Monsoon Session 2025: उद्धव ठाकरे न बोलता निघाले, नीलम गोऱ्हेंनी अडवलं, 'मर्सिडीज' वादानंतर पुन्हा आमने-सामने

Uddhav Thackeray- Nilam Gorhe News: भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी बोलायचं नसेल तर येता कशाला असं म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Assembly Monsoon Session: विधानसभेपाठोपाठ आज विधानपरिषदेतही महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आले. विधानसभेत बहुमताने मंजूर झालेल्या या विधेयकाला विधान परिषदेत मात्र जोरदार विरोध पाहायला मिळाला. विशेषत: ठाकरे गटाच्या आमदारांनी याला कडाडून विरोध केला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यामध्ये शाब्दिक चमकमक झाल्याचेही पाहायला मिळाले.

Ajit Pawar News: चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा, अजित पवारांचे दिल्लीला पत्र

विधासभेने गुरुवारी जनसुरक्षा विधेयकावर मंजुरी मिळवल्यावर उमटवल्यानंतर आज शुक्रवारी विधान परिषदेत विधेयकावर चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक विधेयकावर बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही सभागृहात उपस्थिती होती. आमदार अनिल परब यांचे भाषण संपल्यानंतर काही वेळानंतर उद्धव ठाकरे सभागृहाच्या बाहेर पडत असताना नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्यात संवाद झाला.

परिषदेतून बाहेर पडताना नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना जनसुरक्षा विधेयकावर तुम्ही बोलणार नाहीत का? असं विचारलं. मला वाटले तुम्ही बोलणार असाल, असेही त्या म्हणाल्या. त्यावर बोलून काय उपयोग? असे म्हणत उद्धव ठाकरे परिषदेच्या बाहेर पडले. मात्र त्यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी बोलायचं नसेल तर येता कशाला असं म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं.

विधानपरिषदेत हे विधेयक मांडल्यानंतर जोरदार राडा झाल्याचेही पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते आंबदास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात शाब्दिक बाचबाची झाली, ज्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. त्या गोंधळात हे विधेयक मंजूर करण्यात आले. दरम्यान, या विधेयकाला राजकीय वास असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनीही त्याला विरोध दर्शवला. 

Advertisement

Sanjay Shirsat: 'ते घरं माझं, बॅग माझी आणि पैसे....' Viral Video वर संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण

काल आणि आज विधी मंडळात जनसुरक्षा कायदा आणला. सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे त्याचा दुरूपयोग करत आहे. या विधेयकात दहशतवादाचा विरोध असेल तर आम्ही सरकारसोबत राहू, पण यात कुठेही नक्षलवाद हा शब्द नाही त्यामुळे त्याला राजकीय वास येत आहे.. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. नक्षलवाद संपला असं म्हणता मगं हे विधेयक कशासाठी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.