गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या जोर- बैठकांचा सिलसिला संपवून आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सकाळपासून राज्यभरातील नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन येत आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भावी मंत्र्यांची यादी आता समोर आली आहे.
खाते वाटप अन् इच्छुंकांच्या गर्दीमुळे रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला आहे. आज सायंकाळी चार वाजता नागपूरमध्ये राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याआधी आज सकाळपासूनच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिपदासाठी नाव फायनल झालेल्या नेत्यांना फोन करायला सुरुवात झाली आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपच्या मंत्र्यांची यादी!
- गिरीश महाजन
- चंद्रशेखर बावनकुळे
- नितेश राणे
- शिवेंद्रराजे भोसले
- जयकुमार रावल
- मंगलप्रभात लोढा
- पंकजा मुंडे
- चंद्रकांत पाटील
- राधाकृष्ण विखे पाटील
- पंकज भोयार
- मेघना बोर्डीकर
- संजय सावकारे
- अतुल सावे
- जयकुमार गोरे
- माधुरी मिसाळ
- अशोक ऊईके
- आकाश फुंडकर
- आशिष शेलार
शिंदेगटाच्या मंत्र्यांची यादी:
- उदय सामंत
- शंभूराज देसाई
- गुलाबराव पाटील
- प्रकाश आबीटकर
- आशिष जैस्वाल
- संजय शिरसाट
- संजय राठोड
- भरत गोगावले
- दादा भुसे
- प्रताप सरनाईक
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी
- आदिती तटकरे
- बाबासाहेब पाटील
- दत्तमामा भरणे
- हसन मुश्रीफ
- नरहरी झिरवाळ
दरम्यान, आज होणारा शपथविधी सोहळा तसेच उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी राज्यभरातील नेते नागपूरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर्स झळकले असून मोठी मिरवणूक काढली जाणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीला हार्ट अटॅक! शाळेत खेळता खेळता मृत्यू; कुठे घडली घटना?