14 days ago

Breaking News : औरंगजेब कबर वादाचा फटका पर्यटनाला बसत असल्याचं समोर आलं आहे. खुलताबाद, वेरूळ येथील धार्मिक आणि पर्यटन स्थळावरील वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे. त्यामुळे पर्यटकांनी देखील येथे पाठ फिरवली आहे. मागील 15 दिवसांपासून जवळपास 100 हॉटेल व्यावसायिकांचे बुकिंग रद्द झाले आहे. 

Mar 22, 2025 21:36 (IST)

LIVE U[dates: राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांदा निर्यातीवरील 20% शुल्क रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.  या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांचे आभार मानले आहे.

कांद्याचे निर्यात शुल्क रद्द करण्याबाबत शासनाच्या वतीने वेळोवेळी पंतप्रधान त्याचप्रमाणे केंद्रीय सहकार मंत्र्यांना विनंती करण्यात आली होती 

या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना आता चांगला भाव आहे मिळू शकेल असेही उपमुख्यमंत्री म्हणतात

Mar 22, 2025 20:10 (IST)

Onion News: कांद्यावरील निर्यातशुक्ल हटवले, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

- एक एप्रिल पासून कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवले

- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी, निर्यातदारांना मोठा दिलासा 

- गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात जवळपास क्विंटल मागे एक हजार रुपयांची झाली होती घसरण

Mar 22, 2025 19:26 (IST)

IPL 2025: आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात, कोलकाताची पहिली बॅटिंग

आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असून कोलकाता आणि बंगळुरुच्या टीममध्ये सामना पार पडत आहे. पहिल्या सामन्यात बेंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाताचा संघ पहिली बॅटिंग करेल...

Mar 22, 2025 17:53 (IST)

LIVE Updates: प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा

कोरटकरच्या पत्नीकडून पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा

इंद्रजीत सावंतांनी कोल्हापूर पोलिंसांना अर्जाद्वारे केली होती विनंती

कोरटकर अद्यापही फरार असून दुबई गेल्याची आहे चर्चा 

नागपूरमधील पथकाकडे हा पासपोर्ट जमा झाल्यानंतर याबाबत पुढील कारवाई होईल

Advertisement
Mar 22, 2025 17:41 (IST)

LIVE Updates: कांद्याचे भाव गडगडले, शेतकऱ्यांची निराशा

मागील महिन्यात कांद्याला मिळत असलेला 30 ते 32 रुपये भाव या महिन्यात गडगडला असून, पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील  नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज झालेल्या लिलावामध्ये कांद्याला शंभर किलोला चारशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान बाजार मिळालाय.एक नंबरच्या कांद्याला 1550 तर चार नंबरच्या कांद्याला चारशे रुपयांचा भाव मिळाला आहे. 

Mar 22, 2025 17:07 (IST)

Raigad News: रायगडमध्ये ठाकरेंना धक्का, स्नेहल जगताप घड्याळ बांधणार

रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Advertisement
Mar 22, 2025 17:07 (IST)

Raigad News: रायगडमध्ये ठाकरेंना धक्का, स्नेहल जगताप घड्याळ बांधणार

रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 22, 2025 16:56 (IST)

LIVE Updates: छगन भुजबळ- उज्वल निकम यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा

जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम छगन भुजबळ यांच्या भेटीला 

छगन भुजबळ व उज्वल निकम यांच्यात बंद द्वार चर्चा सुरू 

छगन भुजबळ व उज्वल निकम यांच्यात नेमकी काय चर्चा सुरू याबाबत सस्पेन्स

Advertisement
Mar 22, 2025 16:17 (IST)

LIVE Updates: उद्धव ठाकरेंनी दोन फोन केले.. नारायण राणेंचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे यांनी मला फोन करुन दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेऊ नका.. अशी विनंती केली होती. तसेच चित्रा वाघ एकट्या नाहीत, त्यांच्यामागे संपूर्ण भाजप आहे.. असा इशारा नारायण राणेंनी म्हटले आहे. 

Mar 22, 2025 15:59 (IST)

LIVE Updates: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, 6 जूनला करणार मोठी घोषणा

माझ्या नादाला लागायचं नाही. समाजाशी दगा फटका केला तर तुमच्या आनंदावर विर्जन टाकीनं. असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय.. जरांगे यांनी आज मराठा सेवकांची पहिल्या टप्प्यातील बैठक घेतली. समाजच्या समस्या सोडवण्यासाठी गाव पातळीवर मराठा सेवकाची निवड करण्यात येणार आहे.. राज्यभरातल्या सेवकांची निवड झाल्यानंतर याची 6 जूनला जरांगे घोषणा करणार आहेत.. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय.. 

Mar 22, 2025 15:57 (IST)

Beed News: बीड पोलिसांकडून आणखी एका गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई

बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत आणखी एका गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी हरसुल कारागृहात केलीय.

अंबाजोगाई येथील क्रांतीनगर भागात राहणाऱ्या मोहन दौलत मुंडे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी 4 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी हा प्रस्ताव पारित करून याबाबतचे आदेश दिले आहे. 

Mar 22, 2025 15:18 (IST)

LIVE Updates: मंत्री जयकुमार गेोरेंच्या खंडणी प्रकरणातील महिलेला 3 दिवसांची कोठडी

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणात संबंधित संशयित महिलेला 24 मार्च पर्यंत म्हणजेच 3 दिवसाची सातारा जिल्हा न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.काल स्थानिक गुन्हे शाखेने 1 कोटीची खंडणी स्वीकारताना या महिलेला अटक केली होती. 

Mar 22, 2025 15:16 (IST)

LIVE Updates: उल्हासनगरात घराबाहेर उभी असलेली दुचाकी जाळली

उल्हासनगरात घराबाहेर उभी असलेली दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी जाळल्याची घटना घडली आहे. कॅम्प 4  मधील ओटी सेक्शनमध्ये हा प्रकार घडला.

या भागातील महात्मा फुले नगरमध्ये संजय सोनावणे हे परिवारासह वास्तव्याला आहेत. ते त्यांची दुचाकी परिसरातील विजय सिंग यांच्या घराबाहेर दररोज लावतात. 22 मार्च रोजी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुचाकी लावली आणि ते घरी गेले. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला कुणीतरी अज्ञातांनी आग लावली. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी आग विझवली, मात्र तोपर्यंत दुचाकीचं मोठं नुकसान झालं.

Mar 22, 2025 15:15 (IST)

LIVE Updates: आमदार सुरेश धस यांच्या विरोधात 26 तारखेला विधान भवना बाहेर आत्मदहन करणार

भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज सदाशिव चौधरी यांनी गंभीर आरोप केले आहेत. आष्टी मतदार संघात धस यांच्या विरोधात जो व्यक्ती काम करतो त्यांच्यावर दहशत माजविण्याचे काम केले जाते.

उच्च न्यायालयात सुरेश धस यांच्यासह इतर 38 कार्यकर्त्यांवर कलम 395 नुसार खटला सुरू आहे. मात्र पोलीस आमदार धस यांना या प्रकरणात पाठीशी घालत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला. 

Mar 22, 2025 15:13 (IST)

Nandurbar News: नंदुरबारच्या शहादा येथील वनविभागाच्या कार्यालयालगत असलेल्या आगाराला लागली भीषण आग

- नंदुरबारच्या शहादा येथील वनविभागाच्या कार्यालयालगत असलेल्या आगाराला लागली भीषण आग...

- आगीत वखारीमधील जप्त करुन साठवण केलेली लाकड जळून होत आहे खाक..

- अर्धातास उशीराने आलेल्या शहादा पालीकेच्या एकमेव अग्निशामक दलाच्या बंबाद्वारे आग विझवण्याचे काम सुरु...

 

- वनविभागाचे मजुर आग न लागलेल्या लाकडांचे गंजे हटवण्याचे करत आहे. काम...

- परिसरात मोठ्या प्रमाणत सुके गवत असल्याने आग वाढत असल्याचे चित्र...

- आगीचे कारण अस्पष्ट, वनविभागाचे वडे अधिकारी अनुस्पस्थित...

Mar 22, 2025 15:13 (IST)

Nashik News: पत्नीचे अपहरण करणाऱ्या पतीला तीन दिवसाची पोलिस कस्टडी

नाशिकच्या तालुक्यातील वावी पांगरी येथील कल्याणी दळवी ह्या विवाहितेचे अपहरण केल्याची फिर्याद नाशिकच्या वावी पोलीस स्टेशन येथे दाखल झाली असून  घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे

घटना अशी आहे की पत्नी ८ मार्च रोजी माहेरून निघून आली होती त्यानंतर पतीने तिला सासू सोबत पायी  जात असताना पती वैभवने पांगरी येथून 19 मार्चला पत्नीचे अपहरण केले आणि संगमनेर मार्गे शिर्डी कडे रवाना होत असताना तेथील पोलिसांच्या सहकार्याने पतीला अटक करण्यात आली आणि पतीला पुन्हा पांगरी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले

यामध्ये पती वैभव दळवीला अटक करून त्याच्यावर पत्नीला अपहरण करण्याचा गुन्हा करण्यात आला असून यामध्ये पती वैभव देवरे व त्याच्या मित्रांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास वावी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत 

Mar 22, 2025 13:22 (IST)

प्रशांत कोरटकर विरोधात लुक आउट नोटीस, कोल्हापूर पोलिसांकडून माहिती

प्रशांत कोरटकर विरोधात लुक आउट नोटीस, कोल्हापूर पोलिसांकडून माहिती

कोल्हापूर पोलिसांच पथक चंद्रपूरहून नागपूरला रवाना 

प्रशांत कोरटकरचा तपास घेण्यासाठी गेलेलं पथक रिकाम्या हाती परतलं 

चंद्रपूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये कोरटकर होता तेथून CCTV फुटेज घेऊन तपास सुरु 

CCTV वरून कोरटकरचा तपास घेण्याचा प्रयत्न सूरु

Mar 22, 2025 13:19 (IST)

Nagpur News : नागपूर हिंसाचारात जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

नागपूर हिंसाचारात जखमी इरफान अंसारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इरफान अंसारी हे सोमवार नागपूरच्या हंसापुरी परिसरातून गितांजली टॉकीज चौकातून रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडण्यासाठी जात होते. अचानक हिंसाचार सुरु झाला. संतप्त जमावाने इरफान अंसारी यांना मारहाण केली. यात अंसारी जखमी झाले होते. या घटनेनंतर अंसारी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. 

Mar 22, 2025 11:54 (IST)

दिशा सालियन मृत्यू प्रकरण, 2 एप्रिलला उच्च न्यायालयात खटला चालवणार

दिशा सालियन मृत्यू प्रकरण

दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती 

या याचिकेला उच्च न्यायालयाने काल ग्राह्य धरले होते 

2 एप्रिल रोजी उच्च न्यायालयासमोर हा खटला चालवण्यात येईल 

मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांच्यासमोर हा खटला चालवला जाणार असल्याची माहिती

Mar 22, 2025 11:47 (IST)

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली आहे. दादर शिवाजी पार्क मैदानात येत्या 30 तारखेला मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Mar 22, 2025 10:38 (IST)

Sangli News : बापाकडूनच लेकीवर बलात्काराचा संशय, नराधम गजाआड

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी परिसरातील एका गावात अत्यंत गृन्हास्पद आणि मानवतेला कायमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या 13 वर्षाच्या लेकीवर बापानेच अत्याचार केल्याचं घटना उघडकीस आली आहे.  तर संशयित आरोपी फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर  पोलिसांनी नराधमास गजाआड केले आहे. 

Mar 22, 2025 10:34 (IST)

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत भर

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत भर. कोकाटे यांच्यासह नाशिक जिल्हा बँकेच्या 25 माजी संचालकांना बँकेकडून नोटीस.  25 पैकी अनेक जण नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षाचे बडे राजकीय नेते. खासदार शोभा बच्छाव, आमदार दिलीप बनकर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार राहुल ढिकले, आमदार डॉक्टर राहुल आहेर या सर्वांना नोटीस. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींची अनियमितता प्रकरणी नोटीस. कलम 88 अंतर्गत अडीच वर्षाची चौकशी केल्यानंतर संशयास्पद कर्ज वितरित केल्याप्रकरणी 15 अधिकारीही अडचणीत येणार. दोन एप्रिलला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार असून सर्वांना हजर राहण्याच्या सूचना.

Mar 22, 2025 08:28 (IST)

हळदीच्या दरात मोठी वाढ, शेतकऱ्यांना दिलासा

पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला कमाल १०,३२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र, शुक्रवारी हा दर १३,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला. म्हणजेच अवघ्या आठवडाभरात हळदीच्या दरात तब्बल १,७०० रुपयांची वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणासह प्रमुख हळद उत्पादक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असली तरीही, वाशिम बाजार समितीत दरवाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र, आता वाढलेल्या दरामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हळदीच्या दरातील ही वाढ पुढील काळातही टिकून राहील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mar 22, 2025 08:28 (IST)

हळदीच्या दरात मोठी वाढ, शेतकऱ्यांना दिलासा

पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला कमाल १०,३२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र, शुक्रवारी हा दर १३,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला. म्हणजेच अवघ्या आठवडाभरात हळदीच्या दरात तब्बल १,७०० रुपयांची वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणासह प्रमुख हळद उत्पादक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असली तरीही, वाशिम बाजार समितीत दरवाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र, आता वाढलेल्या दरामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हळदीच्या दरातील ही वाढ पुढील काळातही टिकून राहील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mar 22, 2025 08:26 (IST)

नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आणखी दोघांना अटक

नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आणखी दोघांना अटक

मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियरला अटक 

युट्युबर मोहम्मद सहजाद खान यालाही पोलिसांकडून अटक

Topics mentioned in this article