8 hours ago
मुंबई:

Assembly Election 2024 : आज राज्यभरात सभांची धामधूम पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी बारा वाजता संभाजीनगरच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरात सभा आहे. त्यानंतर संध्याकाळी मोदींची शिवाजी पार्कातील मैदानावर सभा होणार आहे.  तर दुपारी कन्नड आणि संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. सोबतच राहुल गांधींची देखील नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर दुपारी बारा वाजता सभा होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी तीन मोठ्या नेत्यांच्या सभेने मराठवाड्याचं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Nov 14, 2024 19:57 (IST)

अजित पवार आलेत आमच्या गावा - रामदास आठवले

शरद पवारांनी मोदीं बरोबर येणं गरजेचं होतं. पण ते आले नाही. पण शरद पवार साहेब तुम्हाला जिकडं जायचय तिकडं जावा, पण अजित पवार आलेत आमच्या गावा. अशी कोटी रामदास आठवले यांनी यावेळी केली. 

Nov 14, 2024 19:56 (IST)

'उद्धवजी तुम्हाला बाळासाहेबांनी हेच शिकवलं का?' आठवलेंचा ठाकरेंना सवाल काय?

बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच काँग्रेसला विरोध केला. पण उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले. बाळासाहेबांनी तुम्हाला हेच शिकवलं का असा प्रश्न रामदास आठवले यांनी शिवाजी पार्क वरील सभेत विचारला. 

Nov 14, 2024 15:45 (IST)

Live Update : 20 कोटींचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

आचारसंहिता सुरू झाल्यापासून सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर ग्रामीण मधील पोलिसांच्या तपासणी पथकांनी अमली पदार्थ, संशयास्पद वस्तू, बेहिशेबी रोकड, कागदपत्रे उपलब्ध नसलेले दागिने, असा 19 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सहा कोटी 64 लाख रुपये रोख रक्कम, अमली पदार्थांमध्ये दारू व रसायने दोन कोटी 83 लाख रुपये,  22 लाख 24 हजार रुपये किमतीचा 113 किलो गांजा, आठ कोटी रुपयांचे नऊ किलो सोने व 60 किलो चांदी, याच्यासह 2 कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. 

निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू, अमली पदार्थ, वस्तू, जेवणावळी, रोकड देण्याचे आमिष दाखवले जाते. यातून आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहेत. याशिवाय पोलिसांच्या भरारी पथकांकडूनही संशयास्पद वस्तूंवर नजर ठेवली जात आहे. 15 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या काळात तपासणी पथकांनी 19 कोटी 13 लाखांचा संशयास्पद मुद्देमाल जप्त केल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.

Nov 14, 2024 15:41 (IST)

नागपूर : इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची धमकी

नागपूर येथून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो विमानाला रायपूर विमानतळावर उतरावे लागले.

विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याची माहिती आहे.

विमानातून प्रवाशांना उतरविण्यात आले असून विमानाची कसून तपासणी सुरू आहे.

Advertisement
Nov 14, 2024 15:21 (IST)

Live Update : नाना पटोलेंच्या हेलिकॉप्टरची पुन्हा एकदा तपासणी

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले 64 तिरोडा गोरेगावचे राष्ट्रवादी शरद पवार गट व महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचारार्थ मुढीकोठा येथे सभेसाठी जाताना तिरोडा येथील हेलिपॅड येथे निवडणूक आयोगाच्या पथकाकडून सलग दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टरची तपासणी केली गेली.

Nov 14, 2024 13:08 (IST)

Live Update : आदित्य ठाकरे यांची दापोलीत जाहीर सभा

आदित्य ठाकरे यांची दापोलीत जाहीर सभा

आदित्य ठाकरे यांचं सभास्थळी आगमन

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्यासाठी जाहीर सभा

Advertisement
Nov 14, 2024 12:29 (IST)

Live Update : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला

डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात हल्ला

जुगल उपाध्याय भाजपचे सोशल मीडिया संयोजकांवर हल्ला करण्यात आला 

उपाध्याय यांच्या कार्यलयात येऊन दोघांनी मारहाण करत तोडफोड केली

आमच्या समाजाबद्दल काहीपण लिहतो असा आरोप करत तोडफोड केली

विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

हल्ला करणारे दोन्ही तरुण तोंडावर रुमाल बांधून आले होते

Nov 14, 2024 11:59 (IST)

Live Update : योगी आदित्यनाथांच्या 'कटेंगे बटेंगे' विधानाशी भाजप नेत्यांमध्ये मतभेद

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगेवरून भाजपातूनच असहमती दिसून येतेय, 

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे योगींच्या या बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यापासून दूर राहताना दिसतायत. विकासाचे मुद्दे हेच महाराष्ट्रासाठी खूप आहेत, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिलीय,

तर दुसरीकडे घुसखोरांमुळे योगींनी असं विधान कदाचित केलं असावं अशी प्रतिक्रिया नितीन गडकरींनी दिली आहे. त्यामुळे योगींच्या विधानाशी भाजपातच असहमती दिसतेय. 

Advertisement
Nov 14, 2024 11:47 (IST)

Live Update : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर आनंद परंतु त्यांना देशाच्या राजकारणात रस - शरद पवार

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर आनंद परंतु त्यांना देशाच्या राजकारणात रस - शरद पवार

Nov 14, 2024 11:36 (IST)

Live Update : योगी आदित्यनाथ येणार नाही म्हटल्यावर नागरिकांचा सभास्थळावरुन काढता पाय

उल्हासनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे दुपारपासूनच भर तळपत्या उन्हात नागरिक सभास्थळी येऊन बसले होते. मात्र योगी आदित्यनाथ यांचा उल्हासनगर दौरा आयत्या वेळी रद्द झाला. योगी सभेला येणार नाहीत, हे कळताच नागरिकांनी सभा स्थळावरून काढता पाय घेतला. दुपारपासून योगी यांना पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सुरक्षिततेच्या कारणामुळे पिण्याचं पाणी सुद्धा देण्यात आलं नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. आयत्यावेळी आदित्यनाथ यांचा दौरा रद्द झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Nov 14, 2024 11:05 (IST)

Live Update : महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियांका गांधी गडचिरोलीत

गडचिरोलीसाठी विजय वडेट्टीवार यांची मोर्चेबांधणी

17 तारखेला प्रियांका गांधी यांची सभा

आरमोरी मतदारसंघात वडसा इथे होणार सभा

महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियांका गांधी गडचिरोलीत

Nov 14, 2024 10:26 (IST)

Live Update : अजित पवारांना आणखी एक धक्का; मुंबई सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांचा शरद पवार गटात प्रवेश

अजित पवारांना आणखी एक धक्का

मुंबई सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश 

मुंबईचे अजित पवार गटाचे पदाधिकारी यांनी देखील शरद पवार गटात केला प्रवेश 

अजित पवार गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस विलास माने, दिनकरराव तावडे, विजय देसाई यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे..

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खेड तालुका अद्यक्ष धीरज साबळे यांनी देखील प्रवेश केला आहे.

Nov 14, 2024 10:24 (IST)

Live Update : जिल्ह्यात मध्यरात्री 21 लाख 98 हजार 210 रुपयांची रक्कम जप्त

वर्ध्यात कार मध्यरात्रीच्या दरम्यान एकाच वेळी तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोख रक्कम जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे तब्बल 21 लाख च्या वर  ही रोख रक्कम जप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने ही रक्कम जिल्ह्यात येत होती का आता असा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. 

Nov 14, 2024 09:47 (IST)

Live Update : आज कोणत्या उमेदवाराची कुठे होणार सभा, ही घ्या यादी

महत्वाच्या सभा

प्रधानमंत्री नरेंद्र मादी सभा

संभाजीनगर - दुपारी 1 वाजता चिखलठाणा एमआयडीसी येथे सभा (मोसीन)

रायगड -  दुपारी 4 वाजता खारघर येथे सभा  (विनय)

मुंबई - सायंकाळी 6 वाजता शिवाजी पार्क येथे सभा (देवेंद्र, अक्षय)

काँग्रेस नेते राहूल गांधी आज महाराष्ट्र दौर्यावर

नंदूरबार -सकाळी 11 वाजता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नंदुरबार येथे सभा. (प्रशांत)  

नांदेड - दुपारी 1 वाजता नांदेड शहरातील नवामोंढा मैदानावर जाहीर सभा. (योगेश)

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे दौरा

पुणे-दुपारी 2 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची पत्रकार परिषद. (रेवती)

पुणे- दुपारी 4 वाजता भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांची पत्रकार परिषद.

शरद पवार सभा

पुणे- सायंकाळी 5 वाजता खडकवासला मतदारसंघात सभा सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ सभा (रेवती)  

पुणे- सायंकाळी 7 वाजता शरद पवार पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सभा. (रेवती)

उध्दव ठाकरे सभा

संभाजीनगर - सकाळी  7 वाजता उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर येथे सभा. (मोसीन)

शिर्डी-  दुपारी 1 वाजता नेवासा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा. (सुनील)

अहिल्यानगर - दुपारी 2 वाजता श्रीगोंदा मतदारसंघाच्या उमेद्वार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ  उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा. (प्रसाद)  

अजित पवार सभा

नाशिक- सकाळी 11 वाजता निफाड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ सभा. (प्रांजल)

नाशिक-  दुपारी 1.30 वाजता दिंडोरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ सभा. (प्रांजल)

नाशिक- सायंकाळी 4 वाजता सिन्नर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ सभा (प्रांजल)

कोपरगाव- सायंकाळी 5 वाजता आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची कोपरगावात जाहीर सभा. (सुनील)

राज ठाकरे सभा

पुणे- सायंकाळी 5 वाजता हडपसर येथे सभा (रेवती)

पुुणे- सायंकाळी 7 वाजता सिंहगड रोड वडगांव बुद्रुक येथे सभा (रेवती)

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आज अमरावती दौऱ्यावर

दुपारी 12.45 वाजता चूरनी येथे भाजप महायुतीचे उमेदवार केवलराम काळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. (शुभम)

दुपारी 1.45 वाजता चांदूरबाजार येथे भाजप महायुतीचे उमेदवार प्रवीण तायडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा

     

-दुपारी 1 वाजता मंगळवेढा येेथे जाहीर सभा

-दुपारी 2 वाजता पंढरपूर येथे सभा

-दुपारी 3 वाजता नळदुर्ग येथे सभा

-दुपारी 4.30 वाजता तुळजापूर येथे सभा

-सायंकाळी 6 वाजता इचलकरंजी येथे जाहीरसभा

Nov 14, 2024 09:43 (IST)

Live Update : राज ठाकरे यांचा बीड दौरा रद्द

राज ठाकरे यांचा बीड दौरा रद्द 

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती

बीडमध्ये गेवराई आणि केज येथे होणार होती प्रचार सभा 

गेवराईत मयुरी खेडकर तर केज मध्ये रमेश गालफाडे यांच्या प्रचारार्थ होती सभा

Nov 14, 2024 08:58 (IST)

Live Update : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील एक लाख बुथ प्रमुखांशी संवाद साधणार

१६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता बुथ प्रमुखांशी संवाद साधणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणार

Nov 14, 2024 08:55 (IST)

Live Update : उद्धव ठाकरे, अलका लांबा यांच्यावर कारवाई करा, धनंजय महाडिक यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर भाजप महिला मोर्चाची मागणी

खासदार धनंजय महाडिक यांच्याविषयी चुकीचे आणि प्रक्षोभक वक्तव्य करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाने केलीये. भाजपच्या महिला शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांना दिले.

Nov 14, 2024 08:53 (IST)

Live Update : मुक्ताईनगर मतदारसंघात पुन्हा राजकीय वातावरण तापले

मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड तालुक्यातल्या जलचक्र तांडा येथे महाविकास आघाडीच्या प्रचार रॅली दरम्यान कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी केला आरोप केला आहे. 

Nov 14, 2024 08:51 (IST)

Live Update : काँग्रेस नेते राहुल गांधी आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

नंदुरबार जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. दुपारी बारा वाजता राहुल गांधींची या ठिकाणी सभा होणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे.