3 days ago

राज्यात कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असून काल 1 जून रोजी दिवसभरात 65 नवे रुग्ण आढळले. मुंबईत कोरोनाचे 22 नवे रुग्ण, तर महाराष्ट्रात 506 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रविवारी सकाळपर्यंत देशात 3753 सक्रीय रुग्ण होते. त्यातील बहुतांश केरळमधील आहेत. केरळमध्ये 1336 सक्रीय रुग्ण आहेत. 

Jun 02, 2025 22:00 (IST)

अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवरून कर्नाटक-महाराष्ट्र संघर्ष उफाळला

अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवरून कर्नाटक-महाराष्ट्र संघर्ष उफाळला आहे.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा नदीवर कर्नाटकमध्ये उभारण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास हरकत घेतली आहे.  कृष्णा जलविवाद न्यायाधिकरणाच्या 2010 मधील निर्णयानुसार कर्नाटकला अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524  मीटरपर्यंत वाढवण्याची परवानगी मिळाली आहे.  9 मे रोजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून याला आक्षेप घेतला आहे.  धरणाची उंची वाढल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होईल. त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा तपासावा, असं फडणवीसांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. 

Jun 02, 2025 20:49 (IST)

सावंतवाडी दिवा एक्सप्रेसच्या वेळेत बदल

सावंतवाडी रोड-दिवा एक्सप्रेसच्या थांबण्याच्या वेळेत आणि रोहा स्टेशनवर तिरुवनंतपुरम उत्तर-भावनगर एक्सप्रेसच्या थांबण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार  गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी रोड-दिवा एक्सप्रेस 2 जून पासून दिवा स्टेशनवर 19.29 वाजता ऐवजी 19.00 वाजता पोहोचेल. गाडी 19.01 वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक 19259 तिरुवनंतपुरम उत्तर-भावनगर एक्सप्रेस 5 जून पासून रोहा स्टेशनवर पूर्वीच्या 20.05 ऐवजी 19.55 वाजता पोहोचेल. गाडी 19.58 वाजता सुटेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. सविस्तर वेळापत्रक आणि थांबे तपासण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

Jun 02, 2025 19:37 (IST)

15 जून ला होणारी NEET PG परीक्षा स्थगित, नवी तारीख लवकरच जाहीर होणार

Live Update : 15 जून ला होणारी NEET PG परीक्षा स्थगित, नवी तारीख लवकरच जाहीर होणार आहे. 

Jun 02, 2025 19:32 (IST)

उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रुग्णालयात मिळून आला गांजा

उल्हासनगर कॅम्प 3 येथील मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांना गांजा विक्रीची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिक्युरिटी गार्डच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. सिक्युरिटी गार्डने रुग्णाला गांजा देण्यासाठी आलेल्या तरुणाला पकडलं मात्र त्यांनी संधीच्या फायदा घेत पळ काढला. या प्रकरणात हॉस्पिटल प्रशासनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

Advertisement
Jun 02, 2025 18:56 (IST)

तेरेखोल नदीपात्रात आपल्या कुटुंबासह आंघोळीसाठी उतरलेला सात वर्षीय बालक बेपत्ता

सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथे तेरेखोल नदीपात्रात आपल्या कुटुंबासह आंघोळीसाठी उतरलेला सात वर्षीय बालक हा बेपत्ता झाला आहे. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने होडीच्या सहाय्याने बालकाचा शोध घेण्यात येत आहे.

Jun 02, 2025 18:55 (IST)

सातव्या वेतन आयोग सुधारित वेतन श्रेणी नुसार आता शासकीय कर्मचारी पगार वाढ

सातव्या वेतन आयोग सुधारित वेतन श्रेणी नुसार आता शासकीय कर्मचारी पगार वाढ…शासनाने काढले आदेश

Advertisement
Jun 02, 2025 17:09 (IST)

4 जून रोजी ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद

ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्या पूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी कामे बुधवार 4 जून रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार, 4 जून रोजी स 9 ते रा. 9 या काळात 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समता नगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे 12 तासासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. 

Jun 02, 2025 16:44 (IST)

हेरगिरी प्रकरणी ठाण्यातून अटक केलेल्या आरोपीला 3 दिवस पोलिस कोठडी

हेरगिरी प्रकरणी ठाण्यातून अटक केलेल्या आरोपीला 3 दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. रविंद्र वर्मा असं त्याचं नाव आहे.  ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं होतं. त्याला 5 जूनपर्यंत कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप आहे.  

Advertisement
Jun 02, 2025 16:39 (IST)

अंगणात खेळणाऱ्या चिमुरडीवर बिबट्याचा हल्ला, गावकरी चिंतेत

अंगणात खेळणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला आहे. त्यामुळे तिच्या गळ्यावर जखमी झाली आहे.  मुलीला वाचविण्यासाठी आणि बिबट्याला हाकलून लावण्यासाठी पूर्ण कुटुंब लाठ्या काठ्यांसह धावले होते.  गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे ही घटना घडली. 

Jun 02, 2025 16:37 (IST)

पुढील 24 तासांत मुंबईत मध्यम पावसाची शक्यता

पुढील 24 तासांत मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहेय 

Jun 02, 2025 15:37 (IST)

संत गजानन महाराज पालखी आज अकोल्यात दाखल होणार

विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री.संत गजानन महाराज संस्थानच्या श्रींच्या पालखीचे यंदा ५६ वे वर्ष असून, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीसाठी २ जून रोजी सकाळी ७ वाजता शेगाव येथून पालखी प्रस्थान करून अकोला जिल्ह्यात दाखल झाली आहे. रात्रीचा मुक्काम पारस येथे होणार असून ३ जुन रोजी पारसहून पालखी भौरद मार्गे ४ जुनला अकोला शहरात दाखल होऊन दोन दिवस मुक्कामानंतर पंढरपूरला प्रस्थान करणार आहे.

Jun 02, 2025 13:41 (IST)

Live Update : ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

- संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर  यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चेचा विषय 

- एका रुग्णालय उद्घाटन प्रसंगी झाली भेट

Jun 02, 2025 12:16 (IST)

Live Update : २ ते ३ टप्प्यात बिहार निवडणुका होण्याची शक्यता

२ ते ३ टप्प्यात बिहार निवडणुका होण्याची शक्यता

Jun 02, 2025 11:04 (IST)

Live Update : जामखेडमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार, गुन्हा दाखल

जामखेडमध्ये रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार 

कुणाल बंडू पवार वय 20 वर्ष असे गोळीबार झालेल्या तरुणाच नाव

शहरातील विंचरणा नदीजवळ रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली घटना, अज्ञात व्यक्तींनी केला गोळीबार 

जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींन विरोधात गुन्हा दाखल 

या गोळीबारत तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आलं

Jun 02, 2025 10:28 (IST)

Live Update : राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन यांचे ओझर विमानतळ येथे स्वागत

राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन यांचे ओझर विमानतळ येथे स्वागत

नाशिक, दि. २: राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांचे आज सकाळी नाशिक दौऱ्यासाठी ओझर विमानतळ येथे आगमन झाले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.

Jun 02, 2025 10:05 (IST)

Live Update : आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात दररोज देशभरातून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. भक्तांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही अनधिकृत विक्रेते मंदिर परिसरात नियमबाह्य पद्धतीने पूजेसाठी लागणारे ओटीचे साहित्य विक्री करत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाच्या निदर्शनास आली होती.  या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानच्या सुरक्षा विभागाने कारवाई करत मंदिर परिसरात अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईत एकूण २१ पूजेची ताटे व एक फळ विक्रीचे कॅरेट जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अचानक धाड टाकून करण्यात आली असून, त्यामुळे अनधिकृत विक्रेत्यांना चाप बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या कारवाईत पूजेची ताटे जप्त केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Jun 02, 2025 10:04 (IST)

Live Update : विदर्भाच्या दारात आलेला मान्सून ईशान्येच्या दिशेने, विदर्भ कोरडंठाक

विदर्भाच्या दारात आलेला मान्सून ईशान्येकडे ओढला गेला, मान्सून परतण्यास दहा दिवस लागू शकतात : आयएमडीचे भाकीत

28 मे रोजी गडचिरोली सीमेपर्यंत पोहोचलेला मान्सून आता शांत झाला आहे.

वाऱ्याची दिशा अचानक बदलल्याने आणि त्यामुळे मान्सूनचे ढग ईशान्येकडे ओढल्या गेल्याने आता विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा वाढली आहे. 

हातातोंडाशी आलेला मान्सूनचा पाऊस विदर्भाला कोरडे ठेवून पुढे गेल्याचे एकूण वर्तमान चित्र आहे

आद्रता युक्त ढग ईशान्येकडे ओढल्या गेल्याने सध्या विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह  येणारे पावसाचे शिंतोडे हे मान्सूनपूर्व सरांचे आहेत, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. पाच जून पर्यंत असा हलका ते मध्यम पाऊस नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यात होण्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. 

सध्या विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी उर्वरित भागात ऊन असून उकाड्याने वैदर्भीयांचे हाल केले आहेत. मात्र, पार अद्याप ही सरासरीपेक्षा 4.9 डिग्री ने कमी आहे.

Jun 02, 2025 08:40 (IST)

Live Update : दहशतवादासंबंधित महाराष्ट्र एटीएसची ठाण्यातील पडघ्यात छापेमारी, सिमीच्या पदाधिकाऱ्याच्या घरावरही छापा

दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातील पडघा येथे छापा टाकला.

एटीएस पथक साकिब नाचनच्या घरावरही छापे टाकत आहे.

 बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचा पदाधिकारी असलेल्या साकिबला यापूर्वी २ दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.

यामध्ये २००२-२००३ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोटांचा समावेश आहे.

 या दहशतवादी घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. २०१७ मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये सामील झाला असा आरोप आहे.

Jun 02, 2025 08:05 (IST)

Live Update : कांदिवलीत सोमवार आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

कांदिवली (पूर्व) परिसरातील ठाकूर संकुलद्वाराजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर असलेल्या 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसोबत आणखी एका 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी व 900 मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. हे काम येत्या 2 जून दुपारी 1.30 वाजल्यापासून 3 जून सकाळी 7.30 वाजेपर्यंत केले जाणार आहे

या कालावधीत संपूर्ण जलवाहिनीतून पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे आर - दक्षिण विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित होईल

Jun 02, 2025 08:04 (IST)

Live Update : वाशिममध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले

वाशिम जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे बाजारातील भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी बाजारात भाजीपाल्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. 30 रुपये किलोप्रमाण मिळणारे टोम्याटो 60 ते 70 रुपये किलो, वांगे 50 रुपये, चवळी 50 रुपये, शिमला 70 रुपये प्रमाणे ग्राहकांना विकत घ्यावा लागतो आहे.

Jun 02, 2025 08:04 (IST)

Live Update : अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम

अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव,घोळसगाव,किरनाळी गावांना पावसाने झोडपले 

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील ओढे - नाले तुडुंब भरून लागले वाहू

अक्कलकोट तालुक्यात सुरु असणाऱ्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे शेतशिवारात ही शिरलं पाणी

Jun 02, 2025 07:20 (IST)

Live Update : 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर

बीड जिल्ह्यातील ८४३ महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर 

यात ३० ते ३५ वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. 

त्यातही ३० ते ३५ वयोगटातील ४७७ महिलांची गर्भपिशवी काढल्याची शस्त्रक्रिया 

तसेच, १,५२३ महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करत असल्याचे उघड 

ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर महिलांची आरोग्य तपासणी केली जाते

यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी राज्यस्तरावरून बैठकही घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती

Jun 02, 2025 07:14 (IST)

Live Update : येत्या 8 दिवसात राज्यासमोर येणार एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका

एसटी महामंडळाकडून काढली जाणार श्वेतपत्रिका

पहिल्यांदा अशा प्रकारे काढली जाणार श्वेतपत्रिका, नेमकं श्वेतपत्रिका याकडे लक्ष 

स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सादर करणार श्वेतपत्रिका

येत्या ८ दिवसात राज्यासमोर येणार एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका

एसटी महामंडळाची स्थिती , तोटा आणि होणारे नुकसान कशामुळे याचा खुलासा होण्याची शक्यता

Jun 02, 2025 07:01 (IST)

Live Update : ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा कहर

ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा कहर, जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, त्रिपुरात 1300 कुटुंबांचं स्थलांतर, तर अमित शाहांकडून पूरस्थितीचा आढा