1 day ago

Maharashtra Live Blog Updates: आज संपूर्ण देशामध्ये होळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातोय. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी लोकं राखेची आणि रंगांची होळी खेळतात. ही मुख्य होळी असते. यादिवशी सकाळी लवकर उठून आदल्या दिवशीच्या होळीची जी राख असते ती एकमेकांच्या अंगाला लावून होळी खेळली जाते. दुसरीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून त्यामध्येही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. 

Mar 13, 2025 22:17 (IST)

आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी

देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर  इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल.  यासाठी केंद्र शासन 400 कोटी रूपयांची आर्थ‍िक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio-Visual & Entertainment summit-2025-‘वेव्ह्ज 2025’ ) च्या पहिल्या सत्राचे आयोजन आज सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आले. या सत्रात मुख्यमंत्री  फडणवीस यांनी ही माहिती दिली.

Mar 13, 2025 21:06 (IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मुंबईत होणाऱ्या WAVES समिटचं मोदींना यावेळी फडणवीसांनी निमंत्रण दिलं. मुंबईत 1 मे पासून  WAVES समिट होणार आहे. 

Mar 13, 2025 17:50 (IST)

खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर वन विभागाने पाडले

खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर वन विभागाने पाडले आहे.   हे घर त्याच्या मालकीच्या जागेवर नसून, वनविभागाच्या हद्दीमध्ये असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात त्याच्यावर वनविभागानं गुन्हा दाखल केला होता. अखेर आता वनविभागाकडून त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. त्याचं घर पाडण्यात आलं आहे. यापूर्वीच त्याला नोटीस देखील देण्यात आली होती.

Mar 13, 2025 15:31 (IST)

Badlaour News: बदलापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रवादीचं आंदोलन, डॉक्टरांना भेट दिल्या गाद्या

बदलापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आज गाद्या भेट देत झोपा काढा, असा उपरोधिक सल्ला देत आंदोलन केलं. या आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत सरसकट पुढे पाठवलं जात असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे.

Advertisement
Mar 13, 2025 15:01 (IST)

LIVE Updates: नितेश राणेंना मंत्रिमंडळातून काढा: ठाकरे गटाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून निष्कासीत करण्यात यावे या मागणीला घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र 

 शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी लिहिले पत्र 

 सरकारचा निधी हा फक्त महायुतीमधील सरपंचांना मिळणार इतरांना एक रुपयाचा ही निधी मिळणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्या नितेश राणे यांनी काही दिवसापूर्वी केले होते 

 मंत्री आकस बुद्धीने कसे वागू शकतात त्यांची ही भूमिका संविधान विरोधी भूमिका आहे  

 अशा विधानांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असेल तर संविधान विरोधी वक्तव्यांना भूमिकेला राज्य सरकार खतपाणी घालते असा त्याचा अर्थ होईल 

 त्यामुळेच नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून निष्काषित करावे ठाकरे गटाची मागणी

Mar 13, 2025 14:14 (IST)

Beed News: बीडमध्ये पुन्हा मारहाण.. जमिनीच्या वादातून कुटुंबावर हल्ला

जमिनीच्या वादातून कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या कुमशी गावात उघडकीस आला आहे.. या मारहाणीचा व्हिडिओ ही समोर आला आहे.. यामुळे खळबळ उडाली असून जखमी वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत..जमिनीच्या वादातून 40-50 गुंड भाड्याने आणून लहान मुल,महिला,पुरुषांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

Advertisement
Mar 13, 2025 13:47 (IST)

LIVE Updates: तेलंगणा प्रशासनाची मुजोरी, मार्गाचे नुकसान टाळण्यासाठी थेट वाहतूकच बंद

महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात होणाऱ्या जड वाहतूकीमुळे मार्गाचे नुकसान होत असल्याचा ठपका ठेवत तेलंगणा प्रसाशानाने दोन राज्याला जोडणाऱ्या पुलावरील वाहतूकीला रोख लावला आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील सीमेत येऊन तेलंगणा पोलीस वाहनावर कारवाई करीत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या शेवटचा टोकावर असलेल्या पोडसा या गावातील गावकरी चांगलेच संतापाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात पोडसा गावालगत दोन राज्यांना जोडणारा वर्धा नदीवरील पूल आहे. याच पुलावरून माल वाहतूक होत असते. त्यामुळे महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचे संबंध अधिक दृढ झाल्याचे बोलले जात होते. मात्र तेलंगणा प्रशासनाच्या एका कृतीने या संबंधाला तडा जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे. 

Mar 13, 2025 13:46 (IST)

Jalgaon News: चोरी करणाऱ्या आंतरराज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव अमळनेर मुक्ताईनगर तालुक्यात विविध ठिकाणी जबरी चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला असून या चारही गुन्ह्यातील चोरी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र या टोळीतील आरोपी अद्यापही फरार असून सदर टोळी ही मध्य प्रदेशातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान पोलिसांच्या विविध पथकांकडून या टोळीचा शोध सुरू आहे.

Advertisement
Mar 13, 2025 13:44 (IST)

Jejuri News: जेजुरीत संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध, धनंजय मुंडेंनाही आरोपी करण्याची मागणी

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आज संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी आणि महादेव मुंडे यांच्या हत्येचा  निषेध करण्यात आला....  त्याचबरोबर या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली..... 

जेजुरी येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये एकत्र येत आंदोलकांनी  निषेध सभा देखील घेतली आहे.यावेळी या आंदोलकांनी धनंजय मुंडे यांना ही आरोपी करण्याची मागणी केली आहे.

Mar 13, 2025 11:44 (IST)

LIVE Updates: पुण्यामध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड

- मोशीत दोन गटाच्या वादात तीन दुचाकींची आणि एक चारचाकी वाहनांची 10 ते 15 जणांनी केली तोडफोड

- घटना सीसीटीव्हीत कैद

- बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाके का वाजवतो, यावरुन वादाला तोंड फुटले अन पुढं या वादातून वाहनांची तोडफोड झाली

- रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला

- केएसबी चौकात काल दिवसा ढवळ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.

- तर काही तासांच्या अंतरात पुन्हा एकदा हा प्रकार घडला.

- कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायम ऐरणीवर आहे

Mar 13, 2025 11:21 (IST)

Beed News: धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर पोलिसांना शरण

तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना आला शरण

Mar 13, 2025 11:00 (IST)

Ambarnath News: अंबरनाथ शहरावर पसरले धुराचे लोट, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

अंबरनाथ शहरात सध्या धुराचं मोठं साम्राज्य पसरलं आहे. अंबरनाथ पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण शहरावर मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. काल दुपारच्या सुमारास डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नसून या आगीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने संपूर्ण अंबरनाथ शहरावर धुराची चादर पसरली आहे. ज्यामुळे दृश्यमानताही कमी झाली आहे. 

Mar 13, 2025 10:59 (IST)

Live Updates: खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे: सुरेश धस यांच्यावर टीका

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अजय मुंडे यांनी बीड मध्ये पत्रकार परिषद घेत सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कारणाम्यावरून सुरेश धस यांना सहा आरोपी करा अशी मागणी केली होती.

त्यातच काल सतीश उर्फ खोकला भोसले याला प्रयागराज येथे अटक करण्यात आली त्यानंतर आता अजय मुंडे यांनी नाव न घेता खोक्या सापडला..! आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे..! अशी टीका आमदार सुरेश धस यांच्यावर केली आहे. एक्स सोशल हँडल वर पोस्ट करत ही टीका करण्यात आलीय.

Mar 13, 2025 10:57 (IST)

Washim News: वाशिम जिल्ह्यात चारा टंचाईची शक्यता, पशुपालक चिंतेत

वाशिम जिल्ह्यात यंदा पाणीसाठे लवकर कोरडे पडल्यानं जनावारांच्या चाऱ्यावर त्याचा परिणाम जाणवत असून पुढील काळात चाऱ्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळं पशुपालक, मेंढपाळ आपल्या शेळ्या- मेंढया, गायी-बैलांना घेऊन पाणी आणि चाऱ्याची सोय असलेल्या ठिकाणी स्थलांतरित होत आहे.

 विशेषतः मानोरा तालुक्यातील दुर्गम भागामध्ये कोरडवाहू शेती असल्याने या भागातील पशुपालकांना चाऱ्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

Mar 13, 2025 10:55 (IST)

Hingoli News: 5 सराईत गुन्हेगार हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

 हिंगोली जिल्ह्यात सराईत गुन्हेगारी व अवैध धंदे चालवणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. सराईतपणे व टोळीने गुन्हे करणाऱ्या पाच जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या पाचही जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हे हद्दपारीचे आदेश काढले आहेत.

Mar 13, 2025 10:54 (IST)

Nagpur Crime: डोळ्यात ळ्यात मिरचीची पूड टाकून अकरा लाख चाळीस हजार रुपये लंपास

नागपुरात एका व्यक्तीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून अकरा लाख चाळीस हजार रुपये नगदी असलेली थैली हिसकावून घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 बुधवार दुपारी सेंट्रल अव्हेन्यू रोडवरील  टेलिफोन एक्सचेंज चौक स्थित एचडीएफसी बँक येथून तीननल  चौक स्थित पृथ्वी मेटल चे मालक किरण चिंचमलापुरे यांचे बँक खात्यातील 11 लाख 40 हजार रुपये त्यांचा कर्मचारी शेख मुजफ्फर उर्फ गुड्डू हा स्कूटर वर काळया रंगाच्या थैल्यात ठेवून घेऊन जात असताना ही घटना घडली. 

Mar 13, 2025 09:41 (IST)

LIVE Updates: विधानपरिषदेसाठी झीशान सिद्दिकी यांचं नाव आघाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी झीशान सिद्दिकी यांचं नाव आघाडीवर

पक्षातील वरिष्ठ नेत्यांची झीशान सिद्दिकी यांना संधी देण्याची इच्छा मात्र पक्षातून सिद्दिकी यांच्या नावाला प्रचंड विरोध - सूत्रांची माहिती

पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लक्षात घेऊन उमेदवारी देण्याची मागणी  तर काहींची विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा संधी नको अशी भूमिका

झिशान सिद्धकी यांच्याकडून मात्र कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू करण्यात आल्याची सूत्रांची माहिती

Mar 13, 2025 09:40 (IST)

Amravati News: नोकरीचे आमिष दाखवून मित्राकडून 8 लाखांची फसवणूक

 नोकरीचे आमिष देत वर्गमित्रानेच केली आठ लाखांनी फसवणूक...

तरुणांकडून अमरावतीच्या राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल...

 अमरावती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात नोकरी लावून देण्याचे दिले होते आमिष...

 माझी मुंबईपर्यंत ओळख असल्याचा केला होता दावा..

 पोलिसांकडून तरुणाच्या तक्रारीची चौकशी सुरू...

 शोएब अली शब्बीर अली, चांदूरबाजार असे आरोपीचे नावं 

 तर विकास विक्रम पोवते असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव...

Mar 13, 2025 08:52 (IST)

LIVE Updates: Apple कंपनीची बनावट उत्पादने विकणाऱ्या तिघांना अटक, पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त

Apple कंपनीचे आयफोन, वायरलेस चार्जर, इयर बड आणि वॉच ची नक्कल असलेल्या खोट्या उत्पादनांची अत्यंत स्वस्तात विक्री करण्यात येत होती. 27 हजारांचे इयर बड अडीच हजारांना, 41 हजारांची apple कंपनीची वॉच चार हजार रुपयांत विक्री केली जात होती 

मुख्य म्हणजे, चक्क नागपूर पोलिसांच्या गुन्हे  शाखा युनिट क्रमांक पाच कार्यालयासमोर ही विक्री करण्यात येत होती.

एका पोलिस अधिकाऱ्याचे हे लक्षात आल्यावर जैमुद्दीन सैफी, नईम नूर मलिक आणि मोहसीन मलिक या दिल्ली येथील तिघांना अटक करण्यात आली.

Mar 13, 2025 08:44 (IST)

Pune News: सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी 800 पानांचे आरोपपत्र दाखल

पुणे शहरातील हडपसर येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश सातबा वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून नऊ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अपहरण करून नंतर खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच पतीच्या खुनाची सुपारी दिली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. शेजारी राहणाऱ्या अक्षय जवळकर याच्यासोबत मोहिनी वाघ यांचे प्रेमप्रकरण होते, त्यात अडथळा येत असल्याने त्यांचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे 800 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

मोहिनी वाघ, अक्षय जवळकर, पवनकुमार शर्मा, विकास शिंदे, अतिश जाधव या 5 आरोपी विरुद्ध हे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

Mar 13, 2025 08:41 (IST)

Nagpur Crime: नागपुरात पुढील दोन दिवस तापमान 40च्या वर

* बुधवारी अवघ्या चोवीस तासांत नागपूरचे कमाल तापमान 2.6 अंशांनी वाढून 40.2 डिग्री पर्यंत पोहोचले असून हे हंगामातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे. 

* 15 मार्च पर्यंत नागपूरचे कमाल तापमान 40 डिग्री वर राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

* विदर्भात होळीचे दोन दिवस आभाळ निरभ्र राहणार असून आर्द्रता कमी असेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

Mar 13, 2025 08:14 (IST)

LIVE Updates: मुंबई अहमदाबाद महामार्गावरिल ढिसाळ कामामुळे अपघातांमध्ये वाढ

मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुरू असलेल्या व्हाईट टॉपिंगच्या ढिसाळ कामामुळे दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत असून सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गावर चिल्हार फाटा येथील उड्डाणपुलावर सुरू असलेल्या व्हाईट टॉपिंगच्या कामामुळे तिहेरी अपघात, तसेच हालोली गावाच्या हद्दीत माहामार्गावर अस्ताव्यस्त पडलेल्या सिमेंट बॅरिगेट्समुळे रात्री महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Mar 13, 2025 08:12 (IST)

Crime News: 12 वीचा पेपर देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण

भीम नगरमध्ये राहणारे रिक्षाचालक कैलास रेस्वाल यांचा मुलगा केतन हा 12 वीचा पेपर देऊन घरी परतत होता. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याला पवार, ओझा आणि इतर तीन ते चार तरुणांनी आहुजा फरसाण वाल्याच्या गल्लीत अडवले. त्याला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात फरशी मारली. बाजूलाच रिक्षा चालवत असलेले कैलास यांना ही माहिती मिळताच त्यांनी धावत जाऊन मुलाला जमावापासून वाचवलं, आणि मारहाण करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं.

Mar 13, 2025 08:12 (IST)

Ambarnath LIVE: अंबरनाथ पालिकेचे प्रशासक प्रशांत रसाळ यांनी मानले अंबरनाथकरांचे आभार!

अंबरनाथ पालिकेचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांची नगरविकास राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून बदली झाली असून बुधवारी अंबरनाथ पालिकेत त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रसाळ यांनी ५ वर्ष सेवेची संधी दिल्याबद्दल अंबरनाथकरांचे आभार मानले. तसंच पालिकेतून निघताना पालिकेच्या इमारतीला वाकून नमस्कार करत आपण सदैव अंबरनाथकरांच्या ऋणात राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.