Ajit Pawar Death: मोठा खुलासा! अजित पवारांच्या विमानातून जाणार होता 'हा' बडा नेता; वेळ चुकली, अनर्थ टळला

अपघाताच्या काही दिवस आधीच माझे अजित पवार यांच्याशी बोलणे झाले होते, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी अजित पवारांनी मला सोबत बारामतीला येण्याचे निमंत्रण दिले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झाला
  • राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर त्या दिवशी अजित पवारांसह विमानातून जाणार होते
  • अपघाताच्या काही दिवस आधी अजित पवारांनी त्यांना बारामतीला येण्याचे निमंत्रण दिले होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

DCM Ajit Pawar Plane Crash Accident:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.  राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी एक खळबळजनक माहिती दिली आहे. ज्या दिवशी हा भीषण अपघात झाला, त्या दिवशी आपणही अजित पवारांसोबत त्याच विमानातून जाणार होतो, असे जानकर यांनी सांगितले. मात्र काही कारणांमुळे  त्यांचा हा प्रवास टळला आणि त्यांचा जीव बचावला.

अजित दादांच्या विमानातून जाणार होते महादेव जानकर..

28 जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या चार्टर्ड विमानाचा अपघात झाला होता. बारामती विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर हे विमान कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महादेव जानकर यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. अपघाताच्या काही दिवस आधीच माझे अजित पवार यांच्याशी बोलणे झाले होते, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी अजित पवारांनी मला सोबत बारामतीला येण्याचे निमंत्रण दिले होते.

हृदयस्पर्शी VIDEO: 'दादांची आठवण उडत उडत पायाजवळ', तरुणीला घटनास्थळी सापडला 'असा' कागद; 80 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ

वेळ चुकली, अनर्थ टळला..!

महादेव जानकर यांनी सांगितले की, ठरल्याप्रमाणे मी अजित पवारांसोबत त्याच विमानातून प्रवास करणार होतो. परंतु, त्या दिवशी मला मुंबईला पोहोचायला उशीर झाला. अजित पवारांचे विमान सकाळी लवकर निघणार होते. मी वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे माझा तो प्रवास रद्द झाला. जानकर म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अजित पवार यांचे निधन होणे हे राज्याचे मोठे नुकसान आहे. विमानतळावर पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने आपला जीव वाचला असला तरी, राज्याच्या एका मोठ्या नेत्याला आपण गमावले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत आणि त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला प्रभाव आहे. 2016 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री म्हणून काम पाहिले होते. अजित पवारांसोबत असलेल्या त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळेच त्यांना या प्रवासाचे निमंत्रण होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

Advertisement

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? धक्कादायक बाब आली समोर