Latur Video: 'पायताणाने हाणीन, बापाला फोन लाव...', महिला कॉन्स्टेबलने मुलींना भररस्त्यात मारलं

Latur Female Traffic Police Constable Viral Video: एकाच स्कुटीवर बसून भरधाव वेगात जात होत्या. महिला पोलिसाने हात दाखवला तरी त्या थांबल्या नाहीत,मग काय पोलिस महिलेने मुलींचा पाठलाग करून त्यांना पकडले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Latur Women Traffic Police Viral Video: बेदरकारपणे ट्रीपल सीट गाडी पळवणाऱ्या तीन मुलींना महिला पोलीस कॉन्स्टेबलने चांगलेच धारावर धरले. अकोला शहरातील मुख्य चौकात हा प्रकार घडला असून ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ट्रीपल सीट बसून मुलींनी गाडी पळवल्याने या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संताप अनावर झाला. यावेळी त्यांनी मुलींना मारहाण करत शिवीगाळही केली. या घटनेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लातूर शहरातल्या एका  महिला ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ट्रीपल सीट जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करून या ट्रॅफिक पोलिस महिलेने या मुलींना शिव्या घालत फटकेही दिले. लातूर शहरातल्या जुना रेणापूर नाका भागात तीन मुली एकाच स्कुटीवर बसून भरधाव वेगात जात होत्या. महिला पोलिसाने हात दाखवला तरी त्या थांबल्या नाहीत,मग काय पोलिस महिलेने मुलींचा पाठलाग करून त्यांना पकडले.

मुलींना पकडल्यानंतर महिला कर्मचाऱ्याने संतापाच्या भरात मुलांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. 'जीव उदार झाला आहे का तुला? तु मरशील अन् आणखी दोघांना घेऊन मरशील. तुझ्या बापाला फोन लाव. बेवारशी आहेस का? अशा भाषेत मुलींना जाब विचारला. घाबरलेल्या मुली चूक झाली माफ करा म्हणत होत्या, यापुढे असं करणार नाही, असं सांगत होत्या. मात्र महिला पोलीस कर्मचारी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.

मलाही दोन मुली आहेत, तुम्हाला वाकडं बसायची काय गरज होती? असं म्हणत त्यांनी मुलींच्या कानाखालीही लगावल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या मुली अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे मुलींच्या बेजबाबदारपणावरुन टीका होत असतानाच महिला पोलीस कर्मचाऱ्याने मुलींना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने, सर्वांमोर अपशब्द वापरल्याने  नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Praniti Shinde:'खासदार प्रणिती शिंदेंना चपलेने मारा, पळवून लावा' वादग्रस्त वक्तव्य करणारा नेता कोण?