Maharashtra Budget 2025: बळीराजा ते लाडकी बहीण.. बजेटमधून कुणाला काय मिळालं? वाचा 10 मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2025 10 Key Points: शेतकरी, युवावर्ग, लाडक्या बहिणींसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्यात. जाणून घ्या अजित पवार यांनी तब्बल 1 तास 9 मिनिटे सादर केलेल्या महाबजेटमधील 10 सर्वात महत्त्वाच्या घोषणा...

जाहिरात
Read Time: 3 mins

Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र राज्याचा साल 2025-26 साठीचा अर्थसंकल्प आज सादर झाला. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती सरकार राज्यातील जनतेला बजेटमधून काय- काय देणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या बजेटमधून शेतकरी, युवावर्ग, लाडक्या बहिणींसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्यात. जाणून घ्या अजित पवार यांनी तब्बल 1 तास 9 मिनिटे सादर केलेल्या महाबजेटमधील 10 सर्वात महत्त्वाच्या घोषणा...

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1. मुंबईमध्ये सात आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्रे निर्माण करण्याची सर्वात मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. नवी मुंबईसह, वडाळा, खारघरमध्ये बीकेसीप्रमाणेच व्यापारी केंद्रे उभारली जातील. त्यामुळे मुंंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून विकसीत होईल. कुर्ला, नवी मुंबई, वांद्रे-कुर्ला संकुल,  खारघर व विरार - बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत.

2. मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांसाठी एकूण143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित-सुमारे 10 लाख प्रवाशांचा रोज प्रवास, येत्या वर्षात मुंबईमध्ये41.2  किलोमीटर, पुण्यामध्ये 23.2  किलोमीटर असे एकूण 64.4  किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार, येत्या 5 वर्षांत एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार 

3. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर 
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार 

Advertisement

4. 'सर्वांसाठी घरे' हे उद्दीष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२ 20 लाख घरकुलांना मान्यता अंतर्गत घरकुल बांधणीच्या अनुदानात राज्य शासनाकडून 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार

नक्की वाचा - Budget 2025: सागरी दळणवळणात महाराष्ट्र 'महाशक्ती' ठरणार; अर्थसंकल्पात अजित पवारांच्या मोठ्या घोषणा

5. आग्रा  येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक तसेच कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार 

6. नवी मुंबईतील उलवे येथे 1 हजार 150 हेक्टर क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 85 टक्के काम पूर्ण एप्रिल, 2015 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करणार 

Advertisement

7. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धीमतेचे धोरण राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करण्यासाठी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी तसेच शेतीमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी एआयचा वापर  होईल.

8. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2 लाख 13 हजार 625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Advertisement

9. महाराष्ट्र महामंडळाच्या 6 हजार डिझेल बसचे रुपांतर सीएनजी आणि एलएनजी बसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

10. सन 2025-26 मध्ये लाडकी बहीण योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.

Maharashtra Budget 2025 : 'पुन्हा आलो...पुन्हा आलो...'; अजित पवारांच्या कवितांनी गाजला अर्थसंकल्प