प्रशांत जव्हेरी, नंदुरबार: यंदा पावसाने सरासरीपेक्षा कमी हजेरी लावल्याने हंगामी भाजीपाला पिकांच्या लागवड आणि संगोपनावर परिणाम झाला होता एकीकडे ही परिस्थिती असताना मध्यंतरी आलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते परिणामी बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याने भाजीपाला महाग झाला होता सर्वच भाजीपाले किलोमागे 80 ते 90 रुपये चा पुढे गेल्याने चिंता वाढल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत या दरामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे, बाजारात सर्वच भाज्यांची मुबलक आवक येत आहे.
Maharashtra Rain News : यंदा गणेश विसर्जनही पावसात; पुढील 3 दिवस मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचे संकेत
भाजीपाल्याचे आजचे दर:
काकडी - 30 रुपये (प्रतिकिलो)
गाजर - 40 रुपये (प्रतिकिलो)
फ्लॉवर - 40 रुपये (प्रतिकिलो)
पत्ताकोबी - 40 रुपये (प्रतिकिलो)
टोमॅटो - 30 ते 40 रुपये (प्रतिकिलो)
लिंबू - 30 ते 40 रुपये (प्रतिकिलो)
कोथंबीर - 10 जुडी
शिमला मिरची - 60 रुपये (प्रतिकिलो)
वांगी - 50 रुपये (प्रतिकिलो)
गवार - 50 रुपये (प्रतिकिलो)
बटाटे - 25 रुपये (प्रतिकिलो)
कांदा - 17 रुपये (प्रतिकिलो)
मिरची - 40 रुपये (प्रतिकिलो)
गिलके - 40 रुपये (प्रतिकिलो)