- महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावावर दर पावसाळ्यात डोंगर खचण्याचा धोका कायम राहतो
- डोंगरावर असलेली लाखो लिटर क्षमतेची पाण्याची टाकी खचल्यास संपूर्ण गाव वाहून जाण्याची भीती आहे
- मुसळधार पावसामुळे डोंगरावर मातीचे ढिगारे खाली येत असून गावकऱ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे
राहुल तपासे
Satara Exclusive News: पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वरमध्ये ही जोरदार पाऊस होत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावं ही डोंगर आणि कडेकपाऱ्यात वसली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यांना या गावांना धोका निर्माण झाला आहे. त्या पैकीच एक गाव हे नावली आहे. या गावावर दर पावसाळ्यात धोक्याचं सावट असतं. हे गाव डोंगराच्या पायथ्याला आहे. पायथ्या जवळ गाव आहे. हा डोंगर नेहमी खसकत असतो. मातीचे ढिगारे त्यामुळे गावाच्या दिशेने येतात. त्याच डोंगरावर गावाला पाणी पुरवठा करणारी लाखो लिटरची पाण्याची टाकी ही आहे. हेच भूस्खलन जर मोठ्या प्रमाणात झाले तर संपूर्ण गाव गाडले जाण्याची भीती गावकरी व्यक्त करत आहेत. सध्या पावसामुळे हा डोंगर खचायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नावली गावातल्या गावकऱ्यांची झोप उडाली आहे.
सातारा जिल्ह्यातील आणि महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात नावली हे गाव आहे. पण या गावाला जसे निसर्गाचे वरदान लाभले आहे, त्याच प्रमाणे हाच निसर्ग या गावचा जणू दुष्मन झाल्याची स्थिती आहे. हे गावाच्या वरच्या बाजूला डोंगर आहे. हा डोंगर प्रत्येक पावसाळ्यात खचतो. याच डोंगरावर गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी आहे. या टाकीत लाखो लिटर पाणी आहे. जर ही टाकी कोसळली तर संपूर्ण गाव वाहून जाईल असं गावकरी सांगतात. शिवाय त्याच्या सोबत वाहून येणाऱ्या ढिगाऱ्याखाली गाढलं ही जाण्याची भीती आहे. त्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. त्यात हा डोंगर खचला आहे.
त्याच वेळी डोंगरावर असलेली झाडे खाली पडली. त्यांच्या सोबत मातीचा ढिगारा ही खाली आला. त्याच्या खालच्या बाजूला घरं आहेत. ही घटना घडल्यानंतर गावकरी घराबाहेर पडले. त्यांनी तातडीने याची माहिती प्रशासनाला दिली. त्यानंतर तहसीलदार, प्रांत, तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी काही घरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी तात्पूरते पुनर्वसन करण्याचे सांगितले. त्यानंतर ज्या घरांना धोका आहे त्या लोकांना कुठे हलवायचे याचा विचार आता गावातले लोक करत आहेत. शिवाय जो ढिगारा खाली आला आहे तो काढण्याचे काम सुरू आहे. पण पाऊस जर असाच सुरू झाल तर लाखो लिटरची पाण्याची टाकी खाली कोसळू शकते. त्याच्या आजूबाजूची माहिती सध्या खचत चालली आहे.
त्यामुळेच गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ते घरा ऐवजी बाहेर जमले आहेत. कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही त्यामुळे गावात सध्या तरी स्मशान शांतता दिसून येत आहे. प्रशासनाने तातडीनो तोडगा काढावा. कायम स्वरूपी दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करावे अशी मागणी गावकरी करत आहे. आता तात्पूर्ती सोय होईल. पण त्याच वेळी निसर्गाचा कोप झाला तर काय करणार असा प्रश्न गावकरी करत आहेत. सध्या महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. नावली गावात ही पावसाचा जोर आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होवू शकते असं गावकऱ्यांना वाटत आहेत. काल सकाळ पासून जीव मुठीत घेवून गावकरी आहे. काही झाडं ही पहाटेच्या सुमारास कोसळली. तेव्हा पासून संपूर्ण गाव जागं आहे. गाव भयभीत आहे. त्यामुळे आता गावकरीच एकत्र येत यावर उपाय शोधत आहेत. दरम्यान गावाला कोणता ही धोका नाही असा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शिवाय काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचं सांगण्यात आलं आहे.