शाळांना सुट्टी लागणार आहे. अशा वेळी कुटुंबासह फिरायला जाण्याचा प्लॅन सर्वच जण करतात. उन्हाच्या चटक्यापासून वाचण्यासाठी पहिली पसंती ही थंड हवेच्या ठिकाणांना असते. महाबळेश्वरलाही अनेक जण जातात. पण जरा थांबा तुम्ही 2 ते 4 मे च्या दरम्यान महाबळेश्वरला जाणार असाल तर काही बाबी लक्षात घ्या. 2 ते 4 मे या कालावधीत महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव 2025 चं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सव कालावधीत महाबळेश्वर हद्दीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवास महाराष्ट्र राज्यातुन मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यात व्ही.व्ही.आयपी व व्हीआयपी हे सुध्दा पर्यटन महोत्सव कार्यक्रमास भेट देणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाबळेश्वर-पांचगणी रोड अतिशय अरुंद असल्याने व घाट रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी व वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महोत्सव कालावधीत वाई बाजुकडुन पांचगणी-महाबळेश्वरकडे जाणाऱ्या आणि महाबळेश्वर पाचगणी बाजूकडुन वाई-सातारा बाजूकडे जाणाऱ्या नागरीकांची व वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणुन 2 ते 4 मे या कालावधीत प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी काही बदल सुचवले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - काहीतरी मोठे घडणार ? CDS आणि NSA ची पंतप्रधानांसोबत बैठक
वाहनांच्या वाहतुक मार्गात काही बदल करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई- पुणे- वाई बाजूकडुन येणारी सर्व प्रकारची वाहतुक ही वाई (पसरणी घाट) मार्गे पांचगणी व महाबळेश्वरकडे जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील. महाबळेश्वर वरून मुंबई- पुणे-वाई बाजूकडे जाणारी सर्वप्रकारची वाहतुक ही महाबळेश्वर-मेढा-कुडाळ-पाचवड वरुन पुणे बैंगलौर महामार्गाकडे जाईल.
ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: कधी, कुठे, कसं, सैन्य ठरवेल तसं! मोदींच्या बैठकीत मोठा प्लॅन ठरला
महाबळेश्वरवरून भिलार-पाचगणी बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही महाबळेश्वर उदय हॉटेल चौक- आर आर कॉटेज चौक –क्षेत्र महाबळेश्वर नाका मार्गे – अवकाळी अशी जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील. महाबळेश्वर वरुन वेण्णा लेककरीता जाणारी वाहतुक ही महाबळेश्वर मार्केट- आर आर कॉटेज चौक –क्षेत्र महाबळेश्वर नाका –नाकिंदा फाटा मार्गे वेण्णालेककडे जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील.
ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: पाकिस्तानचा मोठा डाव फसला, करायला गेले एक अन् झालं भलतचं
महाबळेश्वर वरून सातारा, सांगली बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही महाबळेश्वर मेढा- सातारामार्गे पुणे –बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीकडे जाईल. वाहतूक बदलाबाबत ठिकाणी दिशा दर्शक फलक व पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.