भाजप आमदार योगेश टिळेकरांच्या मामाच्या हत्येचं गूढ उकललं, धक्कादायक माहिती समोर

सतिश वाघ यांचा मृतदेह सापडल्यानंतर अनेक प्रश्न उभे राहिले होते. अखेर त्यावर पडदा पडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

9 डिसेंबर रोजी पुणे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर पुण्यात खळबळ उडाली होती. त्याच्या दोन दिवसांनी आलेल्या बातमीने तर सर्वांना धक्काच बसला. सतिश वाघ यांचा मृतदेह सापडल्यानंतर अनेक प्रश्न उभे राहिले होते. अखेर त्यावर पडदा पडला आहे. त्यांच्या हत्येचं गूढ उकललं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - पुणे हादरलं! आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडला 

9 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास सतिश वाघ सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले होते. तेव्हा एक चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं होतं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला होता.

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून वैयक्तिक कारणातून झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना मारण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचं तपासातून समोर आले आहे. हा खून खाजगी आणि वैयक्तिक कारणातून केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. याप्रकरणी 5 पैकी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली. त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण घटनेबाबत सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिलं आहे. 
 

Advertisement