जाहिरात

Maharashtra Rain News : यंदा गणेश विसर्जनही पावसात; पुढील 3 दिवस मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचे संकेत

पुढील तीन दिवस महाराष्ट्रभरात पावसाचे संकेत देण्यात आले असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामान विभागाचा अलर्ट पाहणे आवश्यक आहे. 

Maharashtra Rain News : यंदा गणेश विसर्जनही पावसात; पुढील 3 दिवस मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचे संकेत
यंदा गणेश विसर्जन मुसळधार पावसात करावं लागण्याची शक्यता आहे

Maharashtra Rain Update : यंदा गणेशोत्सवावर पावसाचं सावट होतं. गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला पाऊस अनंत चतुर्दशीपर्यंत कायम असल्याचा अंदाज आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 5 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी (ganesh visarjan 2025) आहे. या दिवशीही महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

आज 3 सप्टेंबर, बुधवारी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय जळगाव आणि अमरावती जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय काही ठराविक जिल्हे वगळता यल्लो अलर्ट ( weather Alerts issued by IMD ) देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यालाही यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. 

4 सप्टेंबरला रत्नागिरी, रायगड, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे या जिल्ह्यांना आयएमडीकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. 


5 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी ठाणे, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीदिवशी पुण्यात मोठी मिरवणूक काढली जाते. यंदा या निवडणुकीवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. ५ सप्टेंबरला रायगड, ठाणे, पुणे, घाट परिसर या भागात ऑरेंज अलर्ट तर धुळे, परभणी, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.

पुढील तीन दिवस महाराष्ट्रभरात पावसाचे संकेत देण्यात आले असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामान विभागाचा अलर्ट पाहणे आवश्यक आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com