Lilavati Hospital : लिलावती रुग्णालयात Black Magicचा आरोप; जमिनीत पुरलेल्या वस्तू पाहून विश्वस्त हादरले!

काळी जादू व्यतिरिक्त लिलावती रुग्णालयात तब्बल 1200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप रुग्णालयाचे संचालक प्रशांत मेहता यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Black Magic in Lilavati Hospital : मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध रुग्णालयांपैकी एक असलेल्या लिलावती रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लिलावती रुग्णालयामध्ये तब्बल 1200 कोटींचा घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर आता एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. लिलावती हे सेलिब्रिटींचं रुग्णालय म्हणून ओळखलं जातं. वांद्र्यातील या प्रसिद्ध रुग्णालयात काळी जादू केल्याचा आरोप केला जात आहे. लिलावती रुग्णालय ट्रस्टचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. विशेष म्हणजे ब्लॅक मॅजिक केल्याचे काही पुरावे सापडल्याचं विश्वस्तांचा म्हणणं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माजी विश्वस्तांनी रुग्णालय परिसरात सध्याच्या विश्वस्त बोर्डाविरोधात काळी जादू केली होती. या रुग्णालयात जमिनीखाली आठ कलश आढळले. या कलशात माणसांची हाडं आणि केस आहेत. याशिवाय काळी जादू करण्यासाठी ज्या गोष्टींचा वापर केला जातो तशा वस्तू जमिनीखाली आढळून आल्या आहेत. लिलावती रुग्णालयाच्या सध्याच्या विश्वस्तांच्या कार्यालयाच्या जमिनीखाली हे सर्व कलश आढळून आले आहेत. विश्वस्तांवी या प्रकरणाबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. यानंतर रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणात वांद्रे कोर्टाचं दार ठोठावलं आहे. कोर्टाने याची दखल घेतली आहे.   कोर्टाकडून या प्रकरणात तपासाचे आदेश दिले आहेत. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Lilavati Hospital Scam : मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये 1200 कोटींचा घोटाळा, संचालकांचाच खळबळजनक आरोप

काळी जादू व्यतिरिक्त लिलावती रुग्णालयात तब्बल 1200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप रुग्णालयाचे संचालक प्रशांत मेहता यांनी केला आहे. त्यांनी रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांनीच ही अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. लिलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने या प्रकरणात वांद्रे पोलिसांसह अंमलबजावणी संचालनालय (ED) कडे देखील तक्रार केली आहे. निधीच्या अभावामुळे दररोज हॉस्पिटलमधील हजारो रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होत आहे, अशी तक्रार या ट्रस्टनं केली आहे. 

Advertisement