महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठीचे मतदान मंगळवारी म्हणजेच 2 डिसेंबर रोजी पार पडले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती. मतदानाच्याच दिवशी नागपूर खंडपीठाने मतमोजणी ही 21 डिसेंबरला घेण्याचे आदेश दिले होते. अपीलावर ठरवून दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्याने किंवा यासारख्या कायदेशीर पेचामुळे अंदाजे 24 नगर परिषदा आणि 154 प्रभागातील निवडणुका स्थगित झाल्या होत्या.
नक्की वाचा: मतमोजणी लांबणीवर पडण्याचे नेमके कारण काय?
ड्राय डे 21 डिसेंबरपर्यंत असणार का ? दारूप्रेमींना पडलाय प्रश्न
ज्या ठिकाणी निवडणुका स्थगित झाल्या होत्या तिथे 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. या नगर परिषदा आणि प्रभाग सोडून इतरत्र ठिकाणची मतमोजणी 3 डिसेंबरला झाली असती तर त्या निकालांचा परिणाम 20 तारखेला होणाऱ्या मतदानावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे न्यायालयात धाव घेणाऱ्या याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. यामुळे नागपूर खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आदेश दिला की, मतमोजणी 21 डिसेंबर रोजी घेण्यात यावी. तोपर्यंत आचारसंहिता लागू असेल असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे 3 डिसेंबरला ड्राय डे असणार का ? का 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू असल्याने तोपर्यंत ड्राय डे असणार असा प्रश्न पडल्याने दारूप्रेमींच्या घशाला कोरड पडली होती.
नक्की वाचा:रायगडमध्ये मोठा राडा! भरत गोगावलेंच्या मुलावर रिव्हॉल्वर रोखली? गाडी फोडली
ड्राय डे कधी पर्यंत असणार ?
मिळालेल्या माहितीनुसार 3 डिसेंबर रोजी म्हणजेच बुधवारी मतदान पार पडलेल्या भागात ड्राय डे असणार नाही. ज्या ठिकाणी मतदान होणे बाकी आहे, तिथेही ड्राय डे नसणार आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन ईटणकर यांनी NDTV मराठीला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, नागपूर जिल्ह्यात ड्राय डे मतदानाच्या दिवशीपर्यंत राहील. मतदानाची वेळ संपल्यानंतर ड्राय डेचे निर्बंध संपुष्टात येतील. 3 डिसेंबरचे मतदान 21 डिसेंबरला होणार असल्याने 3 डिसेंबरला ड्राय डे नसेल.