8 hours ago
मुंबई:

राज्यभरात प्रचाराचं वारं वाहत आहे. 6 नोव्हेंबर रोजी मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या पाच गॅरंटीची घोषणा करण्यात आली. दरम्यान आज दिवसाची सुरुवात शरद पवार यांच्या विदर्भ दौऱ्यातील सभेने होणार आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांचीही विदर्भात सभा आहे. देवेंद्र फडणवीस आज दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघात बैठका घेतील. नंतर यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे जाहीर सभा. दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा मतदारसंघात पवनी येथे सभा घेतील. आदित्य ठाकरे यांची दुपारी 4 वाजता कन्नड सोयगांव - विधानसभा मतदार संघातील पिशोर येथे, तर सायंकाळी 6 वाजता वैजापूर - गंगापुर विधानसभा मतदार संघातील शिवूर येथे जाहीर सभा संपन्न होणार आहे.

Nov 07, 2024 14:05 (IST)

Live Update : प्रियंका गांधी 13-16-17 तारखेला महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात सहभागी होणार

प्रियंका गांधी 13-16-17 तारखेला महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात सहभागी होणार

राहुल गांधी 4 दिवस राज्यातील प्रचारात सहभागी होणार

13-14-17-18 मल्लिकार्जुन खर्गे राज्यात प्रचार करणार

10 तारखेला मुंबईत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. 

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते मविआ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार

Nov 07, 2024 13:40 (IST)

Live Update : सलमान खाननंतर शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी

सलमान खाननंतर शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Nov 07, 2024 13:02 (IST)

Live Update : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

अमरावती जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या तीन ठिकाणी जाहीर सभा...

अमरावतीच्या दर्यापूर वलगाव बडनेरा येथे ठाकरेंच्या जाहीर सभा...

शिवसेनेचे सुनील खराटे, गजानन लवटे तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या प्रचारासाठी ठाकरे घेणार सभा...

Nov 07, 2024 13:01 (IST)

Live Update : भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ सभा

Advertisement
Nov 07, 2024 13:00 (IST)

Live Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आक्रमक

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आक्रमक 

महायुतीचे सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर पुण्यात मविआ आक्रमक 

सदाभाऊ खोत यांची पत्रकार परिषद ज्या ठिकाणी होणार होती तिकडे जोरदार घोषणाबाजी 

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे देखील उपस्थित

Nov 07, 2024 10:59 (IST)

Live Update : ठाकरे गटाच्या वचननाम्याचं प्रकाशन

Advertisement
Nov 07, 2024 09:34 (IST)

Live Update : बाळापूर मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची जाहीर सभा

गुवाहाटीवरून परतलेल्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या बाळापूर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांचीही आज जाहीर सभा होणार आहे. दोनही नेत्यांची बाळापूर मतदारसंघातल्या वाडेगाव येथे सभा होणार आहे. त्यामुळे सभेला विशेष लक्ष लागून असणार आहे.  

आज 7 नोव्हेंबरला वाडेगाव येथे दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आहे. तर संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. 

बाळापुर मतदारसंघातून एकनाथ शिंदे या गटाचे बळीराम सिरस्कार हे उमेदवार आहेत.. तर उद्धव ठाकरे गटाकडून नितीन देशमुख हे उमेदवार आहेत. एकाच दिवशी आणि एकाच गावात दोन्ही गटाच्या शिवसेनेच्या जाहीर सभा होणार आहे..

Nov 07, 2024 09:14 (IST)

Live Update : अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाची चाचणी

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव मोठं वैशिष्ट्य आहे. वर्षातून दोनवेळा हा किरणोत्सव होतो. देवीच्या गाभाऱ्यातील मुख्य मूर्तीपर्यंत सूर्याची किरणे पोहचत असल्यानं मंदिराची स्थापत्यशैली प्रसिद्ध आहे. यंदा मंदिर आवारातील गरुड मंडपाच्या कमानीचा अडथळा दूर झाल्याने मावळतीच्या सूर्यकिरणांची तीव्रता चांगलीच वाढल्याच किरणोत्सवाच्या चाचणीत दिसून आलं. देवीचा किरणोत्सव उद्यासापासून सुरू होतोय. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या चाचणीत सूर्यकिरणे मूर्तीच्या चरणांखाली असलेल्या कटांजनपर्यंत पोहोचली. आज सूर्यकिरणे चरणस्पर्श करतील, अशी शक्यता आहे.

Advertisement
Nov 07, 2024 09:13 (IST)

Live Update : सोयाबीनच्या दरात 200 रुपयांची घट; शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान थांबेना

लातूरच्या उच्चतम बाजार समितीत दीपावलीच्या पाडव्यापासून सोयाबीनची अवाक दुप्पट झाली आहे.  त्यामुळे बाजार समितीत मोठी गर्दी होताना दिसत आहे. दरम्यान दोन दिवसापासून सर्वसाधारण दरात घसरण झाली आहे. 200 रुपयांनी सोयाबीनच्या भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बाजार समितीत सर्वसाधारण दर स्थिर असला तरी किमान दरात जवळपास मिळत आहे.. सोयाबीनला 4 हजार 892 रुपये हमीभाव आहे.. परंतु प्रत्यक्षात सर्वसाधारण दर 4 हजार 400 रुपये पर्यंत होता. मात्र आता आणखीन 200 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

Nov 07, 2024 09:11 (IST)

Live Update : पत्नीस कार शिकवताना मोठा अपघात, पती-पत्नी दोघे जखमी

नाशिक येवल्याच्या नाशिक-संभाजीनगर महामार्गावर पत्नीस कार चालवण्याचे प्रशिक्षण देत असताना  पत्नीचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. या अपघातात दोघे पती-पत्नी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आला आहे.

Nov 07, 2024 09:11 (IST)

Live Update : पत्नीस कार शिकवताना मोठा अपघात, पती-पत्नी दोघे जखमी

नाशिक येवल्याच्या नाशिक-संभाजीनगर महामार्गावर पत्नीस कार चालवण्याचे प्रशिक्षण देत असताना  पत्नीचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. या अपघातात दोघे पती-पत्नी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आला आहे.