3 months ago
मुंबई:

पुढील दोन दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता (Mumbai Rain Update) व्यक्त केली जात आहे.  मुंबईतील मुसळधार पावसामुळे (25 सप्टेंबर) वाहतूक कोंडीत मुंबईकर तासनतास अडकले. त्यात रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने चाकरमान्यांचा परतीचा मार्ग बंद झाला. रस्त्यांवर मोठा वाहतूक कोंडी आणि रेल्वे ट्रॅकवर भरलेलं पाणी यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. (Mumbai Red Alert) दरम्यान आज 26 सप्टेंबरला हवामान विभागाकडून मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुढील दोन दिवस मुंबई आणि महाराष्ट्रातील पश्चिम भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याशिवाय बिहार, नेपाळ, उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरातमधील काही भागांमध्येही तुफान पावसाची शक्यता आहे.  

Sep 26, 2024 19:42 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना खासगी विमानानं मुंबईला आणण्यात आले आहे. भुजबळ यांना पुण्याहून मुंबईला आणण्यात आले असून त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भुजबळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पुण्याला गेले होते. 

भुजबळ यांच्या अंगातील ताप उतरत नसल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे.  भुजबळ यांना व्हायरल तापाची किंवा डेंग्यू झाल्याची लक्षणं आहेत, असा अंदाज आहे. 

Sep 26, 2024 18:30 (IST)

अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतच्या इमर्जन्सी या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटावरील प्रदर्शनाच्या बंदीवरील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी सेन्सॉर बोर्डानं हा चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी देण्याची तयारी दाखवली. या चित्रपटातील काही प्रसंग कट करावे लागतील. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकेल, असं सेन्सॉर्ड बोर्डानं स्पष्ट केलं आहे.

Sep 26, 2024 17:12 (IST)

मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याच्या कार्यालयात फोन करुन  बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली आहे. पवन नावाच्या व्यक्तीनं फोन करुन ही धमकी दिल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानं फोन करुन वादग्रस्त वक्तव्य केलं. या प्रकरणात ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणाऱ्यांचा शोध सुरु आहे. 

Sep 26, 2024 15:51 (IST)

अखेर अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा मिळाली? आई-वडिलांनी केली पाहणी

अक्षय शिंदेचा दफनविधी अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी पोलिसांसोबत अंबरनाथच्या स्मशानभूमीत जाऊन पाहणी केली. अंबरनाथ पालिकेने परवानगी दिल्यास अंबरनाथमध्ये अक्षयचा दफनविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Advertisement
Sep 26, 2024 15:00 (IST)

गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अजित रानडेंना पदावरून हटवण्याच्या निर्णयाच्या स्थगितीला मुदतवाढ

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे यांना पदावरून हटवण्याच्या निर्णयाच्या स्थगितीला सात ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून यापुढील सुनावणी नियमित खंडपीठासमोर समोर होणार आहे. 

Sep 26, 2024 14:32 (IST)

अक्षय शिंदेचा मृतदेह कळव्यात दफन व अंत्यविधी करण्यास मनसेचा कडाडून विरोध...

बदलापुरातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह कळव्यात दफन व अंत्यविधी करण्यास मनसेचा कडाडून विरोध...

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांचा मृतदेह कळव्यात अंत्यविधी व दफन करण्याकरिता मनसेचा कडाडून विरोध होत आहे. मनसैनिकांनी आज कळवा पोलीस ठाण्यात व कळवा प्रभाग समितीमध्ये याबाबत पत्र ही दिले आहे. मनसे कळवा मुंब्रा उपशहर अध्यक्ष सुशांत सूर्यराव कळवा रुग्णालयात देखील दाखल झाले आहेत. 

Advertisement
Sep 26, 2024 14:30 (IST)

पुण्यात 86 वर्षांपासून कायम असलेला सप्टेंबरमधील 24 तास पावसाचा विक्रम बुधवारी मोडला

पुण्यातील शिवाजीनगर परिसरात 86 वर्षांपासून कायम असलेला सप्टेंबरमधील 24 तास पावसाचा विक्रम बुधवारी मोडला. IMD स्टेशनवर 24 तासात 133 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापैकी 124 मिली मीटर पाऊस दुपारी 2.30 ते 5.30 या तीन तासांच्या कालावधीत झाला. बुधवार सकाळी 8.30 ते गुरुवारी सकाळी 8.30 पर्यंत मोजण्यात आलेली 24 तासांची अंतिम आकडेवारी 133 मिली मीटर इतकी आहे. सप्टेंबरमध्ये पुण्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाच्या 1938 च्या 132.3 मिमीच्या विक्रमाला मागे टाकलं.

Sep 26, 2024 13:53 (IST)

खुल्या नाल्यात पडून महिलेचा मृत्यू...

Advertisement
Sep 26, 2024 12:26 (IST)

पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मोटर वाहन निरीक्षक अटकेत

देगलूर येथील सीमा तपासणी नाक्यावर वाहनांकडून अवैधपणे पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मोटर वाहन निरीक्षक अमोल खैरनार व त्यांचा एजंट यांना पाचशे रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अमरावती एसीबी विभागाने केली आहे. आरोपीविरुद्ध नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Sep 26, 2024 12:25 (IST)

दोन कारची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू

मनमाड रस्त्यावरील हिरेनगर शिवारात दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहे..सकाळी झालेल्या या अपघातातील मृत व जखमी हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व नाशिक जिल्ह्यातील मोहाडी या गावातील आहे.

Sep 26, 2024 10:45 (IST)

जायकवाडी धरणातून 47 हजार 160 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग, वाहतुकीसाठी दगडी पूल बंद

जायकवाडी धरणातून 47 हजार 160 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून हे दरवाजे अडीच फूट उंचीने उघडले आहेत. जायकवाडी धरणात 30 हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. दरम्यान जायकवाडी धरणासमोरील दगडी पुलावरून पाणी वाहू लागले आहे. अहमदनगर-पैठणला जोडणाऱ्या दगडी पुलावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी दगडी पूल बंद करण्यात आला आहे. 

Sep 26, 2024 10:40 (IST)

मोदींचा पुणे दौरा रद्द, मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रम पुढे ढकलण्याची शक्यता

Sep 26, 2024 10:34 (IST)

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

Sep 26, 2024 10:33 (IST)

Live Update : मुसळधार पावसाचा फटका, पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. 

Sep 26, 2024 10:14 (IST)

मुंबई आणि उपनगरात २५ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडत होता. त्या पावसात अंधेरी पूर्व भागातील  एक ४५ वर्षीय महिला ओव्हरफ्लो नाल्यात पडली.  त्यानंतर त्या महिलेला नाल्यातून बाहेर काढण्यात आले आणि तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. अंधेरी पूर्व एमआयडीसीजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. नाल्यात पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. 

Sep 26, 2024 09:38 (IST)

नागपूर विद्यापीठाच्या निलंबित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचं निधन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निलंबित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे यकृताच्या आजाराने निधन

Sep 26, 2024 09:38 (IST)

12 वर्षीय मुलीतर्फे गर्भपात करण्याची अनुमती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

12 वर्षीय मुलीतर्फे गर्भपात करण्याची अनुमती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने तिचा वारंवार बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणी शासकीय रुग्णालयाला सदर मुलीची वैद्यकीय तपासणी करून एक दिवसात अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

Sep 26, 2024 09:13 (IST)

जायकवाडी धरणाच्या विसर्गात वाढ

Sep 26, 2024 09:04 (IST)

अतिरिक्त पावसामुळे खरीप हंगामाच्या पिकाला मोठा फटका

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. दक्षिण सोलापूर मध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाच्या पिकाला मोठा फटका बसत आहे. पावसामुळे खरीप हंगामातील काही पिकं वगळता अनेक पिकं वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. माळकवठे येथील बुदधपा गिरीष सगरे यांची चार एकर उडीद, भाऊसाहेब मल्लपा सगरे यांची दोन एकर ऊसशेती, अमसिदध मलकारी गावडे यांचे एक एकर बाजरी, आनंदकुमार अमोघसिद्ध थोरात यांची एक एकर पेरुची बाग यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्वच पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. 

Sep 26, 2024 08:59 (IST)

गोंदिया जिल्ह्यात हिवताप व डेंग्यूचा धोका वाढला

आरोग्य विभागाने डेंग्यू मलेरिया या कीटकजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील 1116 गावांमध्ये सर्वेक्षण केले. यात 22 गावांत कीटकजन्य आजार हिवताप व डेंग्यूचा धोका वाढला आहे. या गावांमधील घरांमध्ये, पाणीसाठे, कुंड्यांमध्ये हिवताप, चिकुनगुनिया, डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया या रोगांबाबत केलेल्या कीटक सर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे.

Sep 26, 2024 08:32 (IST)

पालघर जिल्ह्यात पावसाची उसंत

पालघर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. हवामान विभागाने आज  पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या (रेड अलर्ट) इशाऱ्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा,  महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. मात्र पावसाने उसंत घेतल्यामुळे जनजीवन सुरळीत असून रेल्वे - रस्ते वाहतूक सामान्य स्थितीत सुरू आहे. 

Sep 26, 2024 08:31 (IST)

मुसळधार पावसामुळे शेतीला धोका, शेतकऱ्याची चिंता वाढली

गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शेतात असलेल्या हलक्या स्वरूपाच्या धान पिकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. तर भारी धान पिकाला यामुळे फायदा होण्यार असला तरी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता दिसून आली आहे

Sep 26, 2024 08:29 (IST)

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे सेवा सध्या सुरळीत

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे सेवा सध्या सुरळीत

Sep 26, 2024 08:29 (IST)

मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा..