Ajit Pawar Death: राजकारणातील 'धुरंदर दादा' काळाच्या पडद्याआड! DCM अजित पवार यांचे निधन; महाराष्ट्रावर शोककळा

बारामतीचे आमदार, खासदार ते राज्याचे पाच वेळा उपमुख्यमंत्री असा प्रवास करत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप उमटवली.

जाहिरात
Read Time: 2 mins

DCM Ajit Pawar Death:. महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.  चार दशके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घोंघावणारे अजित पवार नावाचे वादळ आज शांत झाले. राजकारणातला दादा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला. अजित पवार यांच्या बातमीने अवघा महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार हे बारामतीकडे निघाल होते. बारामतीमध्ये लँडिग होत असतानाच विमान दुर्घटनाग्रस्त झाले, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

महाराष्ट्राचा दादा गेला

बारामतीच्या काटेवाडीमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महानायक होते. काका शरद पवार यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवत अजित पवारांनी आपली राजकीय कारकीर्द फुलवली. बारामतीचे आमदार, खासदार ते राज्याचे पाच वेळा उपमुख्यमंत्री असा प्रवास करत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप उमटवली.

Ajit Pawar Plance Crash: ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू; PTIची माहिती

अवघा महाराष्ट्र पोरका झाला. 

आपल्या बिंधास्त स्टाईलने फटकेबाजी करत विरोधकांना नामोहरम करणारे, कार्यकर्त्यांची फिरकी घेणारे अजित पवार यांच्या या दुर्दैवी मृत्यूने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. दादांनी घेतलेल्या या अकाली एक्झिटने बारामतीकरांसह राजकीय नेत्यांनाही अश्रु अनावर झाले. अत्यंत उमद्या वयाचा, तरुण तडफदार आणि आपल्या कामामुळे अवघ्या राज्यात लोकप्रिय असलेला नेता अशी अजित पवार यांची ओळख होती. आजचा दिवस पवार कुटुंबीय, बारामतीकरांसह अवघ्या महाराष्ट्रावर घात करणारा ठरला. 

Dharashiv Election: 'दुसऱ्या कोणाला अक्कल नाही..' ओमराजेंची पद्मसिंह पाटलांवर टीका, उमेदवारीवरुन डिवचलं