जाहिरात

MPSC Prelims 2025: तयारीला लागा! MPSC पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; 385 जागा भरल्या जाणार

MPSC Prelims 2025: बहुप्रतिक्षित पाऊल उचलत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर राज्य सेवा पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 

MPSC Prelims 2025: तयारीला लागा! MPSC पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; 385 जागा भरल्या जाणार

पुणे: निम्मा मार्च महिना संपल्यानंतरही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध न केल्याने स्पर्धक आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. या विद्यार्थ्यांसाठी आता सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बहुप्रतिक्षित पाऊल उचलत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर राज्य सेवा पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 

अखेर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धकांची प्रतिक्षा संपली असून  'महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025' या परीक्षेचे परिपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेले आहे. या परीक्षेत विविध विभागाअंतर्गत एकूण 385 रिक्त पदे भरली जातील, ज्यामध्ये राज्य सेवेसाठी 127, महाराष्ट्र वन सेवेसाठी 144 आणि बांधकाम विभागात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवांसाठी ११४ पदे समाविष्ट आहेत.  

महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त प्राथमिक परीक्षा 2025 ची जाहिरात MPSC ने प्रकाशित केली होती, ज्यामध्ये ही परीक्षा रविवार, 28 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्ह्यांमध्ये घेतली जाईल याची पुष्टी करण्यात आली होती. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 28 मार्च 2025 ते 17 एप्रिल 2025 पर्यंत सुरू राहील आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख 17 एप्रिल 2025 असेल. उमेदवार 21 एप्रिल 2025 पर्यंत बँक चलनद्वारे शुल्क भरू शकतात.

दरम्यान,  सामान्य प्रशासन विभागाकडून 127 पदांसाठी आवश्यक रिक्त जागा विनंती प्राप्त होऊनही एमपीएससीने जाहिरात प्रकाशित करण्यात अयशस्वी झाल्यामुळे विद्यार्थी अनिश्चिततेत सापडले होते. या विलंबामुळे उमेदवारांमध्ये निराशा निर्माण झाली होती. त्यानंतर आज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात स्वतंत्रपणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: