Maharashtra Local Body Election Result: राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील महत्त्वाचे जिल्हे असलेल्या परभणी आणि धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जिल्ह्यात महायुतीने घवघवीत यश मिळवले असून या निकालाचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.
परभणी, धाराशिवमध्ये मविआचा सुपडासाफ!
शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या परभणी जिल्ह्यात नगरपालिकांवर नगराध्यक्षपदी शिवसेनेला यश मिळवता आलं नाही तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला देखील जिल्ह्यातील एका जागेवर विजय मिळवता मिळवता पराभवाला सामोरं जावे लागले आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला कुठेचं अस्तित्व हे दाखवता आले नाही, असाच काहींसा प्रकार धाराशिवमध्ये देखील घडला आहे.
धाराशिवमध्येदेखील आठ नगरपालिकांच्या निकालामध्ये महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्ष पद मिळवता आलं नाही. या ठिकाणी देखील महायुतीनेच आपला वर्चस्वा कायम ठेवले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीला या दोन जिल्ह्यात कोणी वाली राहिलाय की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेत्यांचा जल्लोष
उमेदवार निवडून आल्यानंतर महायुतीतील नेत्यांनी तुफान जल्लोष साजरी केला आहे. परभणीच्या मेघना बोर्डीकर यांनी थेट "मै हुन डॉन" या गाण्यावर आपल्या कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा केला आहे, तर जेव्हा माझे बाबा निवडून यायचे हे गाणं आमचं सुरुवातीपासूनच आहे, आमचे लोक कोणीही निवडून आले की हे गाणं लावून आपला विजय साजरी करायचे असं त्यांनी या वेळी म्हंटल आहे.
असाच जल्लोष धाराशिवमधे देखील बघायला मिळाला आहे, निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत सर्वच नेत्यांनी जल्लोष साजरी केला आहे त्यात शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी 'धाराशिव जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला' असे म्हणत विरोधकांना डिवचले. दरम्यान, स्थानिक राजकारणात ज्या पद्धतीचा फटका आज दोन्ही जिल्ह्यात महाविकास आघाडीला बसला आहे तो दीर्घायुष्य शिकवण देणारा ठरणार आहे, महाआघाडीतील नेत्यांचा लोकसंपर्क राहिलेला नाही यामुळे ही परिस्थिती त्यांच्यावर आल्याचा बोललं जातं आहे.
Sidhi vastre News: शिंदेंच्या रणरागिणीची कमाल! अवघ्या 22 वर्षी नगराध्यक्षा; कोण आहे सिद्धी वस्त्रे?
धाराशिव निकाल: भाजप - 4
- धाराशिव - नेहा राहुल काकडे
- -तुळजापूर - विनोद उर्फ पिंटू गंगणे
- नळदुर्ग - बसवराज धरणे
- मुरूम - बापूराव पाटील
शिवसेना शिंदे गट - 3
- उमरगा - किरण गायकवाड
- कळंब - सुनंदा शिवाजी कापसे
- परंडा - झाकीर सौदागर
स्थानिक आघाडी - 1 ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )
भूम -संयोगिता संजय गाढवे
- शिवसेना उबठा - 0
- काँग्रेस - 0
- राष्ट्रवादि काँग्रेस अजित पवार - 0
- राष्ट्रवादि काँग्रेस शरद पवार - 0
परभणी: भाजप - 2
- 1. प्रतापराव देशमुख (मराठा) (जिंतूर नगरपरिषद)
- 2. मिलिंद सावंत (SC) (सेलू नगरपरिषद)
शिवसेना - 1
1. आसेफ खान (पठाण, मुस्लिम)(Open) (पाथरी नगरपरिषद)
राष्ट्रवादी (अप)- 2
1. उर्मिला केंद्रे (वंजारी, OBC) (गंगाखेड नगरपरिषद)
2. राणी अंकुश लाड (OBC) (मानवत नगरपरिषद)
- काँग्रेस - 0
- शिवसेना (उबाठा)- 0
- राष्ट्रवादी (शप) - 0
- अपक्ष - 2
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world