Maharashtra Assembly Monsoon Session LIVE: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. पहिल्यादिवशी कामकाज लवकर आटोपल्याने आजपासून अधिवेशनाचे नियमित कामकाज 11 वाजता सुरु होणार आहे. आज अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा होईल. जितेंद्र आव्हाड मुंब्रा येथे धावत्या लोकांमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाला तो मुद्दा उपस्थित करणार आहेत. तसेच राज्यात इतर ठिकाणी अपघात होत आहेत त्यावर बोलतील. तसेच अजय चौधरी आणि भास्कर जाधव नागपूर मधील बोगस शिक्षक भरती मुद्दा उपस्थित करतील. मावळमधील पूल दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत रोहित पवार जितेंद्र आव्हाड मांडतील. तसेच आज भारतीय जनता पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होईल.
LIVE Update: गजनी सरकार, विसरभोळा कारभार.. रोहित पवार यांची पोस्टरबाजी
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गजनी सरकार, विसरभोळा कारभार असे पोस्टर हातात घेऊन आमदार रोहित पवार विधान भवनात पोहोचले आहेत.
LIVE Updates: मुलीवरील लैंगिक छळ प्रकरण; दोन्ही आरोपींना आज पुन्हा न्यायालयात केले जाणार हजर
बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांकडून लैंगिक छळ करण्यात आला होता. यामध्ये दोन्ही आरोपी अटक करण्यात आल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी आज संपत असल्याने आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडीत रवानगी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
LIVE Updates: खडकवासला धरणातून विसर्गात मोठी वाढ, १४०० क्यूसेक्सने मुठा नदीत विसर्ग सुरू
खडकवासला धरणातून विसर्गात मोठी वाढ :
सकाळपासून १४०० क्यूसेक्सने मुठा नदीत विसर्ग सुरू
खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रात सुरू असणाऱ्या विसर्गात आज सकाळपासून मोठी वाढ करण्यात आली आहे.
सकाळी ७.०० वाजल्यापासून विसर्गाचे प्रमाण ३४० क्यूसेक्सवरून थेट १४०० क्यूसेक्स इतके वाढवण्यात आले आहे.
पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या वहावावरून विसर्गात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून, तो कमी किंवा अधिक होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ही माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता श्री. मोहन शां. भदाणे यांनी दिली आहे.
LIVE Updates: माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्यकर्त्यांची दोन खटल्यात निर्दोष मुक्तता
माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्यकर्त्यांची दोन खटल्यात निर्दोष मुक्तता
करली नदीच्या पात्रात एका अनोळखी व्यक्तीने घेतली उडी पोलीस तपास सुरू
बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मालवण पोलीस निरीक्षकांची भेट
बांदा येथे स्मशानभूमीतील कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची भीती
आमदार दीपक केसरकर यांच्या इशाऱ्यानंतर सावंतवाडीत वीज यंत्रणा अलर्ट
कळणे दोडामार्ग येथील युवकाकडून पेडणेतील विद्यार्थ्यावर ऍसिड हल्ला
राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा निर्णय रद्द बांदा शहरात मनसे ठाकरे सेनेकडून जल्लोष
LIVE Updates: ठाणे स्टेशन परिसरात मराठी तरुणाला मारहाण
ठाणे स्टेशन परिसरात मराठी तरुणाला मारहाण
परप्रांतीयांकडून ही अमानुष मारहाण
मोबाईल दुकानातील धक्कादायक प्रकार
स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ अस
LIVE Updates: पुणे सोलापूर महामार्गावर अमोनिया वाहतूक करणारा टँकर पलटला
इंदापूरच्या बाह्यवानावर सोलापूरच्या दिशेने निघालेला लिक्विड अमोनियम वाहतूक करणारा टँकरचा अपघात झालाय. पुणे सोलापूर महामार्गावरती व्यवहारे पेट्रोलियमच्या समोर हा अपघात झालाय.आज सकाळी पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे... या घटनेत टँकर मधील एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत असून त्याला उपचार कामी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. या अपघाताचं निश्चित कारण समोर आलं नाही.
Maharashtra Live Updates: विधानसभा कामकाज 11 वाजता सुरु होणार
विधानसभा कामकाज 11 वाजता होणार आहे.
महत्वाचे खालचे मुद्दे असतील
जितेंद्र आव्हाड मुंब्रा येथे धावत्या लोकांमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाला तो मुद्दा उपस्थित करणार आहेत. तसेच राज्यात इतर ठिकाणी अपघात होत आहेत त्यावर बोलतील
अजय चौधरी आणि भास्कर जाधव नागपूर मधील बोगस शिक्षक भरती मुद्दा उपस्थित करतील
मावळ मधील पूल दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत रोहित पवार जितेंद्र आव्हाड मांडतील