8 days ago

आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यामुळे आज त्याच्याविरोधात काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Mar 26, 2025 22:40 (IST)

नागपूरच्या कळमना नाका परिसरातील एका गोडाऊनला आग

नागपूरच्या कळमना  परिसरातल्या नाका नंबर चार परिसरातील एका गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. स्क्रॅप आणि भंगार सामानाच्या गोडाऊनला आग. फायर ब्रिगेडच्या तीन गाड्यांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न.

Mar 26, 2025 21:53 (IST)

प्रचंड वादवादळी वाऱ्यासह सांगलीत अवकाळी पाऊस

प्रचंड वादवादळी वाऱ्यासह सांगलीत अवकाळी पाऊस पडत आहे.  विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली आहे.  त्यामुळे विद्युत पुरवठा ही खंडीत झाला आहे. 

Mar 26, 2025 21:40 (IST)

Sangli Accident: सांगलीत भीषण अपघात, 3 जण ठार

सांगलीच्या आष्टा येथे दुचाकी आणि डंपर मध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन मुलांसह वडिलांचा मृत्यू झाला आहे,तर आई गंभीर जखमी झाली आहे. इस्लामपूर-आष्टा रोडवर हा भीषण अपघात झाला आहे, अश्फाक पटेल ,वय 39 ,अशरफ पटेल, वय 12 आणि असद पटेल वय 10,अश्या ठार झालेल्या बाप लेकांची नावे आहेत.अश्फाक पटेल हे आपल्या पत्नी व दोन्ही मुलांसह दुचाकीवरून आष्टयाहुन इस्लामपूरच्या दिशेने निघाले असता,शिंदे मळा या ठिकाणी समोरून आलेल्या भरधाव डंपरची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली.ज्यामध्ये अश्फाक पटेल व त्यांची दोन लहान मुलं जागेच ठार झाली.तर पत्नी हसीना पटेल या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

Mar 26, 2025 21:38 (IST)

Kolhapur News: शालेय पोषण आहारातून मुलींना विषबाधा

कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील एका गावात शाळेतील पोषण आहार खाल्ल्यानंतर शाळकरी मुलींना अचानक उलटी आणि जुलाब सुरु झाल्याचा प्रकार समोर आलाय. माळवाडी येथील विद्यामंदिर माळवाडी या प्राथमिक शाळेत ही घटना घडली आहे. सातवी व सहावी मध्ये शिकणाऱ्या मुलींनी आज सकाळी शालेय पोषण आहार खाल्ला आणि त्यानंतर मुलींना अचानक जुलाब व उलट्या सुरू झाल्या. सहा मुलींना कोतोली येथील प्राथमिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement
Mar 26, 2025 21:37 (IST)

Panvel News: पनवेल येथे बांधकाम साईट घेण्यावरून फायरिंग . एकाचा मृत्यू

पनवेल तालुक्यातील नानोशी गावातील आदिवासी पाड्यात बांधकाम साईटवर गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात बाबू वाघमारे (वय 40 )  यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पनवेल शहर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या चार पथकांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात, बांधकाम साईटच्या कंत्राट घेण्याच्या वरून वाद झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे.

Mar 26, 2025 20:22 (IST)

LIVE Update: गौरव आहुजाला जामीन मंजूर

पुण्यामध्ये भरचौकात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला अखेर जामीन मंजूर झाला आहे. याआधी त्याच्यासोबत असलेल्या मित्राला जामीन मंजूर झाला होता. आता गौरव आहुजालाही जामीन मिळाला आहे. 

Advertisement
Mar 26, 2025 20:13 (IST)

LIVE Update: दिशा सालियनचा सविस्तर पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आला समोर

दिशाच्या मृत्यूचे कारण डोक्याला गंभीर इजा तसेच शरीरावरही जखमा असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद.

दिशाच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव झालेला होता असेही रिपोर्टमध्ये नमूद.

दिशाच्या शरीरावर म्हणजेच हाताला , पायाला आणि छातीजवळ जखमा असल्याचे नमूद.

पोस्ट मॉर्टम ११ तारखेला संध्याकाळी ४ वाजता करण्यात आले होते अशी वेळ नमूद..

दिशाच्या मृत्यूचे कारण हे डोक्याला गंभीर इजा तसेच शरीरावर असंख्य जखमा होत्या त्यामुळेच झाला असल्याचे नमूद.

Mar 26, 2025 20:12 (IST)

LIVE Update: उद्या शरद पवारांची पत्रकार परिषद

शरद पवार यांची पत्रकार परिषद

उद्या संध्याकाळी साडेचार वाजता दिल्लीत होणार पत्रकार परिषद

उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बैठक दिल्लीत होणार आहे.

या बैठकीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद होईल 

सुप्रिया सुळे पण उपस्थित असतील. 

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सुप्रिया सुळे आणि रोहीत पवार यांचे नाव घेतले होते. त्यानंतर शरद पवार यांची पहिलीच पत्रकार परिषद

Advertisement
Mar 26, 2025 18:56 (IST)

LIVE Updates: राहुरीमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना, शिवप्रेमी आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना..

 अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी शहरातील घटना...

 शिवप्रेमी आक्रमक रास्ता रोको आंदोलन....

 राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळा रंग लावून विटंबना केली....

 घटनेमुळे राहुरी शहरांमध्ये तणावाचे वातावरण.....

 घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे....

 अज्ञात आरोपीचा शोध राहुरी पोलीस घेत आहे....

 अहिल्यानगर- मनमाड महामार्ग आडवत रास्ता रोको आंदोलन....

Mar 26, 2025 16:17 (IST)

Washim News: दत्तात्रय भरणे वाशिमचे नवे पालकमंत्री

इंदापूरचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आलीय. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती करण्यात येत असल्याच परिपत्रक आज बुधवारी काढण्यात आले आहे.

Mar 26, 2025 16:15 (IST)

Pune News: संतापजनक! पुण्यात दोन अल्पवयीन सावत्र बहिणींवर लैंगिक अत्याचार

पुण्यात दोन अल्पवयीन सावत्र बहिणींवर लैंगिक अत्याचार 

पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना 

जवळच्या नातेवाईकांकडूनच  सावत्र बहिणींवर दोन दिवस अत्याचार 

घरात डांबून ठेवत  २ अल्पवयीन आरोपींकडून करण्यात आला लैंगिक अत्याचार 

२ अल्पवयीन आरोपींवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल 

दोन्ही विधी संघर्षित बालकांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात 

घरी बोलवत आणि फुस लावत नातेवाईक असलेल्या २ अल्पवयीन मुलांकडून दोन दिवस लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती

Mar 26, 2025 16:15 (IST)

Kunal Kamra News: कुणाल कामराला मुंबई पोलिसांचे दुसरे समन्स

कुणाल कामरा ला मुंबई पोलिसांचा धक्का..

 मुंबई पोलिसांनी कामरा यांचे अपील फेटाळून लावले

 -खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावले होते, ज्यावर कुणाल कामराने एका आठवड्याचा वेळ मागितला आहे.

 -कुणाल कामरा याच्या वकिलाने खार पोलीस स्टेशन गाठले आणि कुणालच्या जबाबाची हार्ड कॉपी आणि खार पोलिसांना देत आठवडाभराची मुदत मागितली.

 -खार पोलिसांनी कुणाल कामरा याने आठवडाभराची मुदत मागितली होती पण ती फेटाळली..

 -आज खार पोलीस कुणाल कामराला बीएनएस कलम 35 अंतर्गत दुसरे समन्स बजावणार आहेत.

Mar 26, 2025 16:14 (IST)

Pune News: पुण्यातील ससून रुग्णालयातून आरोपीचं पलायन

पुण्यातील ससून रुग्णालयातून आरोपीचं पलायन 

ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेला आरोपी पळाला 

कराड पोलिस ठाण्यात हद्दीतील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला 

छातीत दुखत असल्याने आरोपीला काल ससून रुग्णालयात करण्यात आलं होत दाखल 

संतोष साठे असं पळून गेलेल्या आरोपीच नाव 

विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला करण्यात आली होती अटक

Mar 26, 2025 14:10 (IST)

Live Update : ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांचा अजित पवार गटात थोड्याच वेळात प्रवेश

महाडच्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात थोड्याच वेळात प्रवेश

अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल.

Mar 26, 2025 11:13 (IST)

Live Update : अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड

अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड

Mar 26, 2025 11:09 (IST)

Live Update : आज खार पोलिसांकडून कुणाल कामराला दुसरं समन्स जारी

आज खार पोलिसांकडून कुणाल कामराला दुसरं समन्स जारी

कुणाल कामराने एक आठवड्यांची मुदत मागितली होती, मात्र पोलिसांनी ती मागणी फेटाळली...

कामराने पोलिसांसमोर येऊन आपली बाजू मांडावी अशी पोलिसांची भूमिका

Mar 26, 2025 09:59 (IST)

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा असणार आहे, विशेष म्हणजे यावेळी मोदी RSS मुख्यालयात जाणार आहेत, तर अमित शाह हे 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनाही अभिवादन करणार आहेत..

Mar 26, 2025 09:54 (IST)

Live Update : आज धनंजय देशमुख विशेष वकील उज्वल निकम यांची भेट घेणार

आज बीडच्या मकोका न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी होणार आहे. दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर पहिल्या वेळेसच सुनावणी बीडला होत आहे. याआधी केज येथील जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत ही एक सुनावणी झाली होती. आजच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे हजर राहणार आहेत.

Mar 26, 2025 08:39 (IST)

Live Update : पुरंदर विमानतळासाठी संपादित होणाऱ्या जमिनीचा होणार ड्रोन सर्व्हे

पुरंदर मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून ड्रोन द्वारे सर्वे करण्यात येणार आहे. मोजणीपूर्वी हा सर्वे केला जाणार असून त्यामुळे नेमक्या बागायत आणि जिरायत जमिनीचे क्षेत्र समजणार आहे. त्याचं प्रमाण किती आहे हे देखील समजेल. तर एकूण झाडे इमारती याची माहिती मिळेल. विहिरी किंवा इतर माहिती या सर्वेतून मिळणार असल्याने विमानतळासाठी संपादित होणाऱ्या जमिनीचा दर निश्चित करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. 

Mar 26, 2025 08:04 (IST)

Live Update : रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कंत्राटदारांना 31 मेची अंतिम मुदत

सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटदारांना ३१ मे ची अंतिम मुदत दिली आहे. तोपर्यंत येत्या 70 दिवसात ही कामे पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, रस्तानिहाय काम पूर्ण करण्याची तारीख निश्चित करा असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाला दिले आहेत. 

तसेच रस्तेकामे सुरू असताना वरिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी सरप्राईज व्हिजिट द्यावी, अधिक गती आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करावे, काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांवर खोदकामास पूर्णपणे बंदी घालावी, असे निर्देशदेखील गगराणी यांनी दिले आहेत

Mar 26, 2025 08:03 (IST)

Live Update : कुणाल कामरा पोलिसांच्या चौकशीला हजर नाही, दुसऱ्यांदा समन्स बजावणार

कुणाल कामराला पोलिसांनी चौकशीला हजार राहण्यासंदर्भात एक नोटीस दिली होती 

मात्र कुणाला कामरा चौकशीला हजर झाला नाही 

आज पुन्हा त्याला खार पोलीस दुसऱ्यांदा समन्स बजावणार असल्याची प्राथमिक माहिती

खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सकाळी 10 वाजल्यानंतर नोटीस देण्याची शक्यता