Maharashtra Assembly Monsoon Session: बीड अत्याचार प्रकरणाची SIT चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

घटनेचे राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही पडसाद पाहायला मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: बीडच्या शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांकडून लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या धक्कादायक प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही पडसाद पाहायला मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे.

Marathi LIVE News: बबनराव लोणीकरांच्या विधानावरुन माफी मागावी: सभागृहात विरोधक आक्रमक

 बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांकडून लैंगिक छळ करण्यात आला होता. यावरुनच राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी आक्रमक भूमिका घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे. बीडमधील घटनाही गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षक विजय पवार, प्रशांत खटावकरला अटक झालीय. त्यांच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे, त्याची सखोल चौकशी व्हावी, असं आमदार चेतन तुपे म्हणाले. 

तसेच "कोणी तरी गब्बर राजकारणी पाठीशी म्हणून यातील आरोपी फक्त तीन दिवस पोलिस कस्टडी मागितली का ? एक मुलगी पुढे आली पण असा किती मुलींवर अत्याचार केला. यावर महिला आयपीएस अधिकारी मार्फत चौकशी करावी , एसआयटी करावी, अशी मोठी मागणीही त्यांनी केली. आमदार तुपे यांच्या या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. 

Advertisement

Maharashtra Assembly Session 2025: सभागृहात हायहोल्टेज ड्रामा! दुसऱ्याच दिवशी नाना पटोले निलंबित

बीडमध्ये घडलेल्या गंभीर घटनेचा मुद्दा उपस्थित केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे. कोचिंग क्लासतील मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. एका मुलीने आणि तिच्या आईने हिंमतीने गुन्हा नोंदवल्याने वस्तुस्थिती समोर आली. तीन दिवसांची कोठडी का मागण्यात आली याची चौकशी केली जाईल. बीड आणि राज्यात या घटनेनंतर रोष आहे. किती मुलींसोबत गैरकृत्य झालंय असा प्रश्न निर्माण होत आहे. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तयार करू आणि गुन्ह्याची चौकशी करू. कोणाचा वरदहस्त आहे का ?  याचीही चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

Advertisement