HSC Result 2026 Live Update: राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची धाकधूक आता संपली असून, महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता प्रसिद्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे. त्याआधी सकाळी ११ वाजता पुणे कार्यालयातून महाराष्ट्र शैक्षणिक बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. यात बारावीच्या निकालाची माहिती देण्यात येणार आहे. तुमचा निकाल मोबाईलवर कसा पाहायचा, मार्कशीट कशी डाऊनलोड करायची? जाणून घ्या...
Maharashtra HSC 12th Result LIVE Updates: बारावीचा निकाल जाहीर! अमरावती विभाग राज्यात तिसऱ्यास्थानी
* इयत्ता १२ चा निकाल जाहीर; अमरावती विभाग राज्यात तिसऱ्यास्थानी....
* ९०.९२ टक्के लागला निकाल...
* अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा प्रथम स्थानावर तर वाशिमचा दुसरा क्रमांकावर...
* साक्षरतेचे प्रमाण जास्त समजला जाणारा अमरावती जिल्हा मात्र पिछाडीवर.
* तर गत वर्षीच्या तुलनेत एका टाक्याने निकालात घट, कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम...
ग्राफिक्स...
अमरावती विभागाचा असा आहे निकाल..
बुलडाणा जिल्हा ९५.२२
वाशिम : ९१.१५
अकोला : ९०.१४
यवतमाळ : ८९.६०
अमरावती : ८८.२६
एकूण निकाल : ९०.९२
HSC Result LIVE Updates: बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये
इयत्ता बारावी निकालाची ठळक वैशिष्ट्ये
१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर क कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय. टी. आय. या शाखांसाठी एकूण १४,४४,७१३ नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३३,०५८ विदयार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतची टक्केवारी ८९.७९ आहे.
२. खाजगी विदयार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३७,५५९ एवढी असून त्यापैकी ३६,९४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतची टक्केवारी ८०.२१ आहे.
३. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ५०,८७६ पुनर्परिक्षार्थी विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५०,३४६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १८,३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३६.४४ आहे.
४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ८,४४६ दिव्यांग विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,३६७ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.५८ आहे.
५. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याबाचत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९४.१४ %) सर्वाधिक असून सर्वांत कमी निकाल लातूर विभागाचा (८४.१४%) आहे.
७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.८०% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ६.३५% ने जास्त आहे.
८. एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १००% आहे.
HSC Board Result LIVE Updates: बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी
बारावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर: ८९. ७८ टक्के निकाल
कोकण विभाग ९४.१४
सर्वात कमी: लातूर विभाग
मुलींनी मारली बाजी: 93.15 टक्के निकाल
६. ३५ टक्के मुली या मुलांपेक्षा जास्त उत्तीर्ण झाल्या आहेत.
HSC Result LIVE Updates: उमंग ॲपवर निकाल कसा तपासावा
- उमंग ॲप डाउनलोड करा.
- तुमच्या मोबाईल नंबरने नोंदणी करा.
- ॲपमध्ये 'महाराष्ट्र बोर्ड सर्व्हिसेस' शोधा.
- 'एचएससी निकाल २०२६' हा पर्याय निवडा
- तुमचा निकाल पाहण्यासाठी तुमचा तपशील सादर करा.
- तुमची गुणपत्रिका डाउनलोड करा.
Maharashtra HSC Result LIVE Updates: डिजी लॉकरवरून तुमचे मार्कलीस्ट कसे मिळवाल?
डिजी लॉकरवरून तुमची गुणपत्रिका डाउनलोड करण्याची प्रक्रिया
१. डिजीलॉकर ॲप डाउनलोड करा किंवा digilocker.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
२. तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा.
३. डॅशबोर्डवरील 'शिक्षण आणि अध्ययन' (Education and Learning) विभागात जा आणि वरच्या सर्च बारमध्ये 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे' (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune) शोधा.
४. 'इयत्ता १२ वी गुणपत्रिका' (Class XII Marksheet) निवडा.
५. तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा.
६. सबमिट (Submit) बटणावर क्लिक करा.
HSC Result LIVE Updates: 15 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य ठरणार! थोड्याच वेळात बारावीचा निकाल
यावर्षी बोर्ड परीक्षेसाठी एकूण १५,३२,४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी ७,९९,७७३ विद्यार्थी विज्ञान शाखेत, ३,८०,६९२ विद्यार्थी कला शाखेत आणि ३,२०,१५२ विद्यार्थी वाणिज्य शाखेत परीक्षेला बसले. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक दोन्हीमध्ये किमान ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी हे गुण मिळवण्यात अयशस्वी ठरतील, त्यांना पुरवणी परीक्षा द्यावी लागेल.
HSC Result LIVE Updates: विद्यार्थ्यांना मार्कशीट कुठे मिळेल?
आज बारावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. मात्र प्रत्यक्षात मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या १२वीच्या मूळ गुणपत्रिका फक्त शाळेतूनच मिळू शकतील. निकाल जाहीर झाल्यानंतर काही आठवड्यांनी विद्यार्थ्यांना त्या शाळेतून घेता येतील.
HSC Result LIVE Updates: आज बारावीचा निकाल! पाच वर्षांच्या निकालाची टक्केवारी काय सांगते?
गेल्या पाच वर्षांतील निकालाची टक्केवारी
वर्ष २०२५: ९१.८८ टक्के
वर्ष २०२४: ९३.३७ टक्के
वर्ष २०२३: ९१.२५ टक्के
वर्ष २०२२: ९४.२२ टक्के
वर्ष २०२१: ९९.६३ टक्के
वर्ष २०२०: ९०.६६ टक्के
HSC Result LIVE Updates: बारावीचा निकाल लागणार! थोड्याच वेळात पत्रकार परिषद
बारावीच्या निकालाआधी शिक्षण बोर्ड सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या पत्रकार परिषदेद्वारे एचएससी निकाल जाहीर करेल. परिषदेदरम्यान निकालासंबंधी महत्त्वाची माहिती दिली जाईल. एका तासानंतर निकाल वेबसाइटवर अपलोड केला जाईल.
HSC Result LIVE Updates:निकाल कसा पाहाल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
निकाल कसा पाहाल?
तुमचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवरील 'HSC Examination Result 2026' या लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
'सबमिट' बटणावर क्लिक करा आणि तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या गुणपत्रिकेची प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट नक्की घ्या