एकनाथ शिंदेंचे 'पॉवरफुल' शिलेदार; शंभूराज देसाईंचा झंझावाती राजकीय प्रवास

सातारा जिल्ह्यातील राजकारणात दबदबा असणाऱ्या शंभुराज देसाई हे कट्टर शिवसैनिक आणि एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जातात. वाचा त्यांचा राजकीय प्रवास

जाहिरात
Read Time: 2 mins

 Shambhuraj Desai Political Profile: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला आहे. आज नागपूरमध्ये महायुतीचे जवळपास 40 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असून भावी मंत्र्यांची नावेही समोर आली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा शंभूराज देसाई यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. सातारा जिल्ह्यातील राजकारणात दबदबा असणाऱ्या शंभुराज देसाई हे कट्टर शिवसैनिक आणि एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जातात.जाणून घ्या. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी कारखान्याचे चेअरमनपद भुषवणाऱ्या शंभूराजे देसाईंचा राजकीय प्रवास.

सातारच्या पाटण तालुक्यातील नेते असलेल्या शंभुराज देसाई यांचा  17 नोव्हेंबर 1966 रोजी मुंबईत जन्म झाला.  त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई हे राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री होते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी अनेक मोठी पदे भूषवत सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केले. त्यांच्या निधनानंतर  आजोबांच्या राजकारणाचा वारसा शंभुराज देसाईंकडे आला.त्याआधी वडील शिवाजीराव देसाई यांच्या निधनानंतर शंभूराज देसाई हे वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन झाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्यानंतर शंभूराज देसाई यांचा राजकीय आलेख नेहमीच उंचावत गेला. पाटण तालुक्यात व सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे संघटनात्मक कार्य करत असतानाच 1995-99 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या काळात सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1992-1997मध्ये पंचायत समिती पाटणचे ते सदस्य होते. 1992-2002मध्ये जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले.

पाटण तालुक्यामध्ये शिवसेनेचे संघटनात्मक काम करत असतानाच शंभूराज देसाई हे 1995-99 मध्ये सेना- भाजप युतीच्या काळात सहकार परिषदेचे अध्यक्ष झाले. त्याआधी 1992- 1997 मध्ये ते पाटण पंचायत समिती सदस्य होते. 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली ज्यामध्ये त्यांचा दणदणीत विजय झाला.तेव्हापासून ते पाटण विधानसभेचे आमदार आहेत. 2014 आणि 2019 मध्येही पाटण विधानसभेतून ते भरघोस मतांनी निवडूण आले. त्याआधी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांनी उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही पटकावला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - सरपंच ते एकनाथ शिंदेंचे विश्वासू! कसा राहिलाय भरत गोगावलेंचा प्रवास?

 महाविकास आघाडीचे सरकार असताना शंभुराज देसाई यांनी गृहराज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटात मोठे बंड झाले. एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार बाहेर पडले. राज्यातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदेंना साथ देण्यात शंभूराज देसाई यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे महसूल मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर आता पुन्हा एकदा शंभूराज देसाई यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे.