Latur News : सामाजिक कार्यकर्त्या राधिका पाटील यांचा विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न, पोलिसांवर गंभीर आरोप

लातूरमध्ये सामाजिक कार्यकर्त्या राधिका पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली. पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Latur Radhika Patil Suicide Attempt Case

विष्णू बुरगे, प्रतिनिधी 

Latur Radhika Patil News : लातूरमध्ये सामाजिक कार्यकर्त्या राधिका पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली. पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.हे कृत्य करण्याआधी त्यांनी व्हिडीओ बनवत काही पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याची माहिती आहे.वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने त्या प्रशासनाविरोधात प्रचंड नाराज होत्या.दरम्यान,पाटील यांना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

मागील काही वर्षांपासून राधिका पाटील लातूर जिल्ह्यात समाजसेवचं काम करत होत्या. अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला होता.नागरिकांच्या तक्रारी शासनाकडे पोहोचवण्याचंही कामही त्या करायच्या. तसच ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या सक्रिय राहायच्या. विविध आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला आहे.त्यांची राजकीय कारकीर्दही चर्चेत राहिली आहे.तसच त्यांनी निवडणुकाही लढवल्या आहेत.  

Advertisement

नक्की वाचा >> Satara News : सातारा-पुसेगाव मार्गावर फॉर्च्युनर आणि बोलेरोची समोरासमोर धडक, 10 वारकरी महिलांसोबत भयंकर घडलं

आठ वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

जवळपास आठ महिन्यांपूर्वी काही मुलींना मारहाण झाल्याची घटना घडल्याची माहिती होती.त्यामुळे त्यांनी पीडित मुलींची बाजू मांडण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं होतं. पण त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला.त्यानंतर त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला,अशी माहिती आहे.पोलिसांनी त्यांच्यावर खोटो गुन्हे दाखल केल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 

नक्की वाचा >> Akola News: बार्शीटाकळीत संताप! 'या' सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांसमोर अंगावर पेट्रोल ओतलं अन्..प्रकरण काय?