आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान; राज्यातील 11 मतदारसंघात मतदानाची रणधुमाळी 

आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण झाले असून आज 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11  मतदारसंघात निवडणुका पार पडणार आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण झाले असून 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11  मतदारसंघात निवडणुका पार पडणार आहेत.  नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ.संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात आज नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. 

11 लोकसभेतील लढती कशा असतील?
नंदूरबार मतदारसंघातून महायुतीतून भाजपच्या हिना गावित तर महाविकास आघाडीतून काँग्रेसचे गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जळगाव मतदारसंघातून महायुतीतून स्मिता वाघ तर महाविकास आघाडीतून करण पाटील पवार, जालन्यातून भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रसचे कल्याण काळे यांच्यात लढत होणार आहे.

रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे आणि शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. येथून एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, मविआकडून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तर महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपाम भुमरे यांचं नाव आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेतून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पुण्यातून मविआतून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि महायुतीतून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितमधून वसंत मोरे निवडणूक लढवणार आहे. शिरूर मतदारसंघातून मविआतून पवार गटाचे अमोल कोल्हे, अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील, अहमदनगरमधून भाजपचे सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटाचे निलेश लंके निवडणूक लढवणार आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - 'मुख्यमंत्र्यांची धावपळ नाही तर ही अखेरची फडफड'

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मविआतून ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि शिंदे गटातील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यंदा पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहे, तर मविआकडून पवार गटाचे बजरंग सोनावणे उभे आहेत.