Mumbai Congress : विधिमंडळाच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र या अधिवेशनात काँग्रेस आमदारांची घुसमट दिसून येत आहे. काँग्रेसचे आमदार नाराज असून कुठल्याच चर्चेत सहभागी करून घेतलं जातं नसल्याने नाराज आहेत. एकीकडे एकजूट दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा सुरू असताना काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत कलह वारंवार समोर येत आहे.
काँग्रेस पक्षात सध्या जोरदार नाराजीनाट्य सुरू आहे. दिल्लीत पक्षश्रेष्टींकडे तक्रार ते थेट विधानभवनापर्यंत हे नाराजी नाट्य सुरू आहे. काही आठवड्यांपूर्वी दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या विरोधात तक्रार केल्या गेल्या. मात्र इथे विधान भवनात आमदारांची वेगळीच गळचेपी सुरू असलेली पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा - MNS Protest: "मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली?" CM फडणवीस यांचा पोलिसांवर संताप
विधिमंडळाचे गटनेते विजय आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले आमदारांना कुठल्याच चर्चेत सहभागी करून घेत नाहीत आणि सभागृहात बोलूनही देत नसल्याचा आरोप काही आमदारांनी केला आहे. मात्र केवळ वरिष्ठ आमदारांना नाही तर नवोदित आमदारांना देखील काँग्रेस कायम संधी देत असतं आणि जे उपस्थित नाहीत त्यांच्याकडून असे आरोप केले जात असल्याचे विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मात्र पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण परिस्थिवर सारवासारव करत विधानसभा अध्यक्ष यांच्यावर नाव ढकललं. या संदर्भात उद्या विजय वडेट्टीवार यांनी बैठक देखील बोलवल्याची माहिती मिळत आहे. उद्याच्या बैठकीत आमदारांची नाराजी दूर होते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.