Maharashtra Assembly Monsoon Session 2025: राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. मराठी- हिंदी भाषावाद, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी तसेच भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच सोमवारी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ओयो हॉटेल्सचा मुद्दा उपस्थित करत महत्त्वाचे सवाल केले.
पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांची दुरावस्था, अजित पवारांचं थेट नितीन गडकरींना पत्र
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
"महाराष्ट्रामध्ये OYO नावाची हॉटेल्सची चेन तयार झाली आहे. शहरापासून वीस वीस किलोमीटर अंतरावर निर्जन ठिकाणी OYO हॉटेल्स दिसत आहेत. मग मनात शंका आली की ही ओयो हॉटेल्स काय आहे? ही अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे. या हॉटेल्ससाठी कोणतीही ग्रामपंचायतीची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही नगरपरिषदेची परवानगी घेतली जात नाही, महापालिकेची परवानगी घेतली जात नाही," असा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
Jobs News: राज्यात लवकरच 'मेगा भरती', 'या' विभागातली 100 टक्के पदं भरली जाणार
तसेच "या हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली भाड्याने दिली जाते, ती कशासाठी दिली जाते? हा एक पोलीस विभागाच्या विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे. OYO मध्ये २०-२० किलोमीटर जाऊन कोणताही प्रवासी राहत नाही. प्रवाशाला जाण्यायेण्याच्या खर्चापेक्षा शहरातील हॉटेलमध्ये राहणे जास्त परवडते. हे खरतर संस्कृती रक्षकाचे सरकार आहे, इथ जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर माननीय गृहराज्यमंत्र्यांनी OYO चा अभ्यास करावा आणि राज्यात असे किती हॉटेल्स आहेत याची माहिती द्यावी," असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.