सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:
Lonavla Municipal Corporation Election 2025: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत आता रंगत आणखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासह 15 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली असून, त्यामुळे आता लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. तर दोन दिवसांपूर्वी भाजपने 11 उमेदवारांची यादी जाहीर करत एकला चलो रे चा नारा दिला होता, आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही स्वबळाचा नारा देत राजकीय समीकरणात उलथापालथ झाली आहे. आगामी निवडणुकीत लोणावळा शहरातील राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.
Kalyan News: शिंदे सेनेनं फक्त 6 तासात व्याजासह भाजपचा हिशोब केला चुकता, दिला मोठा धक्का
कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार?
- प्रभाग 1: सनी राम दळवी
- प्रभाग 2: मंगेश दत्तात्रय मावकर
- अनिता संदीप अंभोरे
- प्रभाग 3: लक्ष्मी नारायण पाळेकर
- प्रभाग 4: रजनीकांत उर्फ बाबू यंदे
- प्रभाग 5: मुकेश थानमल परमार
- वसुंधरा नितीन दुर्गे
- प्रभाग 6: दीपक बबन मालपोटे
- प्रभाग 11: जीवन प्रकाश गायकवाड
- भाग्यश्री महादेव जगताप
- प्रभाग 12: भरत मारुती हारपुडे
- अमृता अमोल ओंबळे
- प्रभाग 13: धनंजय वसंतराव काळोखे
- प्रियांका किशोर कोंडे
- सोनाली संभाजी मराठे