जाहिरात

SSC Result: दहावीचा निकाल 92.09 टक्के! यंदाही मुलींची बाजी; कोणता विभाग अव्वल? वाचा ठळक वैशिष्ट्ये

कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सर्वात कमी निकाल हा छत्रपती संभाजीनगरचा लागला आहे.  या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींना बाजी  मारली असून ८४. ९६ इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

SSC Result: दहावीचा निकाल 92.09 टक्के! यंदाही मुलींची बाजी; कोणता विभाग अव्वल? वाचा ठळक वैशिष्ट्ये

Maharashtra SSC Board Exam Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली. यंदा दहावीचा निकाल ९२. ९ इतका लागला आहे. यामध्ये कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सर्वात कमी निकाल हा छत्रपती संभाजीनगरचा लागला आहे.  या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींना बाजी  मारली असून ८४. ९६ इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

SSC Result 2026: आज दहावीचा निकाल! कुठे अन् कसा पहाल तुमचा रिझल्ट? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून १५,५५,०२६  नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.  नियमित विद्यार्थ्यांपैकी १४,३०,४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९२.०९ टक्के इतका लागला. तसेच खाजगी विद्यार्थ्यांची एकूण नोंदणी २९,५०६ इतकी होती, यापैकी २२,००३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल ७६.३३ टक्के इतका लागला आहे. एकूण १४,५२,१४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

  या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९४.१६ टक्के इतका लागला आहे. तर  मुलांचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.६० टक्क्यांनी अधिक आहे.  यंदा. १०,०३१  दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ९,०४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेत एकूण ४०२ कॉपी प्रकरणे आढळली असून  सर्वाधिक ८२ कॉपीची प्रकरणे नाशिक विभागात आढळली आहेत.

राज्याचा विभाग निहाय निकाल 

  • कोकण विभागाचा निकाल ९७.६१ टक्के
  • पुणे विभागाचा निकाल ९४.१४ टक्के
  • कोल्हापूर विभागाचा निकाल ९४.४७ टक्के
  • मुंबई विभागाचा निकाल ९४.९७ टक्के
  •  नागपूर विभागाचा निकाल ९०.७७ टक्के
  • अमरावती विभागाचा निकाल ९०.५० टक्के
  • नाशिक विभागाचा निकाल ९०.५३ टक्के
  • लातूर विभागाचा निकाल ८८.४२ टक्के
  • छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.४१ टक्के

Mumbai News: मुंबईत BMC अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप; आझाद मैदान पोलीस ठाण्यात FIR दाखल 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com