Mahabaleshwar-Poladpur Road: महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता 6 दिवस बंद, आंबेनळी घाटात मोठी दरड कोसळली

Mahabaleshwar-Poladpur Road : पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात मोठी दरड कोसळली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
Mahabaleshwar-Poladpur Road : ही दरड हटवण्यासाठी चार ते पाच दिवस लागणार आहेत.
सातारा:


राहुल तपासे, प्रतिनिधी

Mahabaleshwar-Poladpur Road : पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात मोठी दरड कोसळली आहे. ही दरड हटवण्यासाठी चार ते पाच दिवस लागणार आहेत. त्यामुळे हा घाट सहा दिवस संपूर्ण बंद राहणार आहे.  सातारा प्रशासकीय यंत्रणेकडून तसा आदेश दिला आहे.

महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन म्हस्के यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार पोलादपूरकडून महाबळेश्वरला जाणाऱ्या वाहनांना रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसंच महाबळेश्वरकडून पोलादपुर कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. 

( नक्की वाचा : Pune News: पुण्यातील अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई, राज्य सरकारची घोषणा )

ही दरड कोसळल्यानं महाबळेश्वर ते पोलादपूर स्ता वाहतूकीसाठी पुर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना सूचना देऊन सदरचा रस्ता बंद करणेच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याची  विनंती आहे, असं आवाहन म्हस्के यांनी केलं आहे. 

( नक्की वाचा : Satara Accident: गाडी घसरली नाही, मस्ती नडली! साताऱ्यातील घटनेचा धक्कादायक VIDEO समोर )

Topics mentioned in this article