मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने अनेक वाहनांसह नागरिकांना चिरडलं. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 25 जण जखमी झाले आहेत. बाईक, रिक्षा, चारचाकी अशा अनेक वाहनांचं देखील नुकसान झालं आहे.
बेस्टची 332 क्रमांकाची बस एका सोसायटीची भिंत तोडून एका पोलवर आदळली आणि थांबली. काही मिनिटे आणि 100-150 मीटर परिसरात झालेल्या या अपघाताने अनेकाचा थरकाप उडाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Live Update : शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्या बैठकीचे फोटो आले समोर
शरद पवार आणि केजरीवाल यांच्या बैठकीचे फोटो...
Live Update : मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी पीएसआय राजेश पाटील निलंबित
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी पीएसआय राजेश पाटील यांना निलंबित तर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार - बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ..
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ आणि सकाळपासून सुरू केलेल्या रास्ता रोकोला मनोज जरांगे पाटील आणि बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी भेट दिली आणि चर्चा केली. त्या चर्चेनंतर अखेर या आरोपींसोबत हितसंबंध असल्याचा आरोप केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर करण्यात आला होता. बीडचे एस पी अविनाश बारगळ यांनी राजेश पाटील यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल सुद्धा वरिष्ठांना पाठवणार असल्याचे सांगितले आहे.
Live Update : ईव्हीएमसंदर्भात शरद पवार यांच्या घरी बैठक सुरू
शरद पवार यांच्या घरी बैठक सुरू
ईव्हीएम संदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, पराभूत उमेदवार दत्ता बहिरट बैठकीसाठी शरद पवारांच्या घरी पोहोचले.
शरद पवारांच्या निवासस्थानी आतापर्यंत पोहोचलेले नेते :
धैर्यशील मोहिते पाटील, खासदार माढा
उत्तमराव जानकर, आमदार माळशिरस
दत्ता बहिरट, शिवाजीनगर मतदार संघ
प्रशांत जगताप, हडपसर
महेबुब शेख, आष्टी
संदीप वरपे, कोपरगाव
राहुल कलाटे, चिंचवड
खा. निलेश लंके, अहमदनगर दक्षिण
Live Update : परभणीच्या प्रकरणावरून वसमतची आंबेडकरी जनता आक्रमक..
परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील भारताचे संविधान एका आज्ञात व्यक्तीकडून फोडल्यानंतर त्याचे पडसाद आता हिंगोलीतही उमटताना पाहायला मिळत आहेत. हिंगोलीच्या वसमत येथील आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. उद्या आंबेडकरी अनुयायांकडून वसमत बंदची हाक देण्यात आली आहे
Live Update : 14 डिसेंबरला 101 शेतकरी दिल्लीकडे कूच करणार, शंभू बॉर्डरवरुन सर्वनसिंह पंढेर यांची घोषणा
14 डिसेंबरला 101 शेतकरी दिल्लीकडे कूच करणार, शंभू बॉर्डरवरुन सर्वनसिंह पंढेर यांची घोषणा
Live Update : मनोज जरांगे पाटील यांनी दिली मस्साजोगला भेट
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक करावी या मागणीसाठी सकाळपासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे.. सर्वजण संयम पाळत आहेत परंतु जो प्रकार झालाय तो निंदनीय आहे.. यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करत सर्व समाज बांधवांना शांततेचे आवाहन केले आहे.
Live Update : कराडला बांग्लादेशातील हिंदूवरील अत्याचार विरोधात मूकमोर्चा
बांग्लादेशमध्ये हिंदू समाज आणि अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सातारा जिल्ह्यातील कराड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते दत्त चौकातील छ. शिवाजी महाराज पुतळा असा सकल हिंदू समाजाच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपाचे आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे , विक्रम पावसकर याच्यासह हिंदू समाजातील बांधवानी हाताला काळ्या फिती लावत निषेध व्यक्त केला.
Live Update : लातूर अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू
लातूर अंबाजोगाई महामार्गावरील वाघाळापाटीजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जनचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दोघेजण गंभीर जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे... सर्वजण लातूर जिल्ह्यातल्या रेनापुर तालुक्यातील कारेपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे... मांजरसुंबा येथे जेवण करून परत येत असताना अंबाजोगाई जवळ वाघाळा पाटी इथ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.... या भीषण अपघातात मयत झालेले यांची नावे बालाजी शंकर माने वय 27 वर्ष, फारुख बाबुमिया शेख वय 30वर्ष, दीपक दिलीप सावरे वय 28 वर्ष हे तिघेजण जागीच मृत्यू पावले तर ऋत्विक गायकवाड याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झालाय... तसेच यात मुबारक शेख आणि अजीम शेख एक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे हे दोघेही पोलीस भरतीत त्यांची निवड झाल्याची माहिती आहे कारेपूर मधील चार तरुणाचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे...
Live Update :ट्रक चालकाने शाळकरी मुलाला चिरडले, एक मुलगा जागीच ठार
ट्रक चालकाने शाळकरी मुलाला चिरडले, एक मुलगा जागीच ठार
धाराशिवमधील बाह्यवळण रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रक चालकाने बेदरकारपणे ट्रक चालवत शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये तेरा वर्षे विद्यार्थी जागीच ठार झाला आहे. हा विद्यार्थी पोद्दार इंग्लिश स्कूल मधील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये ट्रकचालक व वाहक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
Live Update : कुर्ला अपघात प्रकरणातील आरोपी चालक संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
कुर्ला अपघात प्रकरणातील आरोपी चालक संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Live Update : कुर्ला प्रकरणातील आरोपी चालक कोर्टात हजर
कुर्ला प्रकरणातील आरोपी चालक कोर्टात हजर, कोर्टाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात
Live Update : बीडच्या अंबाजोगाई औषध घोटाळ्यानंतर आरोग्य विभागाचा मोठा निर्णय
बीडच्या अंबाजोगाई औषध घोटाळ्यानंतर आरोग्य विभागाचा मोठा निर्णय
बनावट औषध पुरवठा करणाऱ्या विशाल इंटरप्राईजेसकडून करण्यात आलेला राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील औषधांचा पुरवठा थांबवण्याचे आदेश
विशाल इंटरप्राईजेसकडून आलेल्या सर्व औषधांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे
छत्रपती संभाजी नगरच्या शासकीय रुग्णालयात देखील विशाल इंटरप्राईजेसकडून 33 औषधांचा पुरवठा
खबरदारी म्हणून सर्व 33 औषध पुन्हा अन्न प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार
विशाल इंटरप्राईजेस सोबतचे सर्व कंत्राट रद्द होणार
बेळगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करा, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची मागणी
बेळगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करा, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची मागणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केली मागणी
म सातपुते यांच्या डोक्यावर परिणाम झाला, विधानपरिषदेसाठी खटाटोप सुरुये : उत्तम जानकर
राम सातपुते यांच्या डोक्यावर परिणाम झाला. श्री श्री आश्रम बेंगलोर येथे उपचार घेत होते. पुन्हा विधानसभेत पराभव झाल्यामुळे परिणाम झाला. पुढे जाऊन त्यांना दंगली करायच्या आहेत. असं मेंटल होऊन कसं चालेल. त्यांचं आताच लग्न झालंय. मी लढवय्या आहे. सोक्षमोक्ष लावून माझा हक्क मिळवणार. राम सातपुते यांना विधानपरिषदेवर जायचंय त्यासाठी हा सगळा खटाटोप सुरूय, अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मारकडवाडी गावात दाखल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मारकडवाडी गावात दाखल
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची सभा संपताच नाना पटोले मारकडवाडीत दाखल...
थोड्याच वेळात मारकड वाडी ग्रामस्थ यांच्याशी साधणार संवाद
लातूरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा, आमदार संतोष बांगर आणि आमदार तानाजी मुटकुळे सहभागी
बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आज हिंगोली शहरात बंद पाळण्यात आला आहे. त्याचबरोबर सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे देखील सहभागी झाले होते. मोर्चामध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी हिंगोली पोलिसांकडून मोठा बंदोबस्त.
बांगलादेशमधील हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ लातूरमध्ये आंदोलन
बांगलादेशमधील हिंदूवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ लातूरच्या गांधी चौक येथे सकल हिंदू समाजाकडून आंदोलन. एक है तो सेफ है... बटेंगे तो कटेंगे... ची घोषणाबाजी.
नाशिकमध्ये हिंदू संघटनांच्या मोर्चाला सुरुवात
नाशिकमध्ये हिंदू संघटनांच्या मोर्चाला सुरुवात. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मोर्चाचे आयोजन. नाशिकच्या बी डी भालेकर मैदानापासून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. मोर्चेकऱ्यांकडून जय श्रीरामची घोषणाबाजी, डोक्यावर भगव्या टोप्या आणि हातात निषेधाचे फलक. नाशिक पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात.
पुणे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबतची बैठक संपली
पुणे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबतची बैठक संपली. ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यासंदर्भात बैठक. आज संध्याकाळी पुन्हा दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनू सिंगवी यांच्यासोबत शरद पवार आणि पराभूत उमेदवारांची बैठक होणार. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची का नाही यासंदर्भात पुन्हा एकदा बैठक. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे तसेच उमेदवार सचिन दोडके, प्रशांत जगताप, हर्षवर्धन पाटील ,रमेश बागवे, रमेश थोरात , संजय जगताप, दत्ता बहिरट, अशोक थोरात होते उपस्थित.
कुर्ला बस अपघात प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई होणार : अजित पवार
कुर्ला बस अपघात प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई होणार : अजित पवार
कुर्ला बस अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी करावी, मृतांना 50 लाखांची मदत द्या : सचिन खरात
कुर्ला बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 49 नागरिक जखमी आहेत. कुर्ल्यातील घटना तर अत्यंत गंभीर आहे म्हणून या बस अपघाताची सीआयडी चौकशी करण्यात यावी. तसेच मृत्यू पावलेल्यांना 50 लाखांची आणि जखमींना 10 लाखाची तातडीने राज्य सरकारने मदत द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.
घरगुती भांडणातून तरुणीची विषप्राशन करुन आत्महत्या
घरगुती भांडणातून तरुणीने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. करुणा पोचमलू निर्ला (२०) असं ेमृत मुलीचं नाव आहे.
धुळ्यात तापमानाचा पार घसरला, भाजी विक्रेत्यांचा मोठं नुकसान
धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. तापमान चार अंशावर आले आहे. या कडाक्याच्या थंडीचा परिणाम जनजीवनावर मोठ्या प्रमाणावर झाला असून कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील भाजीपाला खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने व्यापाऱ्यांसह विक्रेत्यांचे देखील नुकसान होत आहे. तसेच वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळे भाजीपाल्याचे भाव देखील घसरले असून गेल्या दोन दिवसांपूर्वी 1 हजार रुपये कॅरेट याप्रमाणे टोमॅटोची विक्री होत होती. मात्र आज 500 रुपये कॅरेट इतका भाव टोमॅटोचा घसरला आहे. तर दुसरीकडे इतर पालेभाज्यांचे देखील भाव घसरले असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
बीडमध्ये ट्रक आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
बीडच्या अंबाजोगाईजवळ लातूर रोडवरील वाघाळापाटी येथे ट्रक आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेजण ठार झाले असून इतर दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पहाटेच्या सुमारास सदरील अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. अद्याप मृतांची नावे समजू शकलेले नाही.