सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना वातावरणात मात्र गारवा जाणवत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा घसरला आहे. तापमानात घट झाल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा वाढला असून हुडहुडी भरवणारी थंडी वाढल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अद्यापही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 27 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिलेला निर्णय मान्य असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वाढली आहे.
MNS Meeting Pune: मनसेकडूनही ईव्हीएमवर शंका, राज ठाकरे भूमिका मांडणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. राज ठाकरे यांनी उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पराभूत उमदेवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. निवडणुकीत कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरले यावरही बैठकीत चर्चा झाली. राज ठाकरे यांनी सर्वांची मते ऐकून घेतली. तसेच ईव्हीएमबाबत पुरावे गोळा करण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या. या सर्व घडामोडींवर राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडणार आहेत
Parbhani Crime: शिक्षक कुटुंबाची आत्महत्या; मन सुन्न करणारी घटना
परभणीमध्ये पती पत्नी अन् मुलीने एकाच वेळी ट्रेनखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोदावरी पुल धारखेड परिसरातील रेल्वे लाईनवर परळीकडे जाणाऱ्या मालगाडी खाली जिवनयाञा संपविल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Congress Meeting: काँग्रेसच्या बैठकीत ठाकरे गट- राष्ट्रवादीविरोधात नाराजी
काँग्रेसच्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात नाराजीचा सुर. विधानसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून मदत न झाल्याने आपल्या उमेदवारांचा पराभव झाल्याची भावना पराभूत उमेदवारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडी एकत्र राहणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत..' आमदाराचे गजानन महाराजांकडे साकडं
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.. मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असून शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी होत आहे..त्यामुळे आज बुलढाण्यातील विष्णूवाडी परिसरात असलेल्या गजानन महाराज मंदिरात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संत श्री गजानन महाराजांना साकड घातले आहे..
Dhananjay Munde: काँग्रेसला जनतेने धडा शिकवला: धनंजय मुंडेंचा टोला
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार 2029 बद्दल बोलता. सध्या निवडणूकीत जनतेन त्यांना जागा दाखवली आहे. जी काय लाज राहिली आहे ती तर राखा. मायबाप जनतेने जो धडा शिकवला त्यावर बोला असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगल यश मिळाल्यानंतर घनंजय मुंडे शिर्डीला साईदर्शनासाठी आले असताना त्यांनी मविआच्या नेत्यांवर निशाना साधला.
Amravati Crime: तरुणाची निर्घृण हत्या, अमरावती शहर हादरलं
अमरावती शहर पुन्हा हत्येच्या घटनांनी हादरलं
अमरावती शहरातील अकोली स्मशान भूमिजवळ अज्ञात इसमाची निर्घृण हत्या. शरीरापासून डोकं आणि धड केल वेगळं. मृतदेहापासून इसमाच डोकं गायब.
घटनास्थळी डीसीपी गणेश शिंदेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल. फॉरेन्सिक लॅबची टीम व डॉग पथकाला घटनास्थळी पाचारण
Ajit Pawar News: अपयशामुळे विरोधकांचे EVMवर आरोप.. अजित पवारांची टीका
एनसीपीच्या युवा नेतृत्वाला संधी कशी दिली जाईल यावर विचार करत आहोत.
लोकसभेत आम्हाला सपोर्ट मिळाला नाही. पण कार्यकर्ते नाराज झाले नाही. पण विधानसभेत चांगला रिझल्ट कसा आणायचा यासाठी प्रयत्न केले. आपले काही उमेदवार १ लाख पेक्षा जास्त मतांनी जिंकले आहेत.
ईव्हीएम मध्ये घोटाळ्याचे आरोप विरोधक करताहेत पण त्यात तथ्य नाही. लोकसभेत त्यांना चांगल्या जागा मिळाल्या तेंव्हा पण ईव्हीएम होते. निवडणूक आयोगानं पण सांगितले की एवढ्या वर्षात कधीच कोणती तक्रार आली नाही. देशात अनेक राज्यात निवडणूका झाल्या. विरोधकांना अपयश आले म्हणून आरोप करताहेत. त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असे अजित पवार म्हणाले.
Dharashiv News: धाराशिवमध्ये होर्डिंग्ज कोसळून अपघात; प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होर्डिंग्ज कोसळून अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार जोडपे थोडक्यात बचावले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र काही काळ वाहतूक कोंडी झाली. या घटनेमुळे पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Chhagan Bhujbal: राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल.. छगन भुजबळ
ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा. भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये काम केलं याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते पण पक्षाने त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम दिलं त्यांनी काम केलं आणि झोपून काम केले. मुख्यमंत्री होऊन देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क त्यांना शुभेच्छा. दादा मुख्यमंत्री झाले तरी चांगलं ,पण यावेळी 132 आमदार त्यांचे आहेत म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होईल फडणवीस झाले तरी आनंदच होईल, असे छगन भुजबळ म्हणालेत.
Navi Mumbai Fire: नवी मुंबईतील सानपाडा येथे भीषण आग; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
नवी मुंबईतील सानपाडा येथे भीषण आग
मोराज सर्कल येथील भूमीराज कोस्टारिका इमारतीतील बाराव्या मजल्यावर लागली आग
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल ..
स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे घटनास्थळी दाखल
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट ; आग विजवण्याचे काम सुरू
Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी पोहरादेवी गडावर महाआरती
बंजारा समाजाच्या काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी (गड) येथे आज मा.देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कामनेने होम-हवन महापूजा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. माता जगदंबा व संत बाबनलाल महाराज महाशक्तीपीठ पोहरादेवीच्या वतीने हा भव्य धार्मिक सोहळा महंत सुनील महाराज व त्यांच्या सपत्नीक सहकार्याने पार पडला.या महापूजेला बंजारा समाजाच्या असंख्य संत, महंत, आणि भक्तांनी हजेरी लावली.
Rahul Gandhi: व्हीएम विरोधात राहुल गांधी काढणार यात्रा
ईव्हीएम विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी काढणार यात्रा
भारत जोडो यात्रा ज्या पद्धतीने काढली होती त्याचं पद्धतीने इवीएम विरोधात यात्रा काढणार आहेत. ही यात्रा भारत जोडो यात्रे प्रमाणेच भारत भर असणार आहे या यात्राचा शेवट महाराष्ट्र मध्ये होणार आहे. विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. ईव्हीएमचा विरोध करण्यासाठी ही यात्रा देशभर काढली जाणार असून, बॅलेट पेपरवर मतदान या पुढे घेण्यासाठी आवाज उठवला जाणार आहे. काँग्रेस नेत्यांच्या वरिष्ठ बैठकीत या यात्रेचं नियोजन केलं जाईल.
Mumbai Pune Highway Accident: बोटेघाटात रिक्षाचा अपघात, 5 जण जखमी
मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय मार्गांवर बोरघाटात अवघड वळणावर शिंग्रोबा मंदिरच्या पाठीमागील खिंडीत रिक्षा छोट्या टेकडी शेजारील ग्रीड ला जोरदार धडकेमुळे पलटी होऊन त्यातील प्रवासी व चालक जखमी असून सर्वाना खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
Delhi Blast: दिल्लीच्या प्रशांत विहार भागात स्फोट, परिसरात खळबळ
राजधानी दिल्लीमधील रोहिणी भागात प्रशांत विहारमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत विहारच्या पीव्हीआर जवळ हा स्फोट झाला आहे. सध्या अग्निशमन दल, CRPF घटनास्थळी दाखल आहे. हा भाग सध्या सील करण्यात आला आहे.
Nana Patole News: 'निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी', नाना पटोलेंचे गंभीर आरोप
निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर आमचा संशय आहे 2 तासात ते रिपोर्ट देतात किती टक्के होते. तुमच्याकडे पण 7 ची आकडेवारी उशिरा म्हणजे 9 वाजता आला. 58.22 टक्के मतदान झालं ते 5 वाजता सांगितले गेले. मतदान करण्याची प्रक्रिया एक मिनिटाची आहे. 65.2 टक्के मतदान रात्री 11 पर्यंत झालं असं दाखवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आयोग बोलतं की 66.5% मतदान झालं म्हणजे वाढ झालेली सांगितली. निवडणूका झाल्यावर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेते आणि माहिती देते अशी प्रक्रिया होती. 65.2 टक्के मतदान रात्री 11 पर्यंत झालं असं दाखवलं...' असे आरोप नाना पटोलेंनी केलेत.
Wardha Accident: वर्ध्यात भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आर्वी नजीकच्या सावळापूर येथे घडली. सुरुवातीला दोन दुचाक्या एकमेकांवर आदळून दोघे खाली पडले. त्यानंतर एकाच्या अंगावरून ST गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची अवस्था पाहून दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
Nandurbar News: शिंदे गटाच्या विजयी मिरवणुकीत राडा, तरुणांच्या दोन गटात मारामारी
शिंदेचे आमदार आमश्या पाडवी यांचा विजय मिरवणूक तरुणांचा राडा
आमदार आमश्या पाडवी यांच्या भव्य विजय रॅलीला गालबोट..
सिने स्टाईलने हाणामारी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.....
बँडच्या तालावर नाचणारे तरुणांचे दोन गट आपसात भिडले ....
तरुणांच्या गटात जो समोर येतो त्याला मारहाण करत असल्याचे दृश्य आले समोर....
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे आनदोत्सव व्यक्त करण्यासाठी 10 बँड पथकाचे नियोजन करण्यात आले होते...
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून मोठ्या संख्येने तरुण रॅलीत सहभागी झाले होते....
या बँडच्या तालावर नाचत असतांना दोन गटातील तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली...
Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, कार्यकर्त्यांचे आई तुळजाभवानीकडे साकडं
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांना मुख्यमंत्री असावी असं साकडं आई तुळजाभवानी चरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातला आहे. आई तुळजाभवानीचा महा अभिषेक करत कार्यकर्त्यांनी घातलं आहे. विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने अजित पवार यांच्याकडे पाहून महायुतीला मतदान केलं. महायुतीचा राज्यभरात दणदणीत विजय झाला.आता महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टीचा समतोल ठेवायचा असेल तर अजित पवार यांनीच मुख्यमंञी असायला हव अशी भुमीका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली
Nashik Politics: नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा
- नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा
- येणाऱ्या काळात होणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुका स्वबळावर लढणार
- विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीत धुस - फुस
- ठाकरे गटाची महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर नाराजी
- आघाडीतील घटक पक्षांनी ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित तसं सहकार्य झालं नाही ठाकरे गटाचा आरोप
- ठाकरे गट स्वतंत्रपणे लढल्याने शंभर टक्के यश येईल अशी शिवसैनिकांना खात्री असल्याची महानगर प्रमुखांची माहिती
Virar Crime: भिंतीला खिळा ठोकण्यावरुन वाद; माय-लेकीला बेदम मारहाण
विरार मधील एका इमारतीमध्ये भिंतीला खिळा ठोकण्यावरून झालेल्या वादातून मुलगी आणि आईला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची ही दृष्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. विरार पूर्वेच्या विवा जहांगीर कॉम्प्लेक्स मधील तुलशीधाम सोसायटी मधील ही घटना आहे. रिना धुरी आणि निशा धुरी असे मारहाण झालेल्या मुलगी आणि आईचे नाव असून या मारहाणी प्रकरणी गौतम पांडे आणि त्याची पत्नी प्रतिभा पांडे यांच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Live Update : अजित पवार थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार
अजित पवार थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दुपार नंतर दिल्लीत येणार
संध्याकाळी सहानंतर अमित शाह यांच्यासोबत बैठक होईल.
Live Update : पुण्यात आज मनसेची आत्मचिंतन बैठक
पराभूत उमेदवारांशी राज ठाकरे करणार चर्चा
प्रमूख पदाधिकारी आणि राज्यभरातील जिल्हाध्यक्ष असणार उपस्थित
विधानसभेत दारुण पराभव झाल्यानंतर राज ठाकरे बैठक घेणार आहेत
पराभवाची कारणे तसेच ईव्हीएम बाबत ही करणार चर्चा
Live Update : अमरावतीच्या धामणगाव रेल्वेजवळील रेल्वे ट्रॅक तुटला
अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे रेल्वे ट्रॅक तुटल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुरी अहमदाबाद सुपर एक्सप्रेस 20 मिनिट उशिराने धावत आहे. रुळाच्या जॉईटमधील वेल्डींग निघाल्याने रेल्वे ट्रॅक तुटल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ट्रॅकमनच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला. रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
Live Update : रवींद्र चव्हाणांनी खासदारकीची घेतली शपथ...
रवींद्र चव्हाणांनी खासदारकीची घेतली शपथ...
Live Update : प्रियांका गांधींनी लोकसभेत खासदारकीची घेतली शपथ
प्रियांका गांधींनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. केरळच्या वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियांका गांधींचा 4 लाख मतांनी दणदणीत विजय झाला.
Live Update : एकनाथ शिंदे दुपारी दिल्लीत जाणार
एकनाथ शिंदे दुपारी दिल्लीत जाणार.. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अमित शाहांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार...
एकनाथ शिंदे दुपारी 4 वाजता दिल्लीत पोहोचतील, मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5.30 च्या सुमारास अमित शाह यांच्या घरी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
Live Update : हेमंत सोरेन यांचा आज शपथविधी, चौथ्यांदा घेणार झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
हेमंत सोरेन यांचा आज शपथविधी, चौथ्यांदा घेणार झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, INDIA आघाडीचे नेते राहणार सोहळ्याला उपस्थित
Live Update : प्रियांका गांधी आज लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेणार
प्रियांका गांधी आज लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेणार, केरळच्या वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियांका गांधींचा 4 लाख मतांनी दणदणीत विजय
Live Update : उबाठा गटातील काहीजण शिवसेनेत येण्यास इच्छुक, येत्या 8 ते 10 दिवसात त्यांच्याशी बोलणार - उदय सामंत
उबाठा गटातील काहीजण शिवसेनेत येण्यास इच्छुक, येत्या 8 ते 10 दिवसात त्यांच्याशी बोलणार, उदय सामंत यांचं मोठं विधान
Live Update : समीर भुजबळांचे पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात पुनर्वसन होणार?
आज छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देत बंडखोरी केलेले आणि नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढवणारे समीर भुजबळही उपस्थित होते. त्यामुळे समीर भुजबळांचे पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात पुनर्वसन होणार असल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे. समीर भुजबळांना नांदगावात अपक्ष उभं करणं ही छगन भुजबळांचीच चाल होती का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
Live Update : नाशिकच्या निफाडमध्ये सर्वात कमी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट पसरली असून नाशिकच्या निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. येथे आज थंडीची निचांकी 8 अंशापर्यंत पोहचली आहे. गेल्या दोन दिवसापासून उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आली असून यामध्ये धुळे आणि नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा निचांक गाठलेला आहे. नाशिक शहरातील निचांक हा 10 अंशापर्यंत खाली उतरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात दिवसा आणि रात्री देखील नागरिक थंडीत शेकोटीचा आनंद घेत आहेत. उत्तरेकडून ताशी 15 ते 20 किलोमीटर वेगाने थंड वारे महाराष्ट्राकडे वाहत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. तर अनेक नागरिक या थंडीत सकाळी जॉगिंग आणि योगाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
Live Update : एकनाथ शिंदे यांना तीन महत्त्वाची खाती दिली जाणार
एकनाथ शिंदे यांना तीन महत्त्वाची खाती दिली जाणार
नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि जलसंपदा मंत्रालय देण्यात येणार असल्याची माहिती.
Live Update : निफाडमध्ये आज 8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाची आज नोंद
नाशिक शहरातही पारा दहा अंशांपर्यंत खाली घसरला
तापमानाचा पारा घसरल्याने नाशिककरांना भरली हुडहुडी
Live Update : एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा, वारकरी संप्रदायाची मागणी
एकनाथ शिंदे यांनी शासकीय वारकरी महामंडळाची निर्मिती केली आहे. आषाढी वारी सोहळ्यासाठी प्रति दिंडी 20,000 रुपये सेवा निधी दिला. वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले, वारीतील वाहनांचा टोल माफ केला, भगवान विठ्ठल रुक्मिणी अपघात योजना, कीर्तनकारांसाठी आणलेले संत नामदेव महाराज सन्मान योजना अशी अनेक कामे त्यांनी वारकरी संप्रदायासाठी केली असल्याचे म्हणत संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज नामदास यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे.
Live Update : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज 728 वा संजीवन समाधी सोहळा
कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज 728 वा संजीवन समाधी सोहळा अलंकापुरीत पार पडतोय, पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून वारकरी बांधव माऊलीचे दर्शन घ्यायला जाताना दिसत आहेत.
आज पहाटेच्या सुमारास आळंदी देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त यांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधी वरती पवमान अभिषेक व दुग्धरती करण्यात आली आहे. संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक अशी देशी-विदेशी फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गुलाब पुष्पामध्ये योगी तपस्वी समाधीस्थ माऊली असा जयघोष देखील लिहिण्यात आलाय. मुख्य घाबरात देखील फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. दुपारी बाराच्या सुमारास हा सोहळा पार पडणार असल्याचं आळंदी देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
Live Update : अंबरनाथमध्ये साहित्य उद्यानात 'मद्यपींची मधुशाला'
अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकातील पद्मश्री मधू मंगेश कर्णिक साहित्य उद्यानाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. हे उद्यान मद्यपींचा अड्डा बनलं असून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची ही दुरवस्था झाली आहे.
Live Update : विनोद तावडेंची भाजप अध्यक्षपदी वर्णी?
विनोद तावडे यांची निवड भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदावर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्व विनोद तावडे यांनी युपी आणि बिहार राज्याच्या निरीक्षकाची जबाबदारी स्विकारली आहे.
Live Update : विनोद तावडेंची भाजप अध्यक्षपदी वर्णी?
विनोद तावडे यांची निवड भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदावर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्व विनोद तावडे यांनी युपी आणि बिहार राज्याच्या निरीक्षकाची जबाबदारी स्विकारली आहे.