महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांची कन्या डॉ. शांताबाई साठे यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. कांदीवली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रदीर्घ आजाराने त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. त्यांच्या मागे बहीण, भाचे, भाची आणि नातवंडे असा परिवार आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या चळवळीतील कामात त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी जयवंताबाई यांच्या शांताबाई या मोठ्या मुलगी होत्या. शांताबाई कायम अविवाहित राहिल्या. लहान वयापासून त्या चळवळीतील कामांमध्ये हिरहिरीने सहभागी होत. कम्युनिष्ट पक्षाच्या बाल संघात आणि लालबावटा चळवळीत त्या कार्यरत होत्या. पक्षबंदीच्या काळात त्या सहा महिने तुरुंगात होत्या.
नक्की वाचा - मोठी कारवाई! मोठं गुप्तहेर प्रकरण उघड, थेट ISI कनेक्शन समोर
शांताबाई यांनी पक्षाच्या हितासाठी संघर्ष केला. अण्णा भाऊ साठे यांच्या चळवळीत त्यांनी मोठं योगदान दिलं. मात्र अण्णा भाऊ साठेंची लेक म्हणून त्यांना जो सन्मान मिळायला हवा होता तो मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.