंडे आजारी असल्यामुळे येणार नाहीत 

आजच्या बैठकीसाठी केवळ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार उपस्थित

Feb 21, 2025 17:44 (IST)

मुंबईचा दणदणीत पराभव करत विदर्भाची रणजीच्या अंतिम फेरीत धडक

मुंबईचा दणदणीत पराभव करत  विदर्भाची रणजीच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. उपात्य फेरीच्या सामन्यात शेटच्या दिवशी विदर्भाने मुंबईवर मात केली. 80 धावांनी विदर्भाने मुंबईचा पराभव केला. अंतिम फेरीत आता विदर्भाचा सामना केरळ बरोबर होणार आहे.  

Advertisement
Feb 21, 2025 16:50 (IST)

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीत उद्घाटन

98 वे अ. भा. मराठी  साहित्य संमेलनाचे उद्घाटन  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीत झाले.  या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. तर प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. दिल्ली जवळपास 70 वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होत आहे.  

Feb 21, 2025 15:38 (IST)

kalyan News : मृतदेहाच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लोकलच्या धडक

कल्याण : ट्रॅक लगत सापडलेल्या मृतदेहाच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लोकलच्या धडक,  सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गरजे असं जखमी रेल्वे पोलीस अधिकाऱ्याचे नाव, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तानशेत-खर्डी रेल्वे स्थानकादरम्यान घडली घटना

Advertisement
Feb 21, 2025 15:35 (IST)

आरोप झाले तर जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे; अण्णा हजारेंची नाव न घेता मुंडे-कोकाटेंवर टीका

राज्य सरकारमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान राज्यातील मंत्र्यांवर बोलताना अण्णा हजारेंनी नाव न घेता कोकाटे आणि मुंडेवर एक प्रकारे प्रहार केला आहे. मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.  कारण जनता हे आपल्याला बघून अनुकरण करत असते. तुम्हीच जर वाट सोडून चालला तर जनता कुठे जाणार, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. 

Feb 21, 2025 14:50 (IST)

राज ठाकरेंनी घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट

राज ठाकरेंनी घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट

मुंबईत जमिनीखालून जाणाऱ्या विविध खाजगी कंपन्यांच्या केबल्स आहेत. या कंपन्यांकडून पैसे का घेतले जात नाही, असा प्रश्न मी मांडला. महापालिकेच्या रुग्णालयांवर इतर राज्यांतून येणाऱ्या रुग्णांचा ताण मोठा आहे. इतर राज्यांमधून येणाऱ्या पेशंट्साठी काही वेगळे चार्ज लावता येईल का यावर चर्चा झाली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. 

Feb 21, 2025 14:50 (IST)

अंबरनाथच्या कचरा ठेकेदाराला सात महिने बिल नाही

अंबरनाथ शहरात कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला पालिकेनं तब्बल ७ महिने बिलच दिलेलं नाही. त्यामुळं सफाई कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले असून संतप्त कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी कामबंद आंदोलन पुकारलं. त्यामुळं पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

Feb 21, 2025 13:05 (IST)

कल्याण रेल्वे स्कायवॉकवर चोरट्याचा भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

कल्याण रेल्वे स्कायवॉकवर चोरट्याचा भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या स्कायवॉकवर दोन चोरट्यांनी दगडाचा हल्ला करत भाजी विक्रेत्याला गंभीर जखमी करून त्याच्या खिशातून 6 हजार रुपये आणि मोबाईल केला लंपास

हल्ल्यात सुरेश समर बहादूर सिंह नावाचा भाजी विक्रेता गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू 

याप्रकरणी कल्याण कोळसवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू

Feb 21, 2025 13:04 (IST)

कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात दोषारोप पत्र दाखल

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील लैगिंक अत्याचार आणि हत्या प्रकरणात ६० दिवसांनी १००६ पानांचे दोषारोप पत्र कल्याण न्यायालयात दाखल

आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांच्या विरोधात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी दोषाराेप पत्र कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात शुक्रवारी सकाळी दाखल केले

Feb 21, 2025 12:55 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पहिली कोअर कमिटीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पहिली कोअर कमिटीची बैठक 

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली 

संध्याकाळी ७ वाजता देवगिरी निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक 

कोअर कमिटीत अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांचा समावेश 

आजच्या बैठकीला धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित राहणार का याकडे लक्ष

Feb 21, 2025 12:06 (IST)

बुलडाण्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याची धमकी

बुलडाण्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याची धमकी  

पत्राद्वारे आमदार श्वेता महाले यांना धमकी

महाले यांची पोलिसांत तक्रार देणार ..

धमकीनंतर भाजपचे कार्यकर्ते  आक्रमक झाले

Feb 21, 2025 10:53 (IST)

प्रकाश आंबेडकरांची आज कोरेगाव भीमा आयोगासमोर पुन्हा चौकशी

प्रकाश आंबेडकरांची आज कोरेगाव भीमा आयोगासमोर पुन्हा चौकशी 

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली प्रकरणी आज पुन्हा प्रकाश आंबेडकरांचा जबाब नोंदवला जाणार 

आयोगासमोर प्रकाश आंबेडकर सादर करणार त्यांचा लेखी जबाब 

आयोगासमोर समोर जबाब देण्यासाठी प्रकाश आंबेडकर उपस्थित

आयोगाकडून प्रकाश आंबेडकरांची कोरेगाव भीमा प्रकरणी पुन्हा फेर चौकशी होणार 

याप्रकरणी याआधी देखील अनेक जणांची जबाब कोरेगाव भीमा आयोगाने नोंदवले आहेत 

प्रकाश आंबेडकरांनी देखील अनेकदा आयोगासमोर दिली आहे साक्ष

Feb 21, 2025 09:12 (IST)

पुण्यात मांजरीमध्ये स्पीकर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग

पुण्यात मांजरीमध्ये स्पीकर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग 

आज पहाटेच्या सुमारास कारखान्याला लागली आग 

आगीच कारण अद्याप अस्पष्ट 

सुदैवाने कोणीही जखमी नाही आणि जीवितहानी देखील नाही 

पुणे अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली

Feb 21, 2025 09:10 (IST)

अभिजित पवार यांचा दोनच दिवसात पुन्हा शरद पवार गटात प्रवेश

अभिजित पवार यांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश केला आहे.  दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अभिजीत पवार यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. अभिजीत पवार आणि हेमंत वाणी असे दोन जणांनी पक्षप्रवेश केला होता, त्यापैकी अभिजीत पवार यांची पुन्हा घरवापसी झाली आहे.

Feb 21, 2025 07:48 (IST)

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून राज्यभरात आजपासून २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ पर्यंत दहावीची परीक्षा

यंदा परीक्षेला १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसले आहेत. तर यामध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली, तर १९ ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत.

२३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. तर ५ हजार १३० मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार

Feb 21, 2025 07:47 (IST)

नालासोपाऱ्यातील संतोष भवन येथे लाखोंचा गुटखा जप्त

नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवनमध्ये एका गोदामावर तुळींज  पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने छापा मारून 3 लाख 12 हजार रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी सुफीयान सगीर शेख याला अटक करण्यात आले आहे. संतोष भवन येथील चौधरी कंपाऊंड मधील गोडाऊनमध्ये अवैधरित्या गुटखा साठवल्याची बातमी तुळींज पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती.  

Topics mentioned in this article