5 hours ago

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. मुख्यमंत्र्यांनी काल १६ जुलै रोजी उद्धव ठाकरेंसाठी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. ठाकरेंना खुली ऑफर दिल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे प्रकाश महाजन आज अमित  ठाकरेंची भेट घेणार आहेत. मनसेच्या शिबिरात आमंत्रण नसल्याने प्रकाश महाजन नाराज आहेत. जाहीर नाराजीनंतर प्रकाश महाजन अमित ठाकरेंच्या भेटीला मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज दुपारी 1 वाजता मनसेच्या मध्यवर्ती कार्यालय राजगडावर महाजन हे अमित ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Jul 17, 2025 19:14 (IST)

Live Update : विधानभवनात झालेल्या प्रकाराबाबत गोपिचंद पडळकर यांनी व्यक्त केली दिलगिरी

विधानभवनात झालेल्या प्रकाराबाबत गोपिचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यानंतर ते जास्त काही बोलण्या आधीच तिथून निघून गेले. त्यांनी अधिक काही स्पष्टीकरण दिलं नाही. 

Jul 17, 2025 19:02 (IST)

हाणामारी करणारा कार्यकर्ता माझाच- गोपिचंद पडळकर

विधानभवनात हाणामारी करणारा कार्यकर्ता हा माझाच असल्याची कबूली आमदार गोपिचंद पडळकर यांनी दिली आहे.  

Jul 17, 2025 19:02 (IST)

जबाब नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नितिन देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले

विधानभवनात झालेल्या मारहाण प्रकाराची पूर्ण माहीती आणि जबाब नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नितिन देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Jul 17, 2025 18:59 (IST)

विधानभवनात हाणामारी करणे चुकीचे - देवेंद्र फडणवीस

अशी मारामारी करणं विधानभवनात चुकीचं आहे. ज्यांनी मारहाण केली आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.  पण कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचे आहेत असं ही ते म्हणाले. 

Advertisement
Jul 17, 2025 18:23 (IST)

Live Update : विधानभवनातील राड्यानंतर जयंत पाटील जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

विधानभवनातील राड्यानंतर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. ते झालेली सर्व घटना मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत. या घटनेमुळे विधान भवनाची परंपरा आणि प्रतिमा मलिन झाल्याचं या नेत्यांंचं म्हणणं आहे. शिवाय ज्या कार्यकर्त्यांनी हे केलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे असं ही त्यांनी यावेळी सांगितलं.  

Jul 17, 2025 17:49 (IST)

Live Update : आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा विधानभवनातही राडा

विधानभवनातच जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद  पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा राडा झाला. या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यात काहींचे कपडेही फाडले गेले.जोरदार राडा यावेळी पाहायला मिळाला. दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली.  

Advertisement
Jul 17, 2025 17:00 (IST)

Live Update : महाविकास आघाडीच शिष्टमंडळ उद्या राज्यपाल यांची भेट घेणार

महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ उद्या राज्यपाल यांची भेट घेणार आहेत

जन सुरक्षा विधेयकावर सही करू नये असं विनंती करणार पत्र ते देणार आहेत

काँग्रेस कडून विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील , शिवसेनेकडून अंबादास दानवे आणि भास्कर जाधाव, राष्ट्रवादी कडून जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत

Jul 17, 2025 13:22 (IST)

Live Update : महाराष्ट्रातील जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर कॉंग्रेस हायकमांडचा सावध पवित्रा

महाराष्ट्रातील जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर कॉंग्रेस हायकमांडचा सावध पवित्रा

दिल्ली कॉंग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसकडून जन सुरक्षा विधेयकासंबंधी सविस्तर अहवाल मागवला

महाराष्ट्रातील जनसुरक्षा कायदा देशात इतरत्रही आणला जाऊ शकतो... याकरता कॉग्रेसची आक्रमक भूमिका ठरवण्याकरता अहवाल मागवला

विधीमंडळात फारसा आक्रमक विरोध न होताच हे विधेयक मंजूर झाले मात्र या विधेयकाविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्याचा कॉग्रेसचा निर्धार

विधानसभेत विरोध करण्यास आम्हाला पुरेसा वेळ मिला ला नसल्याचं काही नेत्यांचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी थोड्याच दिवसात एआयसीसी ला अहवाल सादर करणार

Advertisement
Jul 17, 2025 13:21 (IST)

Live Update : जोगेश्वरी येथील हिंदूदृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रामा केअर रुग्णालयाचा अति दक्षता विभाग बंद

जोगेश्वरी येथील हिंदूदृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रामा केअर रुग्णालयाचा अति दक्षता विभाग बंद

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लेखी उत्तरात कबुली

अतिदक्षता विभागातील कंत्राटदारांमार्फत घेण्यात आलेल्या डॉक्टरांच्या सेवा, कंत्राटदाराने कोणती पूर्व सूचना न देता अचानक बंद केल्या

अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टरांची सेवा देणाऱ्या मॅक्स केअर हॉस्पिटल या कंपनीला तीन वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई

रुग्णांची गैरसाई होऊ नये म्हणून अति दक्षता विभागामध्ये तात्काळ कूपर रुग्णालयामार्फत वरिष्ठ व कनिष्ठ निवासी डॉक्टरकडून वैद्यकीय सेवा देण्यात आल्या आहेत

Jul 17, 2025 10:35 (IST)

Live Update : कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वर्ध्याच्या वायगाव निपाणी येथील घटना

लघु वीज वाहिनीवर काम करत असतांना विजेचा धक्का लागून झाला मृत्यू

33 केव्ही वीज वितरण उपकेंद्र वायगाव येथील एसप्रेस फिडरचे सुरू होते दुरुस्तीचे काम

Jul 17, 2025 10:01 (IST)

Live Update : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी वाढल्याने रुग्णांवर खाली गाद्या टाकून उपचार करण्याची वेळ...

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी वाढल्याने रुग्णांवर खाली गाद्या टाकून उपचार करण्याची वेळ...

एकीकडे अत्याधुनिक रुग्णालय धुळखात तर दुसरीकडे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ..

रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर पसरली आहे दुर्गंधी. रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन ही बंद असल्याची रुग्णांची माहिती..

बदलत्या वातावरनाने वाढले आजार त्यामुळे वाढली रुग्णांची गर्दी...

Jul 17, 2025 08:59 (IST)

Live Update : क्रीडा शिक्षकाची विद्यार्थ्यांना मारहाण, छत्रपती संभाजीनगर नामांकित शाळेतील प्रकार

क्रीडा शिक्षकाची विद्यार्थ्यांना मारहाण, छत्रपती संभाजीनगर नामांकित  शाळेतील प्रकार

विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

पोलिसात आणखी कोणताही गुन्हा दाखल नाही

शहरातील नामांकित शाळेतील शिक्षकाच्या मारहाणीच्या व्हिडिओने खळबळ

Jul 17, 2025 08:58 (IST)

Live Update : विजय वडेट्टीवारांना काँग्रेस हायकमांडकडून नोटीस

विजय वडेट्टीवारांना काँग्रेस हायकमांडकडून नोटीस

जनसुरक्षा विधेयकावरून वडेट्टीवारांना नोटीस

'विधेयकाला सभागृहात विरोध का केला नाही?'

काँग्रेस हायकमांडने वडेट्टीवारांकडे मागितलं उत्तर

वडेट्टीवार विधेयक मांडताना सभागृहात उपस्थित नव्हते

वडेट्टीवार या कारणे दाखवा नोटीसला काय उत्तर देणार?

विजय वडेट्टीवार कॉग्रेसचे विधिमंडळ गटनेते

Jul 17, 2025 07:40 (IST)

Live Update : नागरिकांच्या सतर्कतेमुळे ११ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा डाव फसला..

छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर परिसरातील नाथ प्रांगण येथे शिकवणीसाठी गेलल्या ११ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न बुधवारी रात्री सातच्या सुमारास घडला. मात्र, सतर्क नागरिक आणि मुलीला सोडणाऱ्या चालकाने समयसूचकता साधत या गाडीचा पाठलाग केला. त्यामुळे अपहरणकर्त्याचा प्रयत्न फसला आणि घटनास्थळी कार सोडून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तर मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते.

Jul 17, 2025 07:38 (IST)

Live Update : सीएम देवेंद्र फडणवीस आज सकाळी 8 वाजता पूर्व विदर्भातील भाजपा आमदारांची बैठक घेणार

वर्षा निवासस्थानी सीएम देवेंद्र फडणवीस आज सकाळी आठ वाजता पूर्व विदर्भातील भाजपा आमदारांची बैठक घेणार आहे. गेली तीन दिवस सीएम सर्व विभागनिहाय बैठक घेतात. आज पूर्व विदर्भातील आमदारांशी संवाद करणार आहे

Topics mentioned in this article