आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे, दरम्यान बोर्डाने पत्रकार परिषद घेत महत्त्वाची घोषणा केली आहे. यंदा बारावीचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. यंदा देखील बारावीच्या निकालातून मुलींनी बाजी मारली आहे. यंदा मुलींचा निकाल 94.98% आणि 89.51% मुलांचा निकाल लागला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 91.88 आहे.
यंदा २०२५ च्या बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळातून एकूण 14 लाख 27 हजार 85 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13 लाख 2873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.74%, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 89.46% इतका लागला आहे. एकूण 154 विषयांपैकी 37 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
नक्की वाचा - Rahul Gandhi News : राहुल गांधी भारतीय आहेत की ब्रिटीश? आज होणार फैसला
यंदा निकालाचा टक्का घसरला
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाचा टक्का घसरला आहे. फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37% होता. तर फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के इतका लागला आहे. त्यामुळे यंदाचा निकालाचा टक्का 1.49 ने कमी झाला आहे.
मार्च-एप्रिल 2022 - 94.22
फेब्रुवारी-मार्च 2023 - 91.25
फेब्रुवारी-मार्च 2024 - 93.37
फेब्रुवारी-मार्च 2025 - 91.88
नऊ विभागीय मंडळ
पुणे 91.32
नागपूर 90.52
छत्रपती संभाजीनगर 92.24
मुंबई 92.93
कोल्हापूर 93.64
अमरावती 91.43
नाशिक 91.31
लातूर 89.46
कोकण 96.74
कोकण विभाग सर्वात अधिक, तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल
बारावी परीक्षेत राज्यात मुलींची बाजी
सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण तिची टक्केवारी 94. 58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 आहे म्हणजे मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी जास्त आहे.