Latur News: किती ते दुर्दैव! प्रसुतीसाठी रुग्णालयात गेले, डॉक्टरांनी 18 तास थांबवलं, आईसह बाळाचा मृत्यू

वेळेत उपचार न मिळाल्याने तसेच डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे या गरोदर महिलेसह मुलाचाही मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

त्रिशरण मोहगावकर, लातूर:

Latur News:  लातुरमध्ये  गरोदर महिलेसह मुलाचाही मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घटना समोर आली आहे. अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने तसेच डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे या गरोदर महिलेसह मुलाचाही मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणावरुन नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील धानोरा खुर्द येथील दिपाली दयानंद वाघमारे या महिलेला डिलीव्हरीसाठी ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला डॉक्टरांनी ॲडमिट करून घेत नॉर्मल डिलिव्हरी करू असे सांगितले. मात्र नंतर सिझेरीयन करावे लागेल असे सांगत लेबर रूममध्ये घेऊन गेले.

Sangli Politics: काँग्रेसला खिंडार! 2 माजी महापौरांसह 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नातेवाईकांचा संताप

मात्र त्यानंतरही ग्रामीण रुग्णालयाने गरोदर महिलेला लातूर शासकीय रुग्णालयात रेफर केले. याचदरम्यान रस्त्यात महिलेसह महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला.  रुग्णालयाने तब्बल 18 तास थांबवून ठेवले आणि नंतर रेफर केले, त्यामुळे उपचारात उशिर झाला. त्यामुळे डॉक्टरांनीच हलगर्जी केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनमधे ठिय्या घातला. दरम्पान पोलीसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी माघार घेतली. 

Manikrao Kokate : कोकाटेंचा गेम ओव्हर ! मुख्यमंत्र्यांनी पंख छाटले, अटक वॉरंटनंतर झाला मोठा निर्णय