Lonavala Election: मतदारराजाची संघर्षाला साथ! फळ विकून पोट भरणाऱ्या ताई नगरसेविका झाल्या

भाग्यश्री महादेव जगताप यांनी प्रभाग क्रमांक ११अ मधून दणदणीत विजय मिळवत नगरसेविका म्हणून शपथ घेण्याचा मान मिळवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, लोणावळा:

Lonavala Nagar Parishad Election Result:  राजकारणात जिथे पैशांचा आणि सत्तेचा बोलबाला असतो, तिथे लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकशाहीचे एक प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले आहे. रोज पेरू विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एक सामान्य महिला, भाग्यश्री महादेव जगताप यांनी प्रभाग क्रमांक ११अ मधून दणदणीत विजय मिळवत नगरसेविका म्हणून शपथ घेण्याचा मान मिळवला आहे.

 पेरू विक्रेत्या भाग्यश्री जगताप नगरसेविका...!

लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025  चा निकाल जाहीर झाला असून, विविध प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र दिसून आले आहे. काही प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. त्यातील एक पेरू विक्रेता भाग्यश्री जगताप यांची लढत सर्वात लक्षवेधी ठरली आहे.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च दिलासा! 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती, आमदारकी वाचणार का?

भाग्यश्री जगताप या गेल्या १० वर्षांपासून लोणावळ्यात फळ विक्रीचा व्यवसाय करतात. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत थेट उमेदवारी जाहीर केली होती. निवडणूक काळात त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून प्रचाराची धुरा पेलली. सकाळी आणि दुपारी पेरू विकून संसाराचा गाडा हाकायचा आणि संध्याकाळी मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घ्यायच्या, असा त्यांचा खडतर प्रवास होता.

विजयाचे समीकरण

प्रभाग ११ अ मधून भाग्यश्री जगताप यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीकडून रचना विजय सिंनकर  यांनी निवडणूक लढवली, ज्यामध्ये भाग्यश्री जगताप यांनी 608 मतांनी विजय मिळविला. निवडणुकीत जगताप यांना १४६८ मते मिळाली तर रचना सिंनकर यांना 800 मते मिळाली.  त्यांच्या या विजयाने पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते हे सिद्ध झाले आहे. आदिवासी समाजातील एका सामान्य कुटुंबातील महिलेला मिळालेली ही संधी आणि त्याला मतदारांनी दिलेला कौल, ही लोकशाहीची खरी ताकद मानली जात आहे.

Advertisement

Maharashtra Elections: मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांमधून 'मविआ' हद्दपार! महायुतीचा महाविजय

दरम्यान, हा विजय केवळ माझा नसून संविधानावर आणि मताच्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचा आहे, अशी भावना नवनिर्वाचित नगरसेविका भाग्यश्री जगताप यांनी व्यक्त केली आहे. या ऐतिहासिक विजयामुळे केवळ लोणावळ्यातच नव्हे, तर संपूर्ण मावळ तालुक्यात भाग्यश्री जगताप यांच्या जिद्दीचे आणि कष्टाचे कौतुक होत आहे.