
Maharashtra Budget 2025 : महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार सादर करीत आहेत. यावेळी अर्थमंत्री काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान सागरी वाहतूक वाढविण्यासाठी अधिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून यंदा 2025 च्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये महायुतीला बहुमताचा कौल दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानतो. मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला. त्यांचा सन्मान राखण्याचं काम महायुतीकडून निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही अशी घोषणा त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करत आहे. या प्रकल्पाचा खर्च 76,220 कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग 26 टक्के आहे. जेएनपीटीच्या क्षमतेपेक्षा तिप्पट क्षमता वाढवण बंदरामुळे होणार आहे. 300 दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता वाढवण बंदरामुळे होईल. 2030 पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक होणं सुरू होणं अपेक्षित आहे. या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या 10 बंदरात होणार आहे. वाढवण बंदराजवळ मुंबईतील तिसरे विमानतळ प्रस्तावित असून, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही बंदराजवळ असणार आहे. हे बंदर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग इथे शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण आणि व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत 158 कोटींच्या कामांना मान्यता दिली आहे.
महत्त्वाच्या घोषणा...
वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार
मुंबईतील तिसरं विमानतळ वाढवण बंदराजवळ असेल
गेट-वे ते मांडवादरम्यान अत्याधुनिक बोटी
रेडिओ क्लब येथे इथं नवी जेट्टी सुरू करणार
देवबागमध्ये सागरी सुरक्षा
दिघी, वेंगुर्ला, काल्हेर, डोंबिवली, कोलशेत येथील जेट्टींची कामे प्रगतीपथावर
काशिदमध्ये तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरू करणार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world