मुंबई: दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा नवा ट्वीस्ट आला असून तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेत या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे. या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावरुनच सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात राडा घातला. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर झालेल्या गंभीर आरोपांनंतर ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावरुनच अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. सत्ताधारी जयकुमार गोरे, किरीट सोमय्यांच्या विषयावर का बोलत नाहीत. जयकुमार गोरेंचा राजीनामा घ्या अशी मागणी करत अनिल परब यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरुन चित्रा वाघ यांना डिवचले.
यावरुनच चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला. 'संजय राठोड मंत्रिमंडळामध्ये का आहेत हे हे उद्धव ठाकरेंना विचारा. हिंमत असेल तर संजय राठोड यांना क्लिनचिट का दिली ते विचारा..' अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर तोफ डागली. मी अनिल परब यांना उत्तर देत आहे. तुम्ही असाल पोपट पंडित. माझ्या कुटुंबाने दोन वर्ष जे सहन केलं ते पाहायला तुम्ही नव्हता. तुमच्यासारखे ५६ परब पायाला बांधून फिरते. आम्ही वशिल्याने इथे आलेलो नाही," अशा शब्दात चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला.
(नक्की वाचा - Vasai News : गॅस हुंगून तरुणाची आत्महत्या, दारावर धोक्याच्या सूचना; वसईतील हादरवणारा प्रकार)
"राठोड प्रकरणात मी स्टॅन्ड कायम घेतला कोर्टात लढली. मी कायम आहे माझ्या भूमिकांवर, तीन वर्ष लढले. त्यांचे चेल्लेचपाटे त्रास देत राहिले त्यांच्या सरदार क्लिनचिट केले. काही राहिल नाही ते माझ्या घरावर बोलू लागले, माझ्या नवऱ्याविषयी बोलू लागले. दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांनी केस टाकली. याचा एसआयटी रिपोर्ट समोर यावा. जनेतला कळावे नेमके काय झाले? मला संजय राठोड यावर विचारले जाते. महिलांवर दादागिरी का करता? हिंमत असेल तर परब जा उद्धव ठाकरे याला विचारावे.." असेही चित्रा वाघ म्हणाल्या.