महाधनेश म्हणजेच गरुड गणेश या पक्षाचे दर्शन साताऱ्याच्या कास पठार परिसरात झाले आहे. हा पक्षी दुर्मीळ प्रजातीत मोडला जातो. महाधनेशचे दर्शन झाल्यामुळे इथं आलेल्या पक्षीप्रेमींना एक पर्वणीच मिळाली आहे. त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. महाधनेश हा पक्ष विशेष करुन अरुणाचल प्रदेशात आढळतो. त्याचा रंग त्याची चोच या मुळे तो सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. सध्या कास भागात हा पक्षी पहायला मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या पक्षाचा रंग हा काळा, पिवळा आणि पांढऱ्या तांबूस रंग असतो. शिवाय त्याची मोठी चोच यामुळे तो सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतो. सातारा शहरात काही ठिकाणी, तर कास पठारावरील पिसाणी येथे 3 महाधनेश पक्ष्यांचे दर्शन झाले आहे.पश्चिम घाटातील घनदाट जंगलांमध्ये हा आढळतो. दाट आणि उंच झाडी असलेल्या ठिकाणी तो राहतो. विशेष करुन तो लोकांच्या नजरेस पडणार नाही अशी ठिकाणं राहाण्यासाठी निवडतो.
उंच झाडावरील वेगवेगळ्या प्रकारची फळं त्याचे मुख्य खाद्य आहे. शत्रूपासून संरक्षण व्हावे म्हणून उंच झाडावर तो नेहमी बसलेला आढळतो. उंचा झाडांवरच तो घरटे बांधतो. जैवविविधतेच्या दृष्टीने हा पक्षी महत्त्वाचा समजला आहे. तो बीजप्रसार करण्यास मदत करतो असं पक्षीप्रेमी सांगतात. जंगलाच्या पुनरुत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका ही या महाधनेशची असतो. त्याचा मूळ अधिवास नष्ट होत आहे. शिवाय या पक्षाची शिकारही केली जाते.
या कारणामुळे महाधनेश या पक्षाचे अस्तित्वाला धोक्यात आले आहे. तो दुर्मीळ पक्षात आता गणला जातो. यामुळे या पक्ष्याचे अधिवास आणि खाद्यस्रोत टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसं मत पक्षी अभ्यासकही व्यक्त करत आहेत. तसे झाल्यास या पक्षाची जात वाचवली जावू शकते. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची गरजही पक्षी अभ्यासकांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने पावलं टाकली तर महाधनेश वाचू शकतात.