9 hours ago
मुंबई:

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला आहे. मतदानाला अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. 20 नोव्हेंबरला राज्यभरात मतदान पार पडेल. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून सरकार कार्यालयांमध्ये मतदानाची दिवशी सु्ट्टी देण्यात आली आहे. उद्या मतदान असल्याने पोलीस अलर्ट मोडवर असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. 

Nov 19, 2024 16:00 (IST)

Live Update : विनोद तावडेंवर गुन्हा दाखल, पैसे वाटल्याच्या आरोपानंतर मोठी कारवाई

विनोद तावडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपानंतर पोलिसांकडून  मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

Nov 19, 2024 15:51 (IST)

Live Update : उद्या राज्यभरातील आठवडी बाजार बंद

छत्रपती संभाजीनगर :  

उद्या राज्यभरातील आठवडी बाजार बंद

विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आठवडी बाजार उद्या बंद 

आठवडी बाजार बंदचे स्थानिक प्रशासनाने काढले पत्रक

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

Nov 19, 2024 15:50 (IST)

Live Update : मतदार ओळखपत्र नसेल तर मतदान करताना कोणते पुरावे सोबत ठेवाल?

Nov 19, 2024 15:46 (IST)

Live Update :डहाणू विधानसभेत बहुजन विकास आघाडीला खिंडार, सुरेश पाडवींची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी

डहाणू विधानसभेत बहुजन विकास आघाडीला खिंडार. डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांचा डहाणू विधानसभेचे भाजप उमेदवार विनोद मेढा जाहीर पाठिंबा. मतदानाच्या एक दिवस आधीच माघार घेत भाजपला पाठिंबा. भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचे उपस्थितीत पाठिंबा. सुरेश पाडवी यांची भाजपमध्ये पुन्हा घर वापसी.

Advertisement
Nov 19, 2024 14:30 (IST)

Live Update : भाजप उमेदवार राजन नाईक यांना बहुजन विकास कार्यकर्त्यांकडून मारहाण

भाजप उमेदवार राजन नाईक यांना बहुजन विकास कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. 

Nov 19, 2024 14:25 (IST)

Live Update : विरार पैसे वाटप प्रकरणात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार

विरार पैसे वाटप प्रकरणात उद्धव ठाकरे आज सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार

Advertisement
Nov 19, 2024 14:23 (IST)

Live Update : विनोद तावडेंच्या त्या डायरीत काय आहे?

विनोद तावडेंच्या त्या डायरीत काय आहे?

हितेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या डायरीमध्ये पैसे वाटप केल्याचा उल्लेख आहे. 

Nov 19, 2024 14:12 (IST)

Live Update : विरारमध्ये मोठा राडा

विरार पैसे वाटप प्रकरण : विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्यामध्ये चर्चा 

Advertisement
Nov 19, 2024 14:09 (IST)

Live Update : विरार पैसे वाटप प्रकरणातील मोठी अपडेट, दोन गटांमध्ये मारहाण

विरार पैसे वाटप प्रकरणातील मोठी अपडेट, दोन गटांमध्ये मारहाण

Nov 19, 2024 14:00 (IST)

Live Update : हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची प्रकृती कशी आहे?

अनिल देशमुख यांना रात्री मॅक्स रुग्णालय दाखल केले. त्यानंतर न्यूरोसर्जन डॉ. आदित्य अटल यांनी तपासणी केली. तसेच मेंदूचे सिटीस्कॅनमध्ये परिणाम सामान्य आहे. प्रकृती स्थिर असल्याचं मेडिकल बुलेटिनमधून सांगण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर देशमुखांच्या कपाळावर जखम होती.  डोके दुखी, चक्कर येणे, रक्तदाब नोंदवण्यात आला होता. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Nov 19, 2024 13:52 (IST)

Live Update : भाजपचा खेळ खल्लास! - संजय राऊत

Nov 19, 2024 12:04 (IST)

Live Update : काँग्रेस प्रवक्त्यांची तक्रार, शिंदे गटाला पुढील 24 तासात म्हणणं मांडण्याचे आदेश...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये शिंदे गटाकडून जाहिरात केली जात असल्याची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. त्यावर आता निवडणूक आयोगाने दखल घेऊन शिंदे गटाच म्हणणं पुढील 24 तासात मांडण्याचे आदेश दिले आहेत

Nov 19, 2024 11:32 (IST)

Live Update : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू, ब्रीद वाक्यांचा वापर करत फ्लेक्सची उभारणी

पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू, ब्रीद वाक्यांचा वापर करत फ्लेक्सची उभारणी

प्रचाराची वेळ उलटून गेल्यानंतरसुद्धा उमेदवारांकडून सांकेतिक प्रचार अजूनही सुरूच

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार काल संध्याकाळी ६ पर्यंतच राज्यातील उमेदवारांना प्रचार करण्याची होती परवानगी

मात्र आज पुणे शहरातील अनेक ठिकाणी फ्लेक्स लावून अप्रत्यक्षपणे प्रचार केला जात असल्याचे समोर आले आहे

शहरातील अनेक ठिकाणी लागलेल्या या फ्लेक्सवर निवडणूक आयोग काय कार्यवाही करणार हे पाहणे महत्वाचे

Nov 19, 2024 11:30 (IST)

Live Update : मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 133 बसेसची व्यवस्था

नांदेड जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणुकीसह नऊ विधानसभा मतदार संघासाठी उद्या मतदान होणार आहे मतदान केंद्रावर जाणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांसाठी 133 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Nov 19, 2024 10:34 (IST)

Live Update : नवी मुंबईच्या मेट्रोची वर्षपूर्ती, प्रवासी भाड्यातून 12 कोटींचे उत्पन्न

नवी मुंबईच्या मेट्रोची वर्षपूर्ती, प्रवासी भाड्यातून 12 कोटींचे उत्पन्न

वर्षभरात 50 लाख प्रवाशांनी मेट्रोने केला प्रवास

नवी मुंबई मेट्रोला एक वर्ष पूर्ण झाले. प्रवासी भाड्यातून सिडकोला वर्षभरात १२ कोटी उत्पन्न प्राप्त झाले आहे. तसेच वर्षभरामध्ये 50 लाख प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केलेला आहे तसेच मेट्रोचे तिकिटाचे दर सुद्धा कमी करण्यात आले होते त्यामुळे मेट्रोला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाल्याच्या दिसून येत आहे

Nov 19, 2024 10:32 (IST)

Live Update : नाशिककर गारठले, पारा 12.7 अंशावर..

नाशिकमध्ये एकीकडे राजकीय वातावरण चांगलंच तापलेले असताना दुसरीकडे तापमानाच्या पाऱ्यातही घसरण झाल्याने नाशिककर चांगलेच गारठल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कालच्या तुलनेत आज पारा 3 अंशांनी खाली आला असून 12.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुलाबी थंडी आता बोचरी वाटू लागल्याने गेल्या वर्षभरापासून कपाटात ठेवलेले स्वेटर्स बाहेर आले आहेत. 

Nov 19, 2024 08:25 (IST)

Live Update : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपलाय... गेल्या महिनाभरापासून राज्याच्या कानाकोपऱ्यात धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहेत.. महाराष्ट्रात पुढच्या 36 तासांनतर म्हणजेच 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे...  288 विधानसभा मतदारसंघांमधल्या उमेदवारांचं भविष्य 20 तारखेला मतपेटीत बंद होणार आहे.. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालनंतर विधानसभेच्या सर्वाधिक जागा असलेलं महाराष्ट्र हे 3 नंबरचं राज्य आहे.. त्यामुळं राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसोबत काही छोट्या पक्षांनीही या निवडणुकीत मोठी ताकद लावलीय..  आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार आणि अजित पवारांची बारामतीत वेगवेगळी सभा झाली. तर देवेंद्र फडणवीसांची वर्ध्यातल्या आर्वीमध्ये सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईत मुंबादेवीमध्ये रोड शो केला... उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वमध्ये सांगता सभा घेतली तर राहुल गांधींनीही मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला

Nov 19, 2024 08:21 (IST)

Live Update : विधानसभा निवडणुकीत एका मतासाठी दीड हजार रुपये दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार

Nov 19, 2024 08:20 (IST)

Live Update : मराठवाड्यात कोणत्या नेत्यांचे किती सभा?

विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या 118 सभा झाल्या आहे. ज्यात महायुतीच्या 64 आणि महाविकास आघाडीच्या 54 सभा झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा मराठवाड्यात पाहायला मिळाल्या.

मराठवाड्यात कोणत्या नेत्यांचे किती सभा.....

महायुती सभा

नरेंद्र मोदी : ०२

नितीन गडकरी : ०७

एकनाथ शिंदे : ०४

देवेंद्र फडणवीस : ०२

अजित पवार : ०४

महाविकास आघाडी

राहुल गांधी : ०२

शरद पवार : ०८

उद्धव ठाकरे : ०५

जयंत पाटील : ०४

नाना पटोले : ०४