DCM Ajit Pawar Plane Crashed: महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून अजित पवार हे आज बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये उतरत असतानाच त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे चार सुरक्षारक्षक होते, अशी माहिती समोर आली आहे. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या चार प्रचार सभा पार पडणार आहेत. अजित पवार यांचं विमान बारामती एअरपोर्टवर लँडिंग होत होतं त्याचवेळी त्याला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra Deputy CM Ajit Pawar, 3 others on board dead after aircraft crashes in Pune district: Official. PTI pic.twitter.com/AKfGSNimZi
— Press Trust of India (@PTI_News) January 28, 2026
या भीषण विमान अपघाताचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये अजित पवार यांचे विमान पुर्णता जळाल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत अजित पवार हे गंभीर जखमी झाले आहेत, अशी अपडेट समोर आली आहे. बातमी समजताच खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार हे दिल्लीवरुन निघाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world